Amnesty Scheme 2nd Phase : PMC : Property Tax : अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला नागरिकांचा अल्प प्रतिसाद  : मिळाले फक्त 35 कोटी 

Categories
Breaking News PMC पुणे

अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला नागरिकांचा अल्प प्रतिसाद

: मिळाले फक्त 35 कोटी

: फक्त निवासी मिळकतींसाठी होती योजना

पुणे : महापालिका प्रशासनाकडून दोन टप्प्यात अभय योजना राबवण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात महापालिकेला 109 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर दुसऱ्या टप्प्यात या योजनेतून महापालिकेला 35 कोटी मिळाले आहेत. दरम्यान मिळकत करातून या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत 1579.66 कोटी जमा झाले आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

: आतापर्यंत टॅक्स मधून पालिकेला मिळाले 1580 कोटी

महापालिकेने निवासी मिळतीसाठी अभय योजना लागू केली होती. 1 कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारासाठी ही योजना राबवबयात आली होती. या योजनेची मुदत 26 जानेवारी पर्यंत होती. ती वाढवून 28 फेब्रुवारी करण्यात आली होती.  स्थायी समितीने हा निर्णय घेतला होता. शिवाय ही योजना सर्वासाठी लागू करावी, असे ही समितीने म्हटले होते. महापालिका आयुक्तांनी या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली होती. 9 फेब्रुवारी पासून यावर अंमल सुरु झाला होता. मात्र ही ही योजना निवासी मिळकतींसाठीच असेल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले होते. याबाबत महापालिकेने जाहीर आवाहन देखील केले होते. दुसऱ्या टप्प्यातील अभय योजनेतून महापालिकेला फक्त 35.50 कोटी मिळाले आहेत. तर पहिल्या टप्प्यातील योजनेतून महापालिकेला 108.83 कोटी मिळाले होते. त्यामुळे हा कमी प्रतिसाद मानला जात आहे. दरम्यान मिळकत करातून या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत 1579.66 कोटी जमा झाले आहेत.