Library : राजगुरुनगरच्या सार्वजनिक वाचनालयाची तंत्रस्नेही जगाबरोबर वाटचाल कौतुकास्पद 

Categories
social पुणे
Spread the love

राजगुरुनगरच्या सार्वजनिक वाचनालयाची तंत्रस्नेही जगाबरोबर वाटचाल कौतुकास्पद

: आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदीप वासलेकर यांनी केले कौतुक

राजगुरुनगर : राजगुरुनगरच्या सार्वजनिक वाचनालयाने तंत्रस्नेही जगाबरोबर वाटचाल करत उपलब्ध पुस्तकांचा संच डिजिटायझेशन करून वाचकार्पण केला ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत प्रसिद्ध लेखक तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदीप वासलेकर यांनी व्यक्त केले.

: वाचनालयाने 38000 पुस्तकांचा संच डिजिटायझेशन केला

सार्वजनिक वाचनालय, राजगुरुनगर व जाणीव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षी घटस्थापनेला समाज माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे अडीचशे स्वयंसेवकांनी 38000 पुस्तकांचा संच डिजिटायझेशन करून पाच महिन्यात हा प्रकल्प पूर्ण केला. हा प्रकल्प वाचकार्पण करण्याकरिता ” वाचन प्रेरणा दिन व दसर्‍याच्या ” शुभ दिनी आयोजीत केलेल्या सभेत ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग घेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राजगुरुनगरचे वाचनालय हे राज्यातील नव्हे तर देशातील दीडशे वर्षांहून अधिक काळ कार्यरत असण्यार्‍या पैकी एक असल्याचे सांगून स्थापनेपासून आजपर्यंत अनेक ज्ञात अज्ञातांच्या योगदानाणे यात सकारात्मक भर पडली आहे. यापुढील पिढीने जाणीवपूर्वक प्रयत्न करून ही वाचन चळवळ पुढील एक हजार वर्षांपर्यंत ज्ञान संस्काराचे कार्य करत राहील असा विश्वासही त्यांनी त्यावेळी त्यांनी यावेळी व्यक्त केला. डिजिटायझेशन ही काळाची गरज असल्याचे सांगून केवळ सरकारवर अवलंबून न राहता इतर संस्थांकडून निधी उपलब्ध करून वाचन उपयोगी सेवेचा विस्तार करावा गेल्या साडेपाचशे वर्षांपासून इजिप्तमध्ये अनेक स्थित्यंतरे घडूनही तेथील अलेक्झांड्रिया वाचनालय अखंड सुरू असल्याचे सांगून जगातील जुन्या वाचनालयांचा इतिहासही सांगितला. तसेच भारतात ही चळवळ जर अशीच एक हजार वर्षांपासून चालू असती तर खुद्द संत ज्ञानेश्वर व इतर संतांनी लिहिलेले वाड्मय त्यांच्या स्वहस्ताक्षरात व मूळ स्वरूपात आजच्या वाचकांनाही उपलब्ध झाले असते.
प्रास्ताविकात संस्थेचे मानद सचिव राजेंद्र सुतार यांनी हा पुस्तक संच सवखेद.वेब.ॲप वर उपलब्ध असून लवकरच या डेटाबेसचे ॲप व क्यूआर कोड उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply