PMC Budget 2024-25 | पुणे महानगरपालिका २०२४-२५ च्या अंदाजपत्रकातील ठळक बाबी जाणून घ्या

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Budget 2024-25 | पुणे महानगरपालिका २०२४-२५ च्या अंदाजपत्रकातील  ठळक बाबी जाणून घ्या 

1. पाणीपुरवठा

(भांडवली तरतूद र रु ५८४. ९६ कोटी + महसुली तरतूद र.रु ९५२.८९ कोटी = र. रु. १५३७.८५ कोटी)

२४* समान पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत पुणे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी नियोजित १४१ झोन पैकी सद्यस्थितीत ५६पाणीपुरवठा झोनची कामे पूर्ण व सुमारे ६० कि.मी.लांबीचीजलवाहिनी पूर्ण व १.४५ लाख AMR स्मार्ट वॉटर मीटर बसवले आहेत.
सदर योजने अंतर्गत ७७ साठवण टाक्या बांधणे,१८०० कि.मी.ची जलवाहिनी टाकणे व ३.१५ लक्ष जलमापक बसविणे हि कामे अंतर्भूत आहे.
मा.केंद्रशासनाच्या अमृत मिशन अंतर्गत ५० सेवा जलाशय (Service Reservoirs(SR)) पूर्ण झाले असून, त्याव्यतिरिक्त २२ सेवा जलाशय विविध टप्प्यावर प्रगतीपथावर आहेत.
तसेच शहरामध्ये ४ ठिकाणी नागरी सुविधा केंद्रांची कामे पूर्ण करण्यात आलेली असून, २ जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत पंपिंग स्टेशनची कामे प्रगती पथावर आहेत.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये दि.१५.०१.२०२४ अखेर मीटरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाणीपट्टी र.रु.९०.५० कोटी इतकी जमा झालेली आहे.
सन २०२४-२५ मध्ये मार्च २०२५ अखेर एकूण ७० साठवण टाक्या कार्यान्वित करणे, सुमारे ३०० कि.मी.लांबीची नवीन वितरण व्यवस्था विकसीत करणे, अंदाजे १ लक्ष नवीन जलमापक बसविणे व सर्व १४१ झोन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पुणे शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये समान पाणीपुरवठा योजनेसाठी डी.पी.आर.तयार कण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात बावधन बुद्रुक (५ टाक्यांचे बांधकाम व ३५ कि.मी पाण्याची लाईन), सुस- म्हाळुंगे (६ टाक्यांचे बांधकाम व सुमारे ७७ कि.मी.पाईपलाईन विकसन) करण्यात येणार आहे. लोहगाव व वाघोली येथे १३ टाक्यांचे बांधकाम व सुमारे ४५० कि.मी पाण्याची लाईन विकसीत करण्याचे नियोजीत आहे.
2. मलनिःसारण

( भांडवली तरतूद र रु ९१७.७८  कोटी + महसुली तरतूद र.रु ३४५.६०  कोटी = र. रु. १२६३.३८  कोटी)

सिवरेज मास्टरप्लान २०१७ नुसार सन २०२४-२५ मध्ये जवळपास ८० कि.मी विविध व्यासाच्या मलवाहिन्या टाकण्याचे काम प्रस्तावित आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत १५ व्या वित्त आयोगांतर्गत पुणे शहरासाठी शहरी पूर जोखीम व्यवस्थापन अंतर्गत पुणे शहरातील वारंवार पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणांच्या कामांसही निधी उपलब्ध होणार आहे.
पुणे मनपा हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये ड्रेनेज लाईन टाकणेबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु असून सन २०२४-२५ मध्ये मलवाहिन्यांचे नेटवर्क तयार करण्याचे काम प्रस्तावित आहे .

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळामुठा नदीचेप्रदुषण नियंत्रण करणे (जायका)

जायका प्रकल्पांतर्गत पुणे शहरात विविध ११ ठिकाणी ३९६ एम.एल.डी. स्थापित क्षमतेची मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार असून,त्याचे १५ वर्षे देखभाल दुरुस्ती करणे अंतर्भूत आहे. सदर मैलापाणीशुद्धीकरण केंद्राची कामे प्रगतीपथावर आहेत.
सुमारे ५५ कि.मी. लांबीच्या मुख्य मलवाहिन्या विकसित करण्याचे काम सुरु आहे.
सदर प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुळामुठा नदीचे प्रदूषण कमीहोण्यास मदत होणार आहे.
सदर प्रकल्पामध्ये अंतर्भूत असलेल्या सेंट्रल स्काडा सिस्टीम, जी.आय.एस., एम.आय.एस. प्रणालीबाबत निविदा प्रक्रिया पूर्णकरून कामे करणेत येणार आहेत .  
3. घनकचरा व्यवस्थापन

( भांडवली तरतूद र.रु १०५.४० कोटी + महसुली तरतूद र.रु ८१७.५२ कोटी = र.रु.९२२.९२  कोटी)

