Anandacha Shidha | Diwali | सिंहगड रोड भागातील एकाही स्वस्त धान्य  दुकानांमध्ये दिवाळी किट उपलब्ध नाही  | धान्य उपलब्ध करून देण्याची महेश पोकळे यांची मागणी 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Anandacha Shidha | Diwali | सिंहगड रोड भागातील एकाही स्वस्त धान्य  दुकानांमध्ये दिवाळी किट उपलब्ध नाही

| धान्य उपलब्ध करून देण्याची महेश पोकळे यांची मागणी

 
Anandacha Shidha | Diwali | पुणे | राज्य सरकारने दिवाळीसाठी सर्वसामान्यांना शंभर रुपयांमध्ये  कीट उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. परंतु अवघ्या दोन दिवसांवर आली असता सिंहगड रोड भागातील एकाही स्वस्त धान्य दुकानांमध्ये दिवाळी किट आणि इतर अन्नधान्य उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे योजना फसवी न वाटण्यासाठी लवकर धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेना खडकवासला मतदार संघाचे विभाग प्रमुख महेश पोकळे (Mahesh Pokale) यांनी केली आहे.
राज्य सरकारकडून दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिध्यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चना डाळ, मैदा आणि पोहे असे जिन्नस असतील. हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु दिवाळी सण काही दिवसांवर आला आहे. नागरिकांची दिवाळी तयारी सुरू आहे बाजारपेठ गर्दीने फुलून गेले आहे. परंतु राज्य सरकारने दिवाळीसाठी सर्वसामान्यांना शंभर रुपयांमध्ये  कीट उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. परंतु अवघ्या दोन दिवसांवर आली असता सिंहगड रोड भागातील एकाही स्वस्त दुकानांमध्ये दिवाळी किट आणि इतर अन्नधान्य उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे शंभर रुपये दिवाळी किराणा साहित्य ही योजना फसवी आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत. ऐन दिवाळी स्वस्तात मिळणारे किराणा साहित्य मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी दिवाळी सण साजरा करायचा कसा ? स्वस्त धान्य दुकानात दिवाळीचे किट उपलब्ध करून द्यावे अशी आम्ही नागरिकांच्या तसेच शिवसेनेच्या वतीने मागणी करत आहोत. असे पोकळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.