Maratha Students | मराठा क्रांती मोर्चा व मराठा विद्यार्थ्याकडून सरकारचे अभिनंदन

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चा व मराठा विद्यार्थ्याकडून सरकारचे अभिनंदन

 

सारथी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या मुख्य कार्यालयाजवळ मराठा क्रांती मोर्चा पुणे व मराठा समाजातील विद्यार्थी यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.

मुंबई येथील सह्याद्री अतिगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. यामध्ये सार्थीच्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन डेट प्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचे मान्य करण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्राचे मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष  चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह उपसमितीचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी यांची मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयकांसमवेत बैठक पार पडली. यावेळी 2019 ते 2022 यामधील शिष्यवृत्ती मिळवणारे विद्यार्थी यांना रजिस्ट्रेशन डेट पासून शिष्यवृत्ती देण्याचे मान्य करण्यात आले. त्याचप्रमाणे येथून पुढे सर्वांना रजिस्ट्रेशन डेट पासून शिष्यवृत्ती देण्याचे मान्य करण्यात आले.
गेले पाच वर्ष यासंदर्भात विद्यार्थ्यांनी सारथी संस्थे समोर अनेक वेळा आंदोलने केली. मराठा क्रांती मोर्चा व विद्यार्थ्यांची मागणी होती.

यावेळी सचिन आडेकर समन्वय मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर, अजय पाटील उपाध्यक्ष मराठा महासंघ, अनिल ताडगे , सचिन दरेकर, महेश पवार, राकेश भिलारे , देवीदास लोणकर , योगिता पडवळ , अनुपमा जगताप, प्रियांका सुंबे , सोनाली म्हस्के , सुशील जामकर , विकास इक्कर , अंबादास मेव्हणकर , उमेश खंदारे , अंकिता पवार उपस्थित होते.

—-

मी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांच्या सह उपसमितीतील सर्व मंत्र्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. गेली ५ वर्षे आम्ही सातत्याने हि मागणी करीत होतो आता या निर्णयामुळे मराठा समाजातील शेकडो विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.

सचिन आडेकर, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर

Taradoot : Sarathi : तारादूत सुरु करण्यासाठी मराठा संघटनाचे आंदोलन 

Categories
Education social पुणे महाराष्ट्र

तारादूत सुरु करण्यासाठी मराठा संघटनाचे आंदोलन

: सारथी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुणे : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच शाश्वत विकासासाठी, सारथीच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तारादूत प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. अजितदादा पवार यांनी दिनांक 19 जून 2021 रोजी झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. तरी आज चार महिने पूर्ण होत आहे तरी पण तारादूत प्रकल्प हा सुरू झालेला नाही.त्यामुळे विवीध मराठा संघटना तसेच मराठा क्रांती मोर्चा  20 आॕक्टोंबर पासून सारथी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करत आहेत. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सचिन आडेकर  यांनी दिली.

: उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश

याबाबत सचिन आडेकर यांनी सांगितले कि दिनांक १९/०६/२०२१ रोजी मा. अजित दादा पवार, युवराज छत्रपती संभाजी राजे, मराठा क्रांती मोर्चा सर्व समन्वयक, तारादुत प्रतीनीधी तसेच सारथी संचालक मंडळ यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मा. अजित दादानी तारादुत प्रकल्प सुरु करण्याचे आदेश देउनही तारादुत प्रकल्प अद्यापही सुरु झालेला नाही. सारथीच्या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ द्यावी लागत आहे. यासाठी तारादुत प्रकल्प हा महत्वाचा आहे. तारादुत प्रकल्प तात्काळ सुरु करुन सर्व प्रशिक्षीत तारादुतांना सारथी अंतर्गत किवा बाहय स्त्रोतामार्फत नियुक्तया देण्यात याव्या. अन्यथा सर्व मराठा संघटनांना सोबत घेउन तारादुत दिनांक २०/१०/२०२१ पासुन सारथी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. असा इशारा आम्ही दिला होता. त्यानुसार आम्ही हे आंदोलन सुरु केले आहे. असे ही आडेकर म्हणाले.