पुणे शहराला SS2023 मध्ये राष्ट्रीय स्तरावर १० वा क्रमांक व महाराष्ट्र राज्यामध्ये २ रा क्रमांक प्राप्त झाला असून GFC रेटिंग अंतर्गत ५ स्टार मानांकन आणि ODF++ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. केंद्र शासनाच्या Ministry of Housing and Urban Affairs यांच्या हस्ते पुणे शहराला सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे शहरातील घनकचरा संकलन व वाहतुकीकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत विविध प्रकारची सुमारे ८२५ वाहने पुरविण्यात येतात. यातील २५७ कचरा वाहने भाडेतत्वावर घेण्यात येत असून सदरची वाहने बी एस – ६ प्रदूषण मानांकनाचे असून यातील छोटी घंटागाडी संवर्गातील वाहने सीएनजी इंधनावर चालणारी आहेत. यामुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजात सुसूत्रता येऊन प्रदूषण नियंत्रणास सुद्धा मदत होणार आहे
महापालिकेच्या घनकचऱ्याच्या वाहतुकीसाठी प्रायोगिक तत्वावर १० इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केली आहे.
देवाची ऊरुळी येथील कचरा डेपोत साचलेल्या जुन्या कचऱ्यापैकी सुमारे २० लक्ष मे. टन कचऱ्यावर बायोमायनिंग / बायो-रिमेडिएशन प्रक्रिया करण्यात आलेली असून, त्याद्वारे सुमारे ३० एकर जागा कचरामुक्त करून रिकामी करण्यात आलेली आहे.
पुणे शहरात दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन करणे, वाहतूक करणे, प्रक्रिया व शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे व तसेच प्रकल्पांमध्ये निर्माण होणाऱ्या रिजेक्ट, देवाची उरळी येथील जुन्या कचऱ्यावर कॅपिंग व बायोमायनिंग दैनंदिन झाडणकाम, दैनंदिन निर्माण होणाऱ्या राडारोडा संकलन वाहतूक व प्रक्रिया करणे
Integrated Solid Waste Management (ISWM) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभाग व मोटारवाहन विभागाकडील सर्व वाहने, कचरा प्रकल्प, मनुष्यबळ यांचे संगणकीय एकत्रीकरण करण्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. तसेच दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे करिता कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे.
पुणे मनपा व पुणे छावणी परिषद यांच्या संयुक्ती विद्यामानाने पुणे छावणी परिषद येथील अस्तित्वातील ५० मे.टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे १०० मे.टनाने क्षमतावाढ करण्यात आली असून, प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे.तसेच ८ एकर परिसरात शास्त्रोक्त भुभराव बांधणेचे काम सुरु आहे.
कात्रज कचरा हस्तांतरण केंद्र येथे आधुनिक पद्धतीने चेंजओव्हर सिस्टम,20 cu.m क्षमतेचे डिटेचेबल कंटेनर, वाहनांवर बसवलेले हुक लोडर आणि हॉपरसह कॉम्पॅक्शन युनिटच्या स्थापनेसह 200 MTPD क्षमतेचा मेकनाईज वेस्ट ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचे काम सुरु आहे.
नागरिकांद्वारे रिसायकल आणि सर्कुलरिटी उपक्रमाला चालना देण्यासाठी, पीएमसीने प्रत्येक वॉर्डमध्ये रिसोर्स रिसायकलिंग सेंटर (आर.आर.सी) स्थापन केले आहे आणि रिसायकलिंग विक्रेते लिंक केले आहेत.
कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन निर्मिती करणेबाबत देशातील पहिला अभिनव प्रकल्प पुणे मनपामार्फत (३५० मे.टन क्षमता असलेले रामटेकडी येथे) उभारण्याचे नियोजन आहे.
वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील (३०० मे.टन) देखभाल दुरुस्तीचे काम सुरु आहे या वर्षात सदर प्रकल्प ७५० मे.टन क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प : अस्तित्वातील बंद पडलेले/नादुरुस्त असलेले बायोगॅस प्रकल्प पाडून त्याठिकाणी DBOO तत्वावर ओल्या कचऱ्याचे प्रकल्प शहराच्या ४ ठिकाणी कचऱ्यापासून ब्रिकेटस बनविण्याचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन
नव्याने समाविष्ट २३ गावामधील घनकचरा व्यवस्थापन विषयक विविध कामांसाठी तसेच अस्तित्वातील जागा ताब्यात घेऊन तेथे कचरा हस्तांतरण केंद्र/कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन
कचरा रॅम्पवरून सुका कचरा सुमारे १५० मे.टन प्रतिदिन क्षमतेने सिमेंट कंपन्यांमध्ये इंधनासाठी वापरण्याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
देवाचीऊरळी  कचरा डेपो येथील जागेत कार्यरत असलेल्या ३५० मे.टन क्षमतेच्या प्रकल्पाची ५०० मे.टनापर्यंत क्षमतावाढ करण्याचे नियोजन
गार्डन वेस्ट : सद्यस्थितीत सुमारे १०० मे.टन गार्डन वेस्ट कचरा संकलन व वाहतूक करून अशा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
RAMP आधुनिकीकरण: कात्रज हस्तांतरण केंद्र येथे Mechanized Transfer Station उभारण्याचे नियोजन
4. आरोग्य (महसुली तरतूद र रु ५१६.०५ कोटी)
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत ९६ आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी जागा प्राप्त करून ९६ आरोग्यवर्धिनी केंद्रे पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल  
पुणे महानगरपालिका हद्दीतील विरंगुळा केंद्र येथे पाळीव कुत्रे यांना कात्रज या ठिकाणी नव्याने डॉग पार्क करण्याचे प्रस्तावित
Smart Project अंतर्गत शेळी/मेंढी कत्तलखान्याचे आधुनिकीकरण/नूतनीकरण करणेस World Bank यांच्याकडून अनुदान प्राप्त होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी महाविद्यालय व रुग्णालय

