Infosys | PMPML | ‘इन्फोसिस’ कर्मचाऱ्यांची ने-आण  आता ‘पीएमपीएमएल’च्या स्मार्ट एसी ई बस मधून

Categories
Breaking News पुणे

पीएमपीएमएलचा इन्फोसिस कंपनीबरोबर करार

‘इन्फोसिस’ कर्मचाऱ्यांची ने-आण  आता ‘पीएमपीएमएल’च्या स्मार्ट एसी ई बस मधून

पीएमपीएमएल कडून विविध कंपन्यांचे कर्मचारी ने-आण करण्यासाठी ई-बस करारावर देण्याचे योजनेनुसार इन्फोसिस कंपनीबरोबर पीएमपीएमएलने करार केला आहे. त्यानुसार इन्फोसिस कंपनीला त्यांचे कर्मचारी ने-आण करणेसाठी मासिक करारावर विविध ११ मार्गांवर एकूण ११ स्मार्ट एसी ई-बस आज पासून सुरू करण्यात आल्या.

हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनी येथे उद्घाटन सोहळा घेवून सदरच्या ई-बसेस मार्गस्थ करण्यात आल्या. पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालिका मा. डॉ. चेतना केरूरे, इन्फोसिसचे व्हाईस प्रेसिडेंट व डिलीव्हरी हेड  प्रविण कुलकर्णी यांच्या हस्ते ई बसेसना हिरवा झेंडा दाखवून बसेस मार्गस्थ करण्यात आल्या. याप्रसंगी इन्फोसिसच्या असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट व सिनिअर रिजनल हेड फॅसिलीटीज मा. श्रीमती विजयालक्ष्मी मणी, रिजनल मॅनेजर फॅसिलीटीज जय सुर्यवंशी, सिनिअर मॅनेजर फॅसिलीटीज नितीन मांजरे, पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन)  दत्तात्रय झेंडे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (कमर्शियल) सतिश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी  चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, असि. डेपो मॅनेजर श्री. राजेश जाधव, नियोजन विभागातील अधिकारी श्री. नवनाथ बडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हडपसर, मुंढवा चौक, वारजे पूल, आकुर्डी, कळस, निगडी, पिंपरी रोड, सांगवी, दांडेकर पूल, चिंचवड गाव या ठिकाणाहून इन्फोसिस कंपनीपर्यंत इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी ११ स्मार्ट एसी ई बस निर्धारीत वेळेनुसार उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.