Shivchhatrapati Krida Purskar | शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी बालेवाडीत आयोजन | पुरस्कारार्थींची नावे जाणून घ्या 

Categories
Breaking News Political social Sport महाराष्ट्र

Shivchhatrapati Krida Purskar | शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी बालेवाडीत आयोजन | पुरस्कारार्थींची नावे जाणून घ्या

Shivchhatrapati Krida Purskar | शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (Shivchhatrapati Krida Purskar) वितरण सोहळ्याचे शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी येथे सोमवार २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे. (Shivchhatrapati Krida Purskar)
यावेळी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन,  क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कार शासनाने जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
 कार्यक्रमास क्रीडा प्रेमी, खेळाडू, विद्यार्थी, विविध खेळाचे जिल्हा व राज्य संघटना प्रतिनिधी, माजी क्रीडा पुरस्कारार्थी (राज्य व केंद्र शासनाचे), विविध खेळांच्या अॅकेडमीचे खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संस्था, पत्रकार, पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल आणि क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

पुरस्कारार्थींची नावे जाणून घ्या

——
News Title | Shivchhatrapati Krida Purskar | Shiv Chhatrapati State Sports Award distribution ceremony organized at Balewadi on Monday Know the names of the awardees