Pimpari Chinchwad Police | पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण

Categories
Breaking News Political पुणे

Pimpari Chinchwad Police | पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण

| दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Pimpari Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात (PCPC) कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Pune Guardian Minister Chandrakant Patil) यांनी केले. (Pimpari Chinchwad Police)
 पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात (Pimpari Chinchwad Police Commissionerate) आयोजित जिल्हा नियोजन निधीतून (DODC) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या ५ स्कॉर्पिओ आणि १२ बोलेरो  वाहनांच्या  लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane), माजी खासदार अमर साबळे (Ex MP Amar Sabale), आमदार  महेश लांडगे (MLA Mahesh Landge),  दिलीप मोहिते, उमा खापरे, पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे (PCPC Vinay Kumar Chaube), सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत  दामिनी पथकांची संख्या वाढवावी. त्यासाठी वाहने कमी पडू देणार नाही. सायबर क्राईम लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दिशा उपक्रमात सहभागी ७ अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत  बैठक घेऊन त्यांच्या सहभाग वाढवावा. ज्येष्ठ नागरिक कक्षाद्वारे ज्येष्ठांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.
नवीन वाहनांच्या समायोजनामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयातील बरासचा वाहतुकीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार असून गस्त घालण्यासाठी वाहनांची मदत होईल.  पोलिसांच्या वसाहती, रिक्त पदे, जलद प्रतिसाद पथक, प्रलंबित प्रस्ताव व इतर मागण्या आणि समस्या याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
—-
News Title | Pimpari Chinchwad Police | Inauguration of new vehicles of Pimpri Chinchwad Police Commissionerate by the Guardian Minister

Warkari Lathi-Charge Update | आळंदीतील लाठीमाराबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांचा खुलासा 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Warkari Lathi-Charge Update | आळंदीतील लाठीमाराबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांचा खुलासा

| आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट | विनयकुमार चौबे

Warkari Lathi-Charge Update | “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) आळंदीहून (Alandi) प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधव आणि   पोलिस यांच्यात झटापट झाली. (Warkari Lathi-Charge) याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpari chinhwad police) खुलासा दिला आहे. (Warkari Lathi-Charge Update)

विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड (PCMC CP Vinaykumar Chobey) यांनी सांगितले कि, पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे. असे चौबे यांनी म्हटले आहे. (Alandi Lathi-Charge news)

– —

News Title | Warkari Lathi-Charge Update | Disclosure of Pimpri Chinchwad Police regarding lathi in Alandi | There was no lathi-charge, but a minor skirmish Vinay Kumar Choubey