Sambhaji Bhide Guruji | NCP Pune |  भिडे गुरुजीनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

Sambhaji Bhide Guruji | NCP Pune |  भिडे गुरुजीनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

Sambhaji Bhide Guruji | NCP Pune |राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल भिडे गुरुजी (Bhide Guruji) यांनी केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP Pune) वतीने  आंदोलन करण्यात आले. (Sambhaji Bhide Guruji | NCP Pune)

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, वारंवार समाजात  तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य करत तरुणांची माथी भडकविणाऱ्या मनोहर भिडे नामक व्यक्तीने पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत.देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व त्यांच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा घाणेरडा प्रकार आहे. या देशात गेल्या नऊ वर्षात अनेक व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले असले, तरी देशाच्या राष्ट्रपित्यावर अवमानकारक शब्दांमध्ये वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कुठलाही गुन्हा दाखल होत नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देशातील सर्वच महापुरुषांबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत.भाजप सरकारच्या काळात जर सातत्याने आपल्या महापुरुषांचा अवमान होणार असेल या पुढील काळात नागरिकांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे आहे.
संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणी महाराष्ट्राच्या गृह विभागाने तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करत, त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण महाराष्ट्रात याविरोधात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. असा इशारा जगताप यांनी दिला.

या आंदोलन प्रसंगी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप , अंकुश काकडे, रवींद्र मालवदकर, सुषमा सातपुते, किशोर कांबले, मृणाल वाणी, तन्वीर शैख़ , आजिंक्य पालकर, आशीष माने, शेखर धावड़े, गणेश नलावडे, सानिया झुंझारराव, उदय महाले आणि सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


News Title | Sambhaji Bhide Guruji | NCP Pune | Protest by Pune Nationalist Congress Party against the statement made by Bhide Guruji

Sambhaji Bhide Guruji : इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू  : भिडे गुरुजींचं वादग्रस्त वक्तव्य 

Categories
Breaking News social पुणे

इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू

: भिडे गुरुजींचं वादग्रस्त वक्तव्य

पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संभाजी महाराज बलिदानासंदर्भात  संभाजी भिडेंनी, “आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,” असं म्हटलंय. भिडे यांच्या या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

“संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण पाळतोय. त्याच्यात हिंदुस्तानच्या अस्तित्वाला असलेलं आव्हान दडलेलं आहे. औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती, त्यांचं वैर होतं म्हणून औरंगजेबने संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करुन मारलेलं नाहीय. त्याच्या अंतकरणातील इच्छा होती ती वेगळी होती. कन्याकुमारी ते काश्मीर असा उभा देश तुकडे तुकडे करुन हा हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदीूस्थान संपवून टाकावा ही त्याच्या पोटातील आग आणि चीड, दृष्ट भावना त्याने संभाजी महाराजांच्या बलिदानातून पूर्ण करुन घेत अंशत: समाधान मिळवलं,” असं भिडे संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल बोलताना म्हणाले.

“आपण लक्षात घेतलं पाहिजे आज संभाजी महाराज नाहीत, औरंगजेब नाहीय. मेलेली मढी कशाला उकरुन काढायची, आता नवीन युग आहे. नवीन जगासोबत चालुयात, जुनं झालं गेलं विसरुन नव्या जगाबरोबर चालुयात असं म्हणणारी नादान, नालायक, देशघातकी वृत्ती सुशिक्षित लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे,” असं म्हणत संभाजी भिडेंनी सुशिक्षितांवर टीका केली.

“आज संभाजी महाराज नाहीत, औरंगजेबही