Palkhi ceremony : जगद्गुरू तुकोबा महाराज अन् ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

जगद्गुरू तुकोबा महाराज अन् ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. २० जून रोजी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू होणार आहे. तर २१ जून रोजी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड उत्साहाने वारकरी देहू नगरीत दाखल होतील, अस देहू संस्थानाकडून सांगण्यात आलं आहे.

मागील दोन वर्षांपासून देशात करोना संकट असल्याने नियम व अटींचं पालन करून हा पालखी सोहळा पार पडला आहे. पण यावर्षी करोना संकट काहीसं कमी झालं झालं आहे. त्यामुळे सध्या देहू आणि आळंदी येथे पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जगद्गुरू संत तुकोबांची पालखी २० जून रोजी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून देशात करोना संकट असल्याने काही मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आलं होतं. यावर्षी करोनाच संकट काहीसं कमी झालं आहे. पालखी सोहळ्याची तारीख जाहीर झाल्याने जोरदार तयारी सुरू झाली आहे. अखेर दोन वर्षानंतर हा पालखी सोहळा संपन्न होतोय, त्यामुळे लाखोंच्या संख्येनं वारकरी देहूत दाखल होतील, अशी माहिती माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.

२० जून रोजी तुकोबांच्या पालखीचं पंढरपूकडे प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असेल. आषाढी एकादशीला म्हणजे १० जुलै रोजी तुकोबांची पालखी पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा घालेल.

Nitin Gadkari : Palkhi Road : पालखी मार्गावरून चालत  येणाऱ्या  वारकऱ्यांसाठी खुशखबर!

Categories
Breaking News cultural महाराष्ट्र

पालखी मार्गावरून चालत  येणाऱ्या  वारकऱ्यांसाठी खुशखबर!

: सोयीसाठी रस्त्यावर गवत व टाईल्स

पंढरपूर  – संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर गवत व टाईल्स बसविण्यात येणार आहेत. शिवाय वाखरी ते पंढरपूर या हा रस्ताही मोठा करण्यात येणार असून यासाठी ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, याच कामात रेल्वे पुलाची सुधारणारही करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांनी सांगितले.

राज्यातील हे महामार्ग एकूण 223 किमीचे असून यासाठी अंदाजे रक्कम 1180 कोटी रुपये खर्च होत आहे.  राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पंढरपूर  ते आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि पंढरपूर ते देहू संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू करण्यात आल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अन्य देशातील मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार, खासदार आदी उपस्थित होते.