वैद्यकीय महाविद्यालयाकडील विद्यार्थी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील क्रिकेट टीम मध्ये निवड, Quiz (सातारा) येथील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला.
वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल चांगला लागला आहे.(१०० पैकी १६ विद्यार्थी मेरीटमध्ये आले आहेत)
नायडू कॅम्पस येथील Existing इमारतीमध्ये द्वितीय शैक्षणिक वर्षाचे वर्ग सुरु झाले आहे.
5. नगर नियोजन

शहर अभियंता कार्यालय (नगर रचना व नगर नियोजन विभाग)

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट ११ गावांपैकी उरुळी देवाची (TPS-6) साठी १०९.७८ हेक्टर व फुरुसुंगी(TPS-9) साठी २६०.६७ हेक्टर आणि फुरुसुंगी (TPS-10) साठी २३८.५० हेक्टर याप्रमाणे एकूण ६०८.१५ हेक्टर क्षेत्रावर प्रारूप नगररचना परियोजना प्रसिद्ध करणेस मा.मुख्य सभेची मान्यता प्राप्त आहे.
नगर रचना योजनेच्या अंमलबजावणीमुळे पुणे महानगरपालिकेला एकूण क्षेत्राच्या सुमारे ४०% म्हणजेच २४३.५८ हेक्टर क्षेत्र विनामोबदला व विनाविलंब ताब्यात येणार आहे.
टी.पी स्कीममध्ये प्लॉट बाउंड्री स्टोन लावणे तसेच टी.पी.स्कीम करणे करिता सल्लागार नेमणे अशी कामे सुरु आहेत.
पुणे महानगरपालिकेने नगर रचना योजना क्र.६ उरुळी देवाची २४ मी.रस्ता विकसित करण्यासाठी हाती घेतला असून सदर काम किमान दोन वर्ष चालणार आहे.
विकास योजना कक्ष : गोखले इन्स्टिट्यूट संस्थेमार्फत ११ गावांमध्ये केलेले नमुना सर्व्हेक्षण माहितीच्या आधारे  प्रारूप विकास योजना आराखडा तयार करण्याचे काम सुरु.

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र.३ अंतर्गत पुणे महानगरपालिकेतर्फे हडपसर,वडगाव(खु),खराडी येथे HDH/EWS आरक्षित जागेवर एकूण ५ प्रकल्पांमध्ये २६५८ सदनिकांचे बांधकाम पूर्ण
सदर ५ प्रकल्पांसाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन सोडत पद्धतीने व त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने करण्यात आली होती.
Intelligent Works Management System: पुणे मनपामध्ये वापरातअसलेले Intelligent Works Management System अद्ययावत करण्यात आली आहे.
सदर संगणक प्रणाली भविष्यात SAP System द्वारे लेखाविभागाशी जोडण्यात येणार आहे.
अनधिकृत बांधकामावरील कारवाई : पक्क्या स्वरूपाचे बहुमजली अनाधिकृत बांधकामावर हायड्रॉलिक डीमॉलीशन मशीनने (जॉ-कटर)सुमारे ३,६२,५२७ चौ.फुट इतके अनधिकृत बांधकामावरील कारवाई करण्यात आली आहे.
6. वाहतूक नियोजन व प्रकल्प (भांडवली तरतूद र रु. ७६४.०५ कोटी)

नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविणे

पुणे मुळा व मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे शहरातील वाहणाऱ्या मुळा नदीची लांबी ४४.४० कि.मी.आहे.
सदरचा प्रकल्पाची एकूण ११ टप्प्यात विभागणी करण्यात आलेली आहे.
त्यापैकी संगमवाडी पूल व बंडगार्डन पूल (स्ट्रेच -९) जागेवर ४४.७०% काम पूर्ण झालेले आहे.
बंडगार्डन पूल ते मुंढवा पूल (स्ट्रेच -१० व ११) नदीच्या कडेने रस्ता पी.पी.पी.धर्तीवर क्रेडीट नोट मोबदल्याच्या स्वरूपात विकसीत करणेचे १८.१०% काम पूर्ण झालेले आहे.
वाकड बायपास ते सांगवी टप्पा क्र.१,२,३,या कामाचे निविदा सुमारे र.रु.३०३ कोटी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे खालील फायदे होणार आहे.
o स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त नदी होईल
o नदी काठचा परिसर नागरिकांसाठी खुला होणार आहे.
o नदीची पुरवहन क्षमता वाढणेस मदत होणार आहे.
पुणे शहरातील विविध वाहनतळांवर फायर फायटिंग (अग्निशमन यंत्रणा)लिफ्ट बसविणे

वर्ष २३-२४ चे उड्डाण पूल / ग्रेड सेपरेटर/ नदीवर पूल बांधणेचे कामे पूर्ण करणे

घोरपडी पुणे येथे पुणे सोलापूर व पुणे-मिरज रेल्वे लाईनवर उड्डाणपूल बांधणेचे काम सुमारे ८०% पूर्ण
सिंहगड रोड येथे नवीन उड्डाणपूल बांधणे-सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम थिएटर पर्यंत उड्डाणपूल बांधणेचे काम ६०% पूर्ण
सनसिटी,सिंहगडरोड ते कर्वेनगर नदीवर पूल बांधणेचे काम प्रत्यक्ष जागेवर काम सुरु
कोरेगाव पार्क ते कल्याणीनगर पुलाची (आगाखाना पूल) १० मी.रुंदी वाढविणेचे काम प्रत्यक्ष जागेवर सुरु
साधू वासवानी पूल (कोरेगावपार्क) ते बंडगार्डन पुलापर्यंत एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करून तदनुषंगिक कामे प्रत्यक्ष जागेवर सुरु
पुणे मनपा हद्दीतील दहा वर्षापेक्षा जास्त जुने असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, त्यामध्ये पुलांचे एकूण ४०पुलांचा समावेश असून सदर ऑडिट नुसार दुरुस्तीसाठी सुचविणेत येणाऱ्या पुलांचे प्राधान्यक्रमानुसार दुरुस्तीचे काम हाती घेणेत येणार
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे  महानगरपालिका संयुक्त विद्यमाने (प्रत्येकी ५% खर्च) सांगवी- बोपोडी मुळा नदीवर नवीन पूल बांधणेचे काम सुरु

