PMC : Online Guthewari : गुंठेवारी नियमितीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळेना  : 20 दिवसात फक्त 7 प्रस्ताव 

Categories
Breaking News PMC Political पुणे

गुंठेवारी नियमितीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळेना

: 20 दिवसात फक्त 7 प्रस्ताव

पुणे : पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) १० जानेवारीपासून गुंठेवारीचे (Gunthewari) प्रस्ताव दाखल करून घ्यायला सुरुवात झाली.  ज्या नागरिकांनी शहरातील खाजगी जमिनीवरच्या अनधिकृत रेखांकनात दिनांक 31 डिसेंबर 2020 पुर्वी अनधिकृत बांधकाम करुन घरे/इमारती बांधल्या आहेत, त्यांनी गुंठेवारी विकास नियमित करणे करीता अधिनियमा अन्वये महानगरपालिकेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार १०.०१.२०२२ पासून दि.३१.०३.२०२२ पर्यंत सर्व गुंठेवारी धारकांनी त्यांच्या गुंठेवारी विकासाच्या नियमितीकरणाची प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. मात्र या नियमितीकरणला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. 20 दिवसात फक्त 7 प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे नियमात शिथिलता द्यावी, असे आदेश शहर सुधारणा समितीने बांधकाम विभागाला दिले आहेत.

: दर नागरिकांना परवडेना

 नागरीकानी दिनांक ३१ डिसेंबर २०२० पूर्वी विभागणी करण्यात आलेले भूखंड व त्यावर केलेल्या अनाधिकृत बांधकामासाठी लायसेन्स आर्किटेक्ट अथवा ला.इंजिनिअर्स यांचे मार्फत संगणक प्रणालीमध्ये प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक आहे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार 10 जानेवारी पासून याची सुरुवात झाली आहे. मात्र यासाठी नागरिकांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद दिसून येत नाही. याबाबत शहर सुधारणा समितीत चर्चा झाली. समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांनी याबाबत प्रशासनाला माहिती मागितली होती. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 10 जानेवारी पासून फक्त 7 प्रस्ताव दाखल झाले आहेत. हा प्रतिसाद अल्प आहे. त्यामुळे रिठे यांनी प्रशासनाला सूचना केल्या की यातील दर कमी करावेत. शिवाय सिंगल गुंठेवारी चे देखील प्रस्ताव दाखल करून घ्यावेत. जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल आणि नागरिक पुढे येतील. आता प्रशासन संपूर्ण इमारतीसाठीच प्राधान्य देत आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेणार. हे महत्वाचे ठरणार आहे.

Dandekar Bridge : PMC : दांडेकर पुलाचे नाव बदलणार नाही  : महापालिका प्रशासनाचा नकारात्मक अभिप्राय 

Categories
Breaking News PMC पुणे

दांडेकर पुलाचे नाव बदलणार नाही

: महापालिका प्रशासनाचा नकारात्मक अभिप्राय

पुणे : शहरातील दांडेकर पूल चौकाचे नाव बदलून ते विवेकानंद ज्ञानपीठ चौक द्यावे, अशी मागणी नगरसेवक शंकर पवार, आनंद रिठे, अनिता कदम यांनी केली होती. मात्र प्रभाग 30 मधील नगरसेवकांनी याला परवानगी न दिल्याने हे नाव देणे अडचणीचे आहे. असा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे सध्या तरी चौकाचे नाव दांडेकर पूल हेच राहणार आहे.

: प्रभाग 29 मधील नगरसेवकांचा विरोध

नाव समितीने यावर प्रशासनाचा अभिप्राय मागितला होता. प्रशासनाच्या अभिप्रायानुसार प्रभाग क्रमांक ३० ड मधील दांडेकर पुल चौकाला विवेकानंद ज्ञानपीठ चौक असे नाव देणे बाबत पत्रा अन्वये मागणी करण्यात आली होती. प्रभागामधील एकुण चार सभासदांपैकी मा. सभासद शंकर गणपत पवार यांनी सूचक व सभासद  आनंद रिठे,  सभासद अनिता कदम यांनी अनुमोदक म्हणून संदर्भाकित पत्रासोबत जोडलेल्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. या विभागाकडील उपलब्ध कागदपत्रांनुसार प्रस्तावातील सुचविलेल्या चौकास यापूर्वी मान्य नाव नाही. प्रस्तावातील सुचविलेल्या चौक हा प्रभाग क्रमांक ३० व प्रभाग क्रमांक २९ अशा दोन प्रभागाच्या हद्दीवर येत असून प्रभाग ३० मधील एक व प्रभाग क्रमांक २९ मधील तीन अशा एकुण चार उर्वरीत सभासदांच्या सम्मती बाबत स्वक्षारी नसल्याने सुचविलेल्या चौकाला विवेकानंद ज्ञानपीठ चौक असे नाव देणे अडचणीचे आहे. त्यामुळे सध्या तरी चौकाचे नाव दांडेकर पूल हेच राहणार आहे. समितीने या अभिप्रायास मंजुरी दिली आहे.