Pune Metro Travel with Cycle | पुणे मेट्रोत सायकल घेऊन प्रवास करू शकता का? जाणून घ्या सविस्तर

Categories
Breaking News social पुणे

Pune Metro Travel with Cycle | पुणे मेट्रोत सायकल घेऊन प्रवास करू शकता का? जाणून घ्या सविस्तर

 

Pune Metro Travel with Cycle | पुणे मेट्रोतून (Pune Metro) प्रवासी सोबत सायकल घेऊन प्रवास करू शकतात. परंतु, एक तरुण सायकलवर (Cycle) बसून मेट्रो स्थानकात फिरत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महामेट्रोने (Mahametro) सायकल घेऊन जाण्यास परवानगी असली, तरी मेट्रो स्थानकात ती चालवण्यास मनाई असल्याचा खुलासा केला आहे. (Pune Metro Travel with Cycle)

पुणे मेट्रोतील सायकल प्रवासाचा हा व्हिडीओ समाज माध्यमावर टाकण्यात आला आहे. त्यात एक तरूण मेट्रो स्थानकावर सायकल घेऊन प्रवास करीत असल्याचे दिसत आहे. आधी हा तरुण सायकलवर बसून मेट्रो स्थानकावर येतो. नंतर तो मेट्रोच्या लिफ्टमध्ये जातो. मेट्रो स्थानकावर कर्मचारी त्याची तपासणी करतात. त्यानंतर हा तरुण सायकलसह मेट्रो स्थानकात प्रवेश करतो. अखेर त्याचा मेट्रोतून सायकल प्रवास सुरु होतो. (Pune Metro News)

यावर महामेट्रोने म्हटले आहे, की समाज माध्यमावर एक तरुण सायकल घेऊन मेट्रोतून प्रवास करतानाचा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. मेट्रोमध्ये सायकल घेऊन जाण्याची मुभा पुणे मेट्रोने दिलेली आहे. मात्र मेट्रोमध्ये सायकल घेऊन जाताना सायकलवर बसुन जाणे नियमांचे उल्लंघन. सायकलचा इतर प्रवाश्यांना कोणताही अडथळा होणार नाही, याची काळजी त्या प्रवाशाने घेणे आवश्यक आहे.

मेट्रो स्थानकावर आणि फलाटावर सायकल चालवणे व त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होईल असे वागणे पुणे मेट्रोच्या नियमानुसार कारवाई करण्यास पात्र असेल. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारे प्रवास करणे टाळावे.