Upcoming Elections : Ajit Pawar : आगामी महापालिका निवडणुका वेळेवर होणार की नाही? अजित पवारांनी दिले हे संकेत! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आगामी महापालिका निवडणुका वेळेवर होणार की नाही? अजित पवारांनी दिले हे संकेत! 

पुणे : राज्यातील आगामी निवडणुकांबाबत निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवारांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

 

पवार म्हणाले, “निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. आम्ही अधिवेशनाच्या काळात यासंदर्भात दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं ठराव केला होता, तो निवडणूक आयोगाला पाठवला आहे. त्यानंतर राज्यातील परिस्थिती एकदम बदलली आहे. कारण अधिवेशन संपलं २७ तारखेला त्यानंतर बरेच मंत्री, आमदार मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह झाले. तुमच्या आमच्या घरातीलही अनेक लोक सध्या पॉझिटिव्ह झाले आहेत. ही सगळीपरिस्थती पाहता आता निवडणूक आयोगानं याबाबत निर्णय घ्यायचा आहे. राज्यातील संसर्ग निवडणूक आयोगानं गांभीर्यानं घेण्याची गरज आहे”

Chandrakant Patil : ST workers : एसटी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगा  : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन

Categories
Political पुणे महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगा

 : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन

एसटी

पुणे : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोई सुविधा द्यायलाच हव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित ‘अटलशक्ती महासंपर्क अभियाना’ची सुरुवात मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात एका घरात संपर्क साधून केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पुणे शहरातील तीस हजार कार्यकर्त्यांनी प्रत्येकी दहा घरांमध्ये संपर्क साधून मोदी सरकारच्या कामाविषयी आणि भारतीय जनता पार्टीविषयी माहिती देणे असे या अभियानाचे स्वरूप आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या परखडपणाचा अभिमान आहे. पण त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण डोक्यातून काढून टाका असे धुडकावल्यासारखे सांगू नये. विलीनीकरण का शक्य नाही हे समजून सांगावे. जीवन प्राधिकरणाचे विलीनकरण केले तरी एसटीचे का करता येत नाही, हे सुद्धा समजून सांगावे.

त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीचे कारण पुढे केले आहे. पण राज्याचे उत्पन्न मोठे आहे आणि कर्ज काढून निधी उभारता येतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास हजारांची मदत करणे, एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणे किंवा एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करणे अशा सर्व बाबतीत महाविकास आघाडी सरकार आर्थिक कारण पुढे करत आहे, तर राज्याची तिजोरी कशासाठी आहे, असा प्रश्न निर्माण होतो.

ते म्हणाले की, टीईटीच्या परीक्षेत पैसे घेऊन पेपर फोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आधीची परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी.

ते म्हणाले की, टीईटी, आरोग्य विभागातील भरती, म्हाडा अशा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने राज्याचे पोलीस त्याचा तपास करू शकत नाहीत. त्यामुळेच याचा तपास सीबीआयमार्फेत करावा अशी आमची मागणी आहे.

परीक्षा गैरव्यवहाराची चौकशी निःपक्षपातीपणे करावी आणि जे दोषी आढळतील त्यांना शिक्षा करावी. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आढळला तरी त्यालाही शिक्षा करावी, पक्ष कोणाही दोषी व्यक्तीला पाठीशी घालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ST workers strike : Ajit pawar: अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं ; ST चं विलीनीकरण डोक्यातून काढून टाका

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

अजित पवारांनी  स्पष्टच सांगितलं; ST चं विलीनीकरण डोक्यातून काढून टाका 

मुंबई : मागील बरेच दिवस राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यसरकारने यावर तोडगा काढवा यासाठी मागणी होत आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. दरम्यान, सरकराने काही मागण्या मान्य करत कामावर हजर राहण्याचे आवाहनही केले होते. आता एसटीच्या विलीनीकरणाची मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. एसटी कामगाराचं शासनात विलिनीतरण शक्य नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.

ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीचा चेंडू हायकोर्टात आहे. हायकोर्टाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे. त्या समितीने आपला अभ्यास सुरु केला आहे. त्या समितीने अभ्यासासाठी मुदत वाढ मागितल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण एसटी कामगार-कर्मचाऱ्याचं शासनात विलिनीकरण शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, एसटी कामगार शासनात विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी ते गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरु आहे. सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करुनही ते संपावर कायम आहेत. मागील आठवड्यात कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटनेच्या नेत्यांनी संप माघारी घेत असल्याची घोषणाही केली होती, त्यानंतरही संपावरील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आज बोलताना अजित पवार यांनी एसटी कामगारांच्या संपाबद्धल शासनाची भूमिका मांडली आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावरून एसटी कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार, त्यांचा निर्णय बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी एसटीचे भाडेवाड होईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Chatrpati Sambhaji maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला मंजुरी

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला मंजुरी

वढू बुद्रुक येथे भव्य स्वरूपात उभारणी होणार

पुणे : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक (ता. हवेली) येथे स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. २०) तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे, भव्यदिव्य असले पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करून त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. स्मारकाचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात स्मारकाच्या उभारणीबाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे तसेच ‘व्हीसीद्वारे पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, वढूचे माजी सरपंच अनिल शिवले, अंकुश शिवले उपस्थित होते.

Pune metro : पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात

‘पीपीपी’ तत्वावरचा देशातला पहिलाच प्रकल्प; तीन वर्षात होणार काम पूर्ण

प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दर आठवड्याला आढावा

मुंबई :- पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्वाचा असणारा माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. सार्वजनिक-खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून येत्या तीन वर्षात या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच या संबंधीच्या विविध प्रकारच्या मान्यतांसह तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचा प्रत्येक आठवड्याला मंत्रालयात विशेष आढावा घेतात.

‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’च्या मार्गिका तीनचे काम सुरु करण्यासाठी विविध प्रकारच्या मान्यता आणि तांत्रिक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात प्रत्येक आठवड्याला या बाबतची विशेष आढावा बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यात आला. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे संपादन ‘भू-संपादन व पुनर्वसन कायदा २०१३’चा अवलंब करण्यात आला आहे. मेट्रो कार डेपो, राईट ऑफ वे आणि स्टेशनसाठी लागणारी सुमारे ९८ टक्के जमीन प्राधिकरणाने संपादित केली आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व परवानग्या व लायसन्स प्राप्त करून घेण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच इतके भू-संपादन व विहित सर्व परवानग्या प्राप्त करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे.

या मेट्रो मार्गिकेची लांबी २३.२ किलोमीटर असून या मार्गिकेत २३ स्टेशन्स प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारच्या ‘मेट्रो रेल धोरण २०१७’ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर राबविण्यात येत असलेला हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्याबरोबरचं राज्य सरकारचे २० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य लाभणार आहे. पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी प्रस्तावित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून, त्याला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) व पुणे महानगरपालिका यांची मान्यता घेण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन अभिकरण मे. ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स पुढे आल्या आहेत. त्यांनी ‘पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लि.’ ही विशेष उद्देश संस्था स्थापन केली आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु करणेसाठी ट्राफिक डायव्हर्जन प्लॅन तयार करण्यात आला असून, या याबाबत दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पुम्टाच्या बैठकीत याबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.