In-charge administration officer : प्रभारी प्रशासन अधिकाऱ्यांनी वाढवले महापालिकेचे उत्पन्न! 

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभारी प्रशासन अधिकाऱ्यांनी वाढवले महापालिकेचे उत्पन्न!

: कर आकारणी व संकलन विभागाने सोपवली नवीन जबाबदारी

पुणे : महापालिकेला उत्पन्न मिळवून देण्यासाठी कर आकारणी आणि कार संकलन विभागाचा सिंहाचा वाटा आहे. मागील आर्थिक वर्षात विभागाने इतिहास रचत १८५० कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. दरम्यान यात महत्वपूर्ण भूमिका प्रभारी प्रशासन अधिकाऱ्यांची राहिली आहे. कामकाजाच्या सोयीसाठी ही पदे तयार करण्यात आली होती. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी नवीन जबाबदारी विभागाने दिली आहे.

कर आकारणी आणि कर संकलन विभागाने इतिहास रचत महापालिकेला १८५० कोटींचे उत्पन्न मिळवून दिले आहे. यामुळे महापालिकेला आता विकासकामे करण्यात हातभार लागणार आहे. दरवर्षी हाच विभाग पालिकेची आर्थिक बाजू सांभाळून धरत आहे. दरम्यान विभागाकडे कमी कर्मचारी असून देखील विभागाने ही मजल मारली आहे. यात महत्वाची भूमिका प्रभारी प्रशासन अधिकाऱ्यांची आहे. कामकाजाच्या सोयीसाठी ही पदे तयार करण्यात आली होती. मात्र या पडला न्याय देत या अधिकाऱ्यांनी कामगिरी  चोख बजावली आहे. हे काम पाहता आता चालू आर्थिक वर्षात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी विभागाने या अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी दिली आहे.

: प्रभारी प्रशासन अधिकरी रवींद्र धावरे यांना सोपवण्यात आलेली जबाबदारी

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय, तसेच धायरी आणि साडे सतरानळी या समाविष्ट गावांची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.

: प्रभारी प्रशासन अधिकरी तथा अधीक्षक बब्रुवान सातपुते  यांना सोपवण्यात आलेली जबाबदारी

शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय, तसेच शिवने आणि उत्तमनगर या समाविष्ट गावांची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.

: प्रभारी प्रशासन अधिकरी तथा अधीक्षक राजेश कामठे यांना सोपवण्यात आलेली जबाबदारी

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय, तसेच आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द आणि उरुळी देवाची या समाविष्ट गावांची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.