PM Modi tour pune : Sharad pawar : अर्धवट कामाचं उदघाटन करताना काही संकट आल्यास .. : शरद पवारांनी PM मोदींना दिला इशारा 

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

अर्धवट कामाचं उदघाटन करताना काही संकट आल्यास ..

: शरद पवारांनी PM मोदींना दिला इशारा 

पुणे : पुणे मेट्रोचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या होणार आहे. त्यासाठी शहरात मोठी तयारी सुरु आहे. पण या उद्घाटन कार्यक्रमावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी गंभीर इशारा दिला आहे. मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन होतंय, काही संकट निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, असं शरद पवार यांनी PM मोदींना उद्देशून म्हटलं आहे.

पवार म्हणाले, “माझी आज देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे की ते उद्या पुण्यात येत आहेत. त्यांच्या दौऱ्याबद्दल काही तक्रार नाही, पण या मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही त्याच उदघाटन होत आहे. नदी सुधार करण्याची गरज आहे. नदी सुधारण्याचं काम हाती घेतलं पाहिजे. पण या नदीवर अनेक धरणं आहेत. त्यामुळं कधी ढगफुटी झाली तर या मोठ्या संकटाची झळ आजूबाजूच्या गावातील लोकांना बसणार आहे. अर्धवट कामाचं उदघाटन केलं जातंय त्याच स्वागत करू, पण अशा अर्धवट कामामुळं जर काही संकट निर्माण झाल तर आपल्यालाच ते पाहायला लागेल” नवीन नदी सुधार प्रकल्पाबाबत अधिकारी आणि नेत्यांशी बोलू यावर तोडगा काढू असंही त्यांनी म्हटलं आहे.

बऱ्याच दिवसांनी या परिसरात आलो आहे. पुणं बदलतंय, शहराचा चेहरा बदलतोय, पूर्वी इकडे जुन्या पद्धतीच गाव होतं. नागरिककरण वाढलं त्यामुळं आता जुनी ओळख राहिली नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आले आहेत. पण एकूणच पुणे शहरातील कामांबाबत आता सामंजस्याची कमतरता भासत आहे, असंही शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

Heat of PMC Election 2022 : मोदी, पवार, ठाकरे यांच्या सभा!

Categories
Breaking News PMC Political पुणे

मोदी, पवार, ठाकरे यांच्या सभा!

: मार्चपासून शहरातील राजकीय वातावरण तापणार

: महापालिका निवडणुकीची तयारी

 पुणे : महापालिका निवडणुकांचा (PMC election) कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी शहरात राजकीय ज्वर चढण्यास सुरूवात झाली आहे. मार्च महिन्यात  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार (NCP chief Sharad pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या सभांनी शहरातील राजकीय वातावरण महापालिका निवडणूकांच्या तोंडावर चांगलेच तापणार आहे.

दि. 1 मार्चला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा “परिवार संवाद’ पुण्यात येणार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे नेते शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार असून महापालिका निवडणूकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष विधानसभा निहाय बैठका घेणार आहेत. त्यानंतर दि. 5 मार्चला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते शहरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या विकासकामांची उद्घाटने करणार असून ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

 

त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते महापालिकेच्या वेगवेगळया विकासकामांचे भूमीपूजन तसेच मेट्रोचे उद्घाटनही करणार आहेत. यानिमित्ताने त्यांची जाहीर सभा घेऊन महापालिकेच्या निवडणूकांसाठी शक्‍ती प्रदर्शन करण्याचे भाजपकडून नियोजन असून पंतप्रधान मोंदीच्या दौऱ्याचे नियोजन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: लक्ष देऊन करीत आहेत. त्यानंतर लगेचच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही जाहीर सभा दि. 9 मार्चला होणार आहे. पक्षाच्या वर्धापनदिना निमित्ताने पुण्यातील शहर पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर ही सभा पुण्यात घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Narendra modi : pune NCP : महाराज मोदींना माफ करा म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

 