वर्ष २४-२५  मध्ये प्रस्तावित नवीन उड्डाण पूल / ग्रेड सेपरेटर बांधणे

विश्रांतवाडी येथे ग्रेड सेपरेटर उड्डाणपूल व घोरपडी गेट क्रमांक ५८६ येथे रेल्वे उड्डाणपूल बांधणे
शास्त्रीनगर चौक ग्रेड सेपरेटर / उड्डाणपूल बांधणे
खराडी बायपास चौक येथे ग्रेड सेपरेटर बांधणे
गणेश खिंड रस्त्यावरती चार ठिकाणी उड्डाणपूल / ग्रेड सेपरेटर बांधणे
हडपसर ससाणे नगर रेल्वे गेट क्रमांक ७ येथे रेल्वे लाईनवर उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर बांधणे
खडकी रेंज हिल्स येथे रेल्वेखाली अंडरपासचे रुंदीकरण करणे
बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे चौक येरवडा येथे उड्डाणपूल / ग्रेड सेपरेटर बांधणे
गोल्फ क्लब चौक पासून आळंदी रोड या मार्गावर असलेल्या आंबेडकर चौक या ठिकाणी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर करणे
7. पथ विभाग ( भांडवली तरतूद र रु १०७०.११  कोटी + महसुली तरतूद र.रु  २०८.७९  कोटी = र. रु. १२७८.९०  कोटी)
पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, नवीन पर्यायी मार्ग निर्माण करण्यासाठी मिसिंग लिंक डेव्हलपमेंटचा प्रकल्प पुणे मनपाने हाती घेतला आहे.
यामध्ये अस्तित्वातील डी.पी.रस्त्यांना जोडणारी मिसिंग लिंक विकसित करून एक मध्यवर्ती वर्तुळाकार मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करणे
पर्यायी वाहतुकीसाठी ३३ मिसिंग लिंक विकसीत करणे,
गणेशखिंड रस्त्यावर आर.बी.आय. ते संचेती चौक दरम्यान ४५ मी.पर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले
बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रस्ता आणि बालेवाडी येथील मुख्य रस्ता यांच्या रुंदीकरणाचे काम आगामी आर्थिक वर्षात हाती घेण्यात येणार
गुंजन चौकातून वाडिया मिळकतीपर्यंत नवीन रस्त्याची लिंक मेट्रो मार्गाच्या खालून तयार करण्याचा प्रस्ताव असून, यामुळे नगर रस्त्यास नदी काठावर पर्यायी रस्ता निर्माण होत आहे.
मिशन -१५ या संकल्पना अंतर्गत शहरातील मोठ्याप्रमाणात वाहतूक असलेले मुख्य रस्ते निश्चित करून या रस्त्यांवर वाहतुकीस योग्य अशा सर्व प्रकारच्या दुरुस्त्या, आवश्यक ते रुंदीकरण, पादचारी सुरक्षा व्यवस्था, दिशादर्शक, लेन मार्क, डिव्हायडर पेंटिंग ई.सर्व बाबींचा समावेश आहे.
पीपीपी तत्वावर सद्यस्थितीत सुमारे ३६ कि.मी.लांबीची रस्त्याची कामे हाती घेण्यात आली.
यामध्ये १५ रस्त्याची खराडी,बाणेर,महमंदवाडी, कोंढवा,मुंढवा,या भागातील कामे असून, त्यामध्ये गंगाधाम चौकातील बिबवेवाडी येथील उड्डाणपुलाचे व खराडी येथील नदीवरील पुलाच्या कामाचा समावेश आहे. जागेवर सुमारे ११ कामे सुरु आहे.
पादचारी दिन पुणे मनपाने पादचारी सुरक्षा पूरक धोरण राबविलेले असून, त्यानुसार अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन प्रमाणे रस्त्याची कामे करण्यात येत आहे. शहरातील वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता नागरिकांना शहरातील रस्त्यांवर सुरक्षितपणे चालण्यासाठी सुरक्षा मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग,दिशादर्शक/फलक ई. उपाययोजना विविध रस्त्यांवर करण्यात येत आहे. यासाठी प्रतीकात्मकरित्या नागरी सहभागासह दरवर्षी ११ डिसेंबर रोजी पुणे मनपाने पादचारी दिन साजरा करण्यात येतो. या दिनामध्ये विविध चौकात रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्क्निंग ई. सुविधेसह स्वतंत्रपणे लक्ष्मी रस्त्यावर एक दिवस वाहनमुक्त पदचारी दिन साजरा करण्यात येतो.  
पुणे शहरातील रस्त्यावरील पृष्ठभागाची दुरुस्ती तसेच पुर्नडांबरीकरण तसेच खड्डे दुरुस्तीची कामे पूर्ण मनपाच्या येरवडा येथील हॉटमिक्स प्लॅट यंत्रणेमधून डांबर माल पुरवठा करून करण्यात येत असतात.
शहराचे वाढते क्षेत्र व समाविष्ट गावे लक्षात घेता अजून एक हॉटमिक्स प्लॅन्ट उभारणे प्रस्तावित
रस्ता रुंदीकरणामध्ये जात असलेल्या वृक्षाचे पुर्नवसन तसेच रस्त्यांच्याकडेला झाडे लावणे याकरिता स्वतंत्र युनिट प्रस्तावित करण्यात येत आहे.
शहरातील विविध रस्त्यांवर सेवावाहिन्या करिता होणाऱ्या खोदाईकरिता सर्व क्षेत्रीय कार्यालयनिहाय तसेच नव्याने समाविष्ट गांवाकरिता देखील रिईस्टेटमेंट करिता तरतूद प्रस्तावित
शहरातील वारंवार वाहतुकीमुळे नादुरुस्त होणारे रस्ते एफडीआर व मायक्रो सेर्सिंग टेक्नोलॉजी वापरून दुरुस्त करण्याचा एक प्रस्ताव पुणे मनपाने सदर आर्थिक वर्षात घेतला होता, त्यानुसार दत्तनगर ते भूमकर चौक हा आंबेगाव येथील रस्ता व बिबवेवाडी येथील अप्पर डेपो ते व्ही.आय.टी.चौक येथील रस्ता एफडीआर व मायक्रो सेर्सिंग टेक्नोलॉजी वापरून केलेला आहे, तसेच अन्य प्रस्तावित रस्त्यांकरिता स्वतंत्र तरतूद करण्यात येत आहे.
School Travel Improvement Plan प्रवास सुधार योजना हि अभिनव संकल्पना सुरु केली आहे. शहरातील ३ झोन मधील एकूण ९ शाळा निवडून तेथील रस्ते परिसर विद्यार्थी प्रवासासाठी सुरक्षित व स्वावलंबी करण्यासाठी प्रायोगित पद्धतीने उपाय राबविले व त्याची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित करून येत्या ५ वर्षात २० झोन या योजनेमार्फत करण्याचे नियोजन आहे.
पुणे महापालिका गतिरोधक धोरण पथ विभागाने समिती नेमून गतिरोधक धोरण व त्याची अंमलबजावणी पद्धत निश्चित केली व त्या प्रमाणे सर्व गतिरोधक शास्त्रीय पद्धतीने करण्याची सुरुवात करण्यात आली आहे.
8. पुणे महानगरपरिवहन महामंडळ ( र रु ४८२. ५२ कोटी )
भाडेतत्वावरील ३५० ई-बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, उर्वरित बसेस लवकर दाखल  होतील. पीएमपीएमएल ताफ्यातसद्यस्थितीत ४७३ बसेस आहेत. उर्वरित १७७ ताफ्यात दाखलझाल्यास कूण ई-बसेस ६५० होतील.
सन २०२४-२५ मध्ये पीएमपीएमएल बस ताफ्यात १०० स्वमालकीच्या नवीन सीएनजी बसेस व १०० नवीन ई-बसेस जीसीसी तत्वावर ४०० सीएनजी जीसीसी तत्वावर प्रवाश्यांच्या सेवेकरिता दाखल करून देणेचे प्रयोजन आहे.
महामंडळाच्या सुतारवाडी व निगडी आगारामध्ये बीओटी तत्वावर व्यापारी विकसनाचे काम करून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचे नियोजन आहे.
महामंडळाच्या आगारांमध्ये व मिळकतींवर ई-चार्जिंग स्टेशन उभारणे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे.
बीआरटी मार्गांमध्ये तसेच बसस्टॉपला ए.एन.पी.आर.कॅमेरे व सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहे.
9. उद्यान ( भांडवली तरतूद र रु  ९१.७५  कोटी + महसुली तरतूद र.रु ८०.०३  कोटी = र. रु. १७१. ७८ कोटी)
राजीव गांधी प्राणी संग्राहालय व वन्यजीव संशोधन केंद्र, कात्रज येथील बृहत आराखड्याची अंमलबजावणी प्रस्तावित
आकर्षक प्राणी ‘न्यू वर्ल्ड प्रायमेट” वर्गातील प्राण्यांच्या पिंजऱ्याची निर्मिती प्रस्तावित
10. विद्युत

