sachin Sawant | पुलवामाचे सत्य काय आहे ? सचिन सावंत यांचा सवाल 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुलवामाचे सत्य काय आहे ? सचिन सावंत यांचा सवाल

पुलवामाचे (Pulwama)सत्य काय आहे ? अडाणी (Gautam Adani)बद्दल सरकारची काय भूमिका आहे …. ? प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांचा आवाज का दबल्या जातो … ? मोदी सरकारने (Modi Government) यांचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. असा खडा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत (General Secretory Sachin Sawant) यांनी मोदी सरकारला विचारला.

वरील प्रश्नाची उत्तरे मोडी सरकारने द्यावी यासाठी  जवाब दो सभा आयोजित केल्या जाणार आहेत.  या सभेंची मालिका सर्व शहर भर होणार आहे, त्याचा शुभारंभ आज पहिल्या सभेने झाला. यावेळी सावंत यांनी हा सवाल विचारला.

सावंत म्हणाले, पुलवामाचे सत्य जनतेसमोर आले पाहिजे. लोकशाही उद्ध्वस्त केली जात आहे. अच्छे दिन फसवे असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. अडाणींबद्दलची सरकार भूमिका सरकार का स्पष्ट करत नाही.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (Pune city and district congress committee) व कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या (Cantonment Constituency) वतीने भवानी पेठेतील जुना मोटर स्टॅन्ड चौकात मोदी सरकार जवाब दो यासभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी ज्येष्ठ प्रवक्ते उल्हास पवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, सरचिटणीस ॲड अभय छाजेड, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष मंजूर शेख, माजी महापौर रजनी त्रिभुवन, माजी नगरसेविका लता राजगुरू, प्रदेश प्रतिनिधी मेहबूब नदाफ, शिक्ष मंडळ माजी उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, हसन कुरेशी, रशीद खिजर, सलीम शेख, माजी नगरसेवक रफिक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.