महाराज मोदींना माफ करा म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे :. पंतप्रधान म्हणून देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी देऊन रयतेचे कल्याण करण्यासाठी प्रेरित करा. खरा राजधर्म शिकण्याची संधी देण्यासाठी माफ करा असे गाऱ्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराज यांच्यापुढे मांडण्यात आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला’ असे विधान केले. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत असून राज्यातील कानाकोपऱ्यात नरेंद्र मोदींचा निषेध केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या भूमिचा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या मनात कायमच द्वेष राहिला आहे. त्यामुळेच ते या भूमिचा कायमच अपमान करीत आले आहेत याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. ज्यांनी आयुष्यभर केवळ द्वेषाचं राजकारण केलं ते आजही दोन जातींमध्ये, दोन धर्मांमध्ये, दोन राज्यांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात उभी फूट पडणारा पंतप्रधान या देशाने कधीच बघितला नव्हता जो आज आपण नरेंद्र मोदींच्या रुपात बघत आहोत. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे, महाराष्ट्राचा अवमान करून नरेंद्र मोदींनी त्यांच्या बलिदानाचाही अवमान केला आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेतेही नरेंद्र मोदींच्या गुलामगिरीत गुंग असल्याने त्यांनाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काहीही देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील, देशातील जनता येत्या काळात भाजपला धडा नक्की शिकवणार अशी संतप्त भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

यावेळी महानगपालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रदेश प्रतिनिधी  प्रदीप देशमुख, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष  किशोर कांबळे, माजी नगरसेविका शशिकलाताई कुंभार, शहर समन्वयक  महेश हांडे, कार्तिक शिंदे, पूनम पाटील , सुवर्णा सावर्डे, किरण कद्रे, श्वेता मिस्त्री, प्रीती धोत्रे, राखी श्रीराव, सानिया झुंजारराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

National Start up day : PM Modi : १६ जानेवारी  नॅशनल स्टार्ट-अप डे म्हणून साजरा केला जाणार : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा 

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

१६ जानेवारी  नॅशनल स्टार्ट-अप डे म्हणून साजरा केला जाणार

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली: भारतातील स्टार्ट अपची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. यासह या स्टार्टअप्सना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्टार्टअप कल्चर तयार करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून आता १६ जानेवारी हा दिवस नॅशनल स्टार्ट-अप डे म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्ट-अपशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच इनोव्हेशनबाबतचे आकर्षण निर्माण करणे आणि इनोव्हेशनलला इन्स्टिट्यूशनलाइज करणे हा आमचा प्रयत्न आहे. जवळपास ९ हजारांहून अधिक अटल टिकरिंग लॅब्समधून शाळेत इनोव्हेट करणे, नव्या कल्पना निर्माण करण्यासाठी संधी देण्यात येत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

या दशकाला भारताचा techade

या दशकाला भारताचा techade म्हटले जात आहे. या दशकात इनोव्हेशन, इंटरप्रेन्यूरशीप आणि स्टार्ट-अप इकोसिस्टिमला मजबूत करण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. त्याचे तीन महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्यट्ये म्हणजे इंटरप्रेन्यूरशीपला सरकारी प्रक्रियांच्या जाळ्यातून ब्युरोक्रॅटिक्सपासून मुक्त करणे होय. दुसरे म्हणजे इनोव्हेशनला प्रमोट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल मॅकेनिझमची निर्मिती करणे आणि तिसरे म्हणजे तरुण इनोव्हेटर्स, युवा उद्योजकांची हँडल होल्डिंग वाढवणे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

२८ हजाराहून अधिक पेटंट्सला मंजुरी 

गेल्या वर्षी २८ हजारांहून अधिक पेटंट्सला मंजुरी देण्यात आली आहे. तर २०२०-२१ मध्ये अडीच लाखाहून अधिक ट्रेडमार्कसची नोंदणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर १६ हजारांच्याही पुढे कॉपीराइट्सला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा आकडा दुपटीपेक्षा अधिक आहे. इनोव्हेशनबाबत देशात मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सममध्ये भारताची रँकिंग सुधारली आहे. २०१५ मध्ये या रँकिंगमध्ये भारत ८१ व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ४६ व्या क्रमांकावर आला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द  : कोरोनाच्या धास्तीने पुढे ढकलला दौरा 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

: कोरोनाच्या धास्तीने पुढे ढकलला दौरा

पुणे : आगामी महापालिका निवडणुक, पुणे मेट्रो उदघाटन, भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा, महापालिकेच्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण अशा विविध कार्यक्रमांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रमोदी येत्या २८ जानेवारीला पुणे दौऱ्यावर येणार होते. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सूत्रांनी दिली होती. पण महाराष्ट्र आणि पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आगामी महापालिका निवडणुक आणि मेट्रो उदघाटन या कार्यक्रमासाठी डिसेंबरअखेर पुणे दौरा निश्चित झाला होता. पण काही कारणास्तव तो एक महिना पुढे ढकलण्यात आला. पण आता संपूर्ण देशभरात कोरोर्ण रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चे रद्द करण्यात आले आहेत.

देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही रुग्णवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळेच कालपासून संपूर्ण राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक सभांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.