( भांडवली तरतूद र रु ४६.६४ कोटी + महसुली तरतूद र.रु. ३८५.८०  कोटी = र. रु. ४३२.४४ कोटी)

नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध ठिकाणी स्मशानभूमीमध्ये नव्याने गॅस दाहिनी उभारण्यात येणार आहे.
बंड गार्डन येथिल बंधाऱ्यावर (हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प) मिनी हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेटर प्लांट उभारून अंदाजे ३५० किलोवॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
पुणे शहरातील पथ दिवे सक्षम व अद्यायावत करणे
शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरील तसेच समाविष्ट गावांतील प्रकाश व्यवस्थेत सुधारणा करणेसाठी ३४ गावांमध्ये पोल व एल.ई.डी.दिवे बसविणे नियोजित
पुणे शहरातील विविध स्मशानभूमी, मनपा शाळा, दवाखाने, इत्यादी ठिकाणी विद्युत विषयक (प्रकाश व्यवस्था,जनरेटर व्यवस्था,वायरिंग,सोलर हॉट वॉटर यंत्रणा ई.)
11. १५ वा वित्त आयोग
केंद्र शासनाकडील १५ व्या वित्त आयोगांतर्गत पुणे महानगरपालिकेला सन २०२०-२१ ते सन २०२५-२६ असे एकूण पाच वर्षामध्ये Air Quality Improvement आणि पाणी पुरवठा व व्यवस्थापनात सुधारणा व प्रभावी घनकचरा व्यवस्थापन या दोन घटकांतर्गत विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
Air Quality Improvement या घटकांतर्गत आत्तापर्यत र.रु.१६४.९३ कोटी तसेच पाणी पुरवठा व्यवस्थापनात सुधारणा प्रभावीघनकचरा व्यवस्थापन या घटकासाठी आत्तापर्यत र.रु.२५४.८० कोटी प्राप्त झाले आहे.

