Aadhunik Lahuji Sena | आधुनिक लहुजी सेनेची पहिली राज्य स्तरीय बैठक पुणे येथे संपन्न

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

आधुनिक लहुजी सेनेची पहिली राज्य स्तरीय बैठक पुणे येथे संपन्न

आधुनिक लहुजी सेना या सामाजिक संघटनेची राज्य स्तरीय बैठक पुणे येथे  11 फेब्रुवारी  रोजी पुणे येथील अल्पबचत भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये मातंग समाजाच्या विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रश्नांवर राज्यभरातून जमलेल्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून प्रदिर्घ आढावा घेण्यात आला. अशी माहिती संघटनेचे सचिव भावेश कसबे यांनी दिली.

मातंग समाजाचा बुलंद आवाज म्हणून राज्यभर कार्यरत असणारी आधुनिक लहुजी सेना या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांच्या सूचनेनुसार राज्य कार्यकारिणीची पहिली बैठक संघटनेचे राज्य सचिव भावेश कसबे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून संपन्न झाली.

या बैठकीमध्ये मातंग समाजाच्या विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रश्नांवर राज्यभरातून जमलेल्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून प्रदिर्घ आढावा घेण्यात आला. तसेच, याच बैठकीत आगामी काळात “सकल मातंग समाजाच्या वतीने 22 फेब्रुवारी 2023 रोजी, मुंबई आझाद मैदानावर होत असलेल्या, “जवाब दो आंदोलनामध्ये” सहभागी होण्याचे ठरविण्यात आले.”

याबरोबरच समाज संघटना वाढीसाठी नवी दिशा आखण्यात आली . या बैठकीसाठी राज्यभरात संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, सर्व विभागीय अध्यक्ष, पदाधिकारी,व सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते.

Nagina Kambale : नगीनाताई म्हणाल्या, मातंग समाजाला सर्व स्तरावर दखलपाञ करण्यासाठी प्रयत्न करणार 

Categories
social महाराष्ट्र

मातंग समाजाला सर्व स्तरावर दखलपाञ करण्यासाठी प्रयत्न करणार

: नगिनाताई सोमनाथ कांबळे

जालना : मातंग समाजाला दुर्लक्षित ठेवले जात आहे. मात्र आता समाज जागा झाला आहे. समाज आता मागे राहणार नाही. आगामी काळात मातंग समाजाला सर्व स्तरावर दखलपाञ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आधुनिक लहूजी सेनेच्या संस्थापक नगीना कांबळे यांनी दिले.

आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा नगीनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांचा जालना जिल्ह्यामध्ये मातंग समाजाच्या वतीने भव्य सत्कार आणि स्वागत करण्यात आला. यावेळी संघटनेचे प्रवक्ते लक्ष्मणभाऊ क्षिरसागर , अजय कांबळे, संभाजी कांबळे, संतोषभाऊ तुपसुंदर, बल्लीभाऊ, अनिल सगट इ.प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Adhunik Lahuji sena : Nagina Kamble : मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई : नगीना सोमनाथ कांबळे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई

आधुनिक लहूजी सेनेच्या संस्थापक अध्यक्ष नगीना सोमनाथ कांबळे यांचा नारा

पुणे : मातंग समाजावर अन्याय आणि अत्याचार होण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. मात्र शांत बसून चालणार नाही. मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई करणार. शिवाय अशा अत्याचाराला पायबंद घालणार, असा नारा आधुनिक लहूजी सेनेच्या संस्थापक  अध्यक्ष नगीना सोमनाथ कांबळे दिला आहे.

14 नोव्हेंबर रोजी पुणे येथे आद्यक्रांतीगुरु लहुजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी  राज्य सचिव भावेश  कसबे, राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर, राज्य सदस्य संभाजी  कांबळे, मराठवाडा अध्यक्ष संतोष  तुपसुंदर, बाळासाहेब गवळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

नगीना ताई पुढे म्हणाल्या,  लहुजी वस्ताद यांचे संगमवाडी पुणे येथे राष्ट्रीय स्मारक होणेसाठी शासना कडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी देखील झाली आहे.  शिवाय अ ब क ड श्रेणी प्रमाणे आरक्षण वर्गिकरण करण्यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.  नगीनाताई पुढे म्हणाल्या, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. या मागणीसाठी देखील आता जोर लावला जाणार आहे. अशा या सर्व मागण्या घेवुन राज्यभर काम करणार, असे आश्वासन देखील नगीना ताई यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.

: सफाई कर्मचारी आयोगावर मातंग समाजाचा प्रतिनिधी घेण्यात यावा : भावेश कसबे

सेनेचे राज्य सचिव भावेश कसबे यांनी मागणी केली कि सफाई कर्मचारी आयोगावर मातंग समाजाचा प्रतिनिधी घेण्यात यावा. जेणेकरून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये समाजातील तरुणांना नोकरी देण्यासाठी अडचण येणार नाही. त्या निमित्ताने सर्व सामान्य लोकांना नियमांची माहिती होईल. त्यामुळे समाजाचा विकास होण्यास हातभार लागेल.