Pune PMPML News | PMPML ची पर्यटन बससेवा आता केवळ 500 रुपयांत

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Pune PMPML News | PMPML ची पर्यटन बससेवा आता केवळ 500 रुपयांत

Pune PMPML News | PMPML च्या पर्यटन सेवेच्या सातही मार्गावर सुधारित दर लागू केले असून, पाच मार्गावरील दरात तब्बल ५० टक्के सवलत देऊन हा दर हजार रूपयांवरून ५०० रूपयांवर आणण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना यापुढे माफक दरात पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देऊन परत येता येणार आहे. (PMPML Pune Darshan News)

Pmpml ने  १६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे दर्शन  बससेवेच्या (Pune Darshan bus service) धर्तीवर धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकुलित ई बसेसव्दारे विशेष बससेवा सुरू केली होती. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार व रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी १ मे पासुन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु या बससेवेचे दर जास्त असल्याने प्रवासी नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. सोशल मिडियावर याबाबत नागरिकांनी नापासंतीही व्यक्त केली. त्यामुळे परिवहन महामंडळाने व महामंडळाचे अध्यक्ष यांनी या पर्यटन बसेसेवेच्या दरात सवलत देण्याचा निर्णय घेऊन सुधारित दर जाहिर केले आहेत. (PMPML pune)

पर्यटन मार्ग, जुने दर व सुधारित दर

1. मार्ग :- हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसरजुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /

-२. हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोढणपूर मंदिर, हडपसरजुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /

-३.  मार्ग : डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कनजुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /

-४. मार्ग : पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगाव धरण, पुणे स्टेशनजुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /

-५. मार्ग : पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे स्टेशनजुना दर ( प्रति व्यक्ती ) : ७०० /-, नवा दर :- ५०० /

-६. मार्ग : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर, वाडेबोल्हाई, तुळापूर, राजंणगाव पुणे स्टेशनजुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /

-७. मार्ग : भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर रावेत, मोरया गोसावी मंदिर, प्रतिशिर्डी शिरगाव, देहू, आळंदी, निगडीजुना दर ( प्रति व्यक्ती ) : ७०० /-, नवा दर :- ५०० /-