केद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान

अमृत 2.0 अभियानांतर्गत अस्तित्वातील एकूण ६ एसटीपीचे सुधारणा आणि विस्तार व वडगाव येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधणे प्रस्तावित
12. भवन रचना

( भांडवली तरतूद र रु ४४२.७७  कोटी + महसुली तरतूद र.रु  ७३.१५  कोटी = र. रु. ५१५.९२  कोटी)

पुणे शहरात झालेल्या जी-२० परिषदेच्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी ब्रंडिंग विषयक कामे करण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे मनपाच्या कार्यक्षेत्रातील २९ आरोग्यवर्धिनी मधील नूतनीकरण विषयक तसेच सदर ठिकाणी मुलभूत सोयीसुविधांची सोय करण्याबाबत कामे करण्यात आली
बोपोडी येथील १०० बेडच्या संजय गांधी हॉस्पिटलचे काम पूर्ण (पी+४ मजले)
कोथरूड स.नं.७७/१ येथे अग्निशमन केंद्राचे (बेसमेंट+तळ+पहिला मला व निवासी इमारत तळ+३) पूर्णात्वाच्या टप्प्यावर
धनकवडी स.नं.३५ येथिल ६००० चौ.मी.क्षेत्रावर क्रिडासंकुलचे काम पूर्णात्वाच्या टप्प्यावर (जी+१ मजला)
नायडू हॉस्पिटल आवारात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बेसमेंट +जी+४) वसतीगृह व कर्मचारी निवास उभारणेत येणारा आहे. (पी +१४ मजले,२८५ खोल्या)
बावधन स.नं.१९ पार्ट, २० पार्ट येथे चांदणी चौक सुशोभिकरण अंतर्गत ५२०० चौ.मी.क्षेत्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प उभारणेत येणार आहे.
पुणे मनपाच्या प्रत्येक वॉर्डऑफिस अंतर्गत १ शाळा यानुसार एकूण १५ आदर्श शाळा तयार करण्यात येणार आहेत.
कोंढवा खुर्द येथील क्रिडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर क्रीडागण उभारणेत येणार आहे. सदर क्रीडांगणामध्ये अंदाजे २०० मी.लांबीच्या स्केटिंग रिंगचा समावेश आहे.
पुणे महानगरपालिकेच्या घोरपडी पेठ येथील कॉलनी नंबर ८ व ९ च्या वस्तीचे पुननिर्माण प्रस्तावित (१५० सदनिका असलेली २ पार्किंग + १५ मजली इमारत)
13. माहिती व तंत्रज्ञान

( भांडवली तरतूद र रु ५.४०   कोटी + महसुली तरतूद र.रु ३९.१८   कोटी = र. रु.  ४४.५८  कोटी)

Property Tax Software अद्ययावतीकरण करण्याचे कामकाज प्रस्तावित
ई-ऑफिस अंमलबजावणी (eFile Implementation) प्रस्तावित
सेवक वेतन व सेवानिवृत्ती वेतन प्रणाली अद्ययावतीकरण करणे
नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यांवर व परवानगी प्रमाणपत्रावर डीजीटल स्वाक्षरीची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Digital Locker System अंमलबजावणी करणे
पुणे महानगरपालिकेमार्फत विविध प्रकारची प्रमाणपत्र जसे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म मृत्यू प्रमाणपत्र इ.सेवा नागरिकांना देण्यात येतात. विवाह नोंदणी प्रमाणपत्र Digital स्वरूपात Digilocker या सेवेसोबत इंटिग्रेशन प्रायोगिक तत्वावर करण्यात आले असून, तसे इतर प्रमाणपत्र द्वारे नागरिकांना देण्याचे प्रस्तावित आहे.
Backup Solution : विविध ऑनलाईन संगणक प्रणालीची संगणकीय माहिती सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जतन करणे गरजेचे व अत्यावश्यक असल्याने सद्यस्थितीत अस्तित्वात असलेला सर्व संगणक प्रणालींच्या डाटाचा बॅंकअप घेण्याचे कामकाज सुरु आहे.
नवीन ३४ गावांमध्ये नेटवर्क व्यवस्था करणेबाबत.
बॅंकअप डाटा लीज लाईन प्रस्तावित
14. हेरिटेज सेल ( र रु १९.२५ कोटी )
ऐतिहासिक भिडेवाडा जागेची भूसंपादन कार्यवाही करून जागेचा ताबा पुणे महानगरपालिकेच्या ताव्यात घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देशातील पहिली मुलींची स्मारक इमारत उभारण्याचे नियोजन
15. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण

( प्राथमिक र रु ७५१.०८ कोटी , माध्यमिक शिक्षण र रु १२४.६० कोटी )

