Smart city : place Making : नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्मार्ट सिटी ला केली ही सूचना

Categories
पुणे
Spread the love

प्लेस मेकिंगची कामे तातडीने पुर्ण करा

: स्मार्ट सिटी प्रशासनाला नगरसेवक अमोल बालवडकर यांची सूचना

पुणे: नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बालेवाडी येथील मधुबन, गोल्डन ट्रेलिज, पलाझो, सफायर पार्क येथील नागरीकांना भेटुन परिसरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.  यावेळी स्मार्ट सिटी मार्फत सुरु असलेल्या प्लेस मेकिंगची कामे तातडीने पुर्ण करण्याची सूचना केली. तसेच रस्ते व पदपथांची अंतिम टप्प्यातील कामे लवकरात लवकर संपवुन पुर्ण करण्याबाबत स्मार्ट सिटी चे अभियंता व ठेकेदारांना सुचना केल्या. तसेच याठिकाणी बसविण्यात आलेले पथदिवे देखिल लवकरात लवकर सुरु करण्यास सांगितले.

: विकास कामाबाबत नागरिक समाधानी

या परिसरातील रस्ते, पथदिवे, पदपथ, प्लेसमेकिंग अशा विविध कामांबाबत मी गेली वर्षभरापासुन प्रशासन व स्मार्ट सिटी सोबत पाठपुरवठा करीत असुन सध्यस्थितीला हे काम अंतिम टप्प्यात आहे.  बाणेर-बालेवाडी परिसरात झालेल्या विकास कामांबाबत येथील नागरीक  समाधानी असुन याबाबत नागरीकांनी आनंद व्यक्त केला.

: अशा पद्धतीने सुरु आहेत प्लेस मेकिंग ची कामे

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले कि, बालेवाडी परिसरात सुमारे ९ किमीचे रस्ते (स्मार्ट स्ट्रिट) विकसित करण्यात आले आहेत, यामध्ये १८ मी, २४ मी, ३० मी रुंदीच्या रस्त्यांचा समावेश आहे. तसेच बाणेर परिसरात ६ किमीचे रस्ते (स्मार्ट स्ट्रिट) विकसित करण्यात आले आहेत. यामध्ये १८ मी., २४ मी. रुंदिच्या रस्त्यांचा समावेश आहे.  स्मार्ट सिटीच्या माध्यमातुन बाणेर-बालेवाडी परिसरात विविध ठिकाणी सुमारे २० प्लेस मेकिंगची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तसेच संपुर्ण बाणेर बालेवाडी परिसरात विविध रस्ते प्रकाशमय करण्यासाठी बाणेर भागात सुमारे ५०० पथदिवे बसविण्यात आले आहेत. तर बालेवाडी भागात ३२५ पथदिवे बसविले आहेत व ३५० पथदिवे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच बाणेर-बालेवाडी परिसरातील विविध चौकांमधे सुमारे २५ हायमास्ट बसवुन विविध चौक प्रकाशमय करण्याचे काम सुरु आहे. असे ही बालवडकर म्हणाले.

Leave a Reply