MAV : Pune : महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांना हिमालयात संन्यास घेण्यासाठी जाण्याकरीता निधी केला गोळा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांना हिमालयात संन्यास घेण्यासाठी जाण्याकरीता निधी केला गोळा

उत्तर कोल्हापूर मतदार संघाच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजया निमित्त महाविकास आघाडीतर्फे आनंदोत्सव

 

उत्तर कोल्हापूर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव या १८००० अधिक मताने पोट निवडणुकीत निवडून आल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने भारतीय जनता पक्षाच्या सत्यजीत कदम यांना पराभूत करून महाविकास आघाडीचा झेंडा पुन्हा फडकविला. या विजयाचा आनंदोत्सव आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी साजरा केला. महाविकास आघाडी सरकारचा विजय असो अशा घोषणा देवून फटाके वाजवून, लाडू वाटून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला जल्लोष केला.

यावेळी  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, ॲड. अभय छाजेड, गजानन तरकुडे, अरविंद शिंदे, आबा बागुल, वीरेंद्र किराड,  उपस्थित होते.

     यावेळी आपले मनोगत व्‍यक्त करताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘भारतीय जनता पक्षाने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. दिवंगत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी ही पोट निवडणुक बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विनंती केली परंतु ते त्यास अनुकूल नव्‍हते. महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी मेहनत करून कोल्हापूरची जागा राखली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये तळ ठोकून बसले होते. कोल्हापूरच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नक्की निवडून येणार अन्यथा मी राजकीय सन्यास घेईल असे म्हटले होते परंतु कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारले आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला. काँग्रेस  पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळाले. कोल्हापूरचे पालक मंत्री सतेज पाटील यांचा या विजयात सिंहाचा वाटा होता.

      यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले की, ‘‘उत्तर कोल्हापूरची निवडणुक ही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची नांदी होती. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी खोटे आरोप करून कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अशयस्वी ठरले. कोल्हापूरच्या जनतेने महाविकास आघाडी सरकारवर विश्वास टाकून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी केले.’’

     यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हिमालयात सन्यास घेण्यासाठी जाण्याकरीता निधी गोळा करण्यात आला.

     यावेळी शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, महिला अध्यक्षा पुजा आनंद, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, विठ्ठल गायकवाड, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, प्रविण करपे, द. स पोळेकर, अविनाश अडसुळ, अनुसया गायकवाड, नलिनी दोरगे, शारदा वीर, संतोष डोके, ॲड. नंदलाल धिवार, मुन्नाभाई शेख, हनुमंत पवार, शिलार रतनगिरी, दिपक ओव्‍हाळ, किशोर मारणे, राजू मगर, जावेद निलगर, प्रशांत टेके, विशाल गुंड, आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.