एकूण १५० शालेय इमारतीतील स्वच्छतागृहाचे यांत्रिकीकरणाने सफाई प्रस्तावित
फ्युचिरिस्टिक स्कूल – अभिनव शाळा तयार करणे : या अंतर्गत ३० विद्यार्थ्यासाठी अत्याधुनिक Software Hardware असलेले डेस्क Lan सिस्टीम सह सुविधांचा समावेश आहे.
नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावामधील ६५ प्राथमिक शाळांसाठी भौतिक सुविधा व १५००० विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक साहित्य पुरविणे
16. सामान्य प्रशासन
केंद्र शासनाच्या Capacity Building Commission अंतर्गत स्थानिक संस्था स्तरावर क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण अभ्यासक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करणे.
17. आपत्ती व्यवस्थापन विभाग
राष्ट्रीय आपत्ती व्यव्स्थापन प्राधिकरण (NDMA) मार्फत Urban Flood Risk Management (UFRM) या प्रकल्पांतर्गत देशांतील पुणे शहरासह सात शहरांचा समावेश आहे. सदर प्रकल्पांतर्गत पुणे शहराकरिता १५ वा वित्त आयोगांतर्गत निधी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये अल्प व दिर्घ मुदतीचे स्ट्रक्चरल व नॉन स्ट्रक्चरलउपाययोजनेची अंमलबजावणी प्रस्तावित आहेत
पुणे मनपा व महाप्रीत यांचे संयुक्त विद्यामाने Integrated Command & Control Center (ICCC) ची उभारणी करण्यात येणार आहे यासाठी NDMF अंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे.
18. समाज विकास विभाग
दिव्यांग नागरिकांच्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी अर्थसहाय्य देणे
राष्ट्रीय व राज्यस्तरिय खेळामध्ये निवड झालेल्या दिव्यांग खेळाडूंना साहित्य खरेदीकरिता अर्थसहाय्य देणे
शैक्षणिक प्रगती होण्यासाठी व स्वबळावर उभे राहण्यासाठी दोन्ही पालक दिव्यांग असलेल्या पालकांच्या मुलांना व सव्यंग पालकांच्या दिव्यांग मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे
19. कामगार कल्याण विभाग
कामगार कल्याण निधी अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत. त्यामध्ये गुणवंत कामगार पुरस्कार, शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती, विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमप्रस्तावित
गुणवंत कामगार पुरस्कार
महिलांसाठी विविध योजना/ सांस्कृतिक कार्यक्रम/ प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे
20. भूसंपादन व व्यवस्थापन विभाग

चालू असलेले भूसंपादन विषयक महत्त्वपूर्ण प्रस्ताव:

सिंमला ऑफिस चौक ते पुणे विद्यापीठ रस्त्यासाठी
कात्रज कोंढवा सर्वे नंबर 57 पै.गंगाधाम चौक शत्रुंजय मंदिर 24 मी. डी.पी  रस्ता
जायका (मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प),
वारजे शिवणे नदीकाठचा रस्ता,
वारजे जुना जकात नाका ते गणपती माथा दरम्यानचा रस्ता
बालेवाडी सर्वे नंबर 17 पै. प्लेग्राउंडसाठी संपादन (पर्चेस नोटीस)
धनकवडी सर्वे नंबर 29 ओटा मार्केट व पोलीस चौकीसाठी (पर्चेसनोटीस)
पर्वती तळजाई वन उद्यान
21. अतिक्रमण /अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग
प्रस्तावित नाविन्यपूर्ण योजना-सारसबाग येथे फूड वॉकिंग प्लाझा उभारणे
22. मोटार वाहन विभाग
केंद्र शासन व महाराष्ट्र शासन मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम २०२१ अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या १५ वर्ष आयुर्मान पूर्ण झालेली वाहने निष्कासित करणे आवश्यक झाले असल्याने विविध प्रकारची एकूण १४६ वाहने खरेदी करण्यात येणार आहेत
23. अग्निशमन विभाग  
अग्निशमन दलाकरिता ०४ नग हायराईज फायर फायटिंग वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया मोटार वाहन विभागामार्फत सुरु
शहराचा वाढता विकास नव्याने समाविष्ट झालेली गांवे यांचा विचार करून अग्निशमन केंद्राची संख्या वाढविणे व मनुष्यबळ उपलब्ध करणेच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत.
खास निधीच अंदाजपत्रकातील तरतुदीमधून ०२ नग हायराईज फायर फायटिंग वाहने, ०१ नग हॅजमॅट रेस्क्यू वाहन, ०२ नग फायर फायटिंग अॅण्ड रेस्क्यू वाहन (२४ मीटर उंच शिडीसह) अशी अग्निशमन वाहने खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.

प्रमुख जमा बाबी:

1. स्थानिक संस्था कर

सन २०२४ २५ या आर्थिक वर्षात द्रष्टीक्षेपातील अंदाजपत्रक

उत्पन्न तपशील

अंदाजित उत्त्पन्न

शेरा

वस्तू सेवा कर अनुदान

(दरमहा रु २०८.४७ कोटीप्रमाणे)

रु २५०१.६७ कोटी

मागील वर्षातील दरमहा रु १९३.०३ कोटी मध्येसरासरी % वाढ धरून सन २०२४ २५ करितादरमहा रु २०८.४७ कोटी प्रमाणे प्राप्त होतील

% मुद्रांक शुल्क अधिभारअनुदान

रु ५००.०० कोटी

 

इतर जमा

रु .०० कोटी

 

एकूण

रु ३००२.६७कोटी

 

स्थानिक संस्था कर कार्यालयाकडून कोणत्याही योजना व प्रकल्प कार्यान्वित नाहीत, तसेच कोणतेही प्रकल्पासंबंधित कामकाज केले जात नाही

2. मिळकत कर
दि.१ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ मध्ये र.रु.१६७४.५९ कोटी मिळकत कराच्या तुलनेत दि.१ एप्रिल २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ मध्ये र.रु.२०००.९० कोटी मिळकतकर प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत र.रु.३२६.३१ कोटीने अधिक उत्पन्न झाले आहे.
याव्यतिरिक्त उपरोक्त कालावधीमध्ये र.रु.८.६७ लक्ष ते ११.०५ लक्ष मिळकतधारकांकडून उत्पन्न प्राप्त झाले आहे.

उत्पन्नवाढीसाठी उपाय योजना

बिगरनिवासी, वापरात बदल झालेल्या व अनाधिकृत सुरु बिगरनिवासी मिळकती, नाधिकृत असलेले बिगरनिवासी क्रिडा संकुल, हॉटेल इ.शोधून त्यांची कलम २६७ अ नुसार तीनपटीने आकारणी करण्यात येणार आहे.
वारंवार नोटीस बजावून थकबाकी न भरणाऱ्या बिगर निवासी मिळकतींच्या मोठ्या प्रमाणावर लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील मिळकतकर आकारणी न झालेल्या मिळकती शोधून आकारणी करण्यात येणार आहे.
3. बांधकाम परवानगी व विकास शुल्क
गुंठेवारी अधिनियमानुसार दि.१५.१२.२०२३ अखेर एकूण ९०८ प्रकरणे प्राप्त झालेली असून त्यापैकी २४ प्रकरणाना मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०२० रोजी यु.डी.सी.पी.आर २०२० मध्ये दिलेल्या प्रिमीयम मध्ये टप्पे निहाय शुल्क भरण्याची मूळ मुदतीस दोन वर्षाची म्हणजेच दि.०२.१२.२०२४ पर्यंत मुदतवाढ प्राप्त झाल्यामुळे नवीन बांधकाम परवानगीस वेग प्राप्त होऊ शकेल व मूळ एफएसआय घेतल्यावर अतिरिक्त एफएसआय म्हणून मान्य करण्यात येत असल्यामुळे सर्व स्तरावरील लहान मोठ्या विकसकांना फायदा मिळत आहे.त्यामुळे पुणे मनपाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
4. पाणीपट्टी
घरगुती व बिगर घरगुती मीटर पाणीपट्टीच्या दरामध्ये वार्षिक ५% दरवाढ मान्यता मिळाली असून,यामुळे पुणे मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
5. आकाशचिन्ह परवाना
परवाना व परमिट शुल्क आणि जाहिरात फलक शुल्क दरवाढीबाबत मान्यता मिळाली असून, यामुळे पुणे मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
शहरामध्ये अनाधिकृत फ्लेक्स/बोर्ड लागू नये यासाठी काही ठिकाणे निश्चित करून नागरिकांना जाहिरातीसाठी उपलब्ध करून देणेची कार्यवाही सुरु

 

विशेष उपलब्धी

1. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ पुरस्कार: पुणे शहर SS2023 मध्ये राष्ट्रीय स्तरावर १० व्या स्थानावर आहे आणि त्याला GFC रेटिंग स्टार आणि ODF++ चे ODF प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
2. माझी वसुंधरा ३.० पुरस्कार: जागतिक पर्यावरण दिन २०२३ रोजी, पुणे महानगरपालिकेने पर्यावरणाच्या पाच घटकांचे संवर्धन आणि संरक्षणकरून शाश्वत विकास साधण्यासाठी माझी वसुंधरा ३.० स्पर्धेत राज्यस्तरावर AMRIT गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
3. NUHM: अंतर्गत विविध आरोग्यविषयक क्रियाकलापांच्या निर्देशांकांचे सरकारकडून मूल्यांकन केले जाते. त्यानुसार पुणे महानगरपालिका महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
4. स्कॉ अवॉर्ड: पुणे महानगरपालिकेच्या अर्बन ९५ चा उपक्रम चाइल्डअँड यूटीसी फ्रेंडली पुणे SKOCH अवॉर्ड्स २०२३ च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे.

दृष्टीक्षेपात सन २०२४ – २५ आर्थिक वर्षासाठी जमाखर्चाचा अंदाज

सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षाच्या जमाखर्चाचा अंदाज पुढील प्रमाणे सादर करण्यात येत आहे

(आकडे रुपये कोटीत)

जमा बाजू

खर्च बाजू

आरंभीची शिल्लक

स्थानिक संस्था कर

वस्तू आणि सेवा कर

मिळकतकर

विकास शुल्क

पाणीपट्टी

शासकीय अनुदान

इतर जमा

कर्ज/कर्जरोखे

प्रधानमंत्री आवास योजना

 

 

       ०.०२

     ४९५.३७

    २५०२.००

    २५४९.७९

    २४९२.८३

      ४९५.१८

     १७६२.१७

     ८३३.६४

     ४५०.००

       २०.००

सेवक वर्ग खर्च

विज खर्च व दुरुस्ती

पाणी खर्च

कर्ज परतफेड, व्याज घसारा

औषधे पेट्रोल/डिझेल

देखभाल दुरुस्ती व इतर खर्च

वार्डस्तरीय

क्षत्रिय कार्यालयाने करावयाची कामे

(नॉन प्लान )

भांडवली व विकासाची कामे

अमृत व स्मार्ट सिटी अभियान

वर्षाअखेरची शिल्लक

३५५६.९०

 ३८५.८०

  १५०.००

  ७३.६६

  २२६.६०

 ८६१.८५

  ३४.८०

  १२९.३५

५०९३.२२

   ८८.८०

    ०.०२

 

एकूण (र. रु. कोटीत)

     ११६०१ .००

एकूण (र. रु. कोटीत)

११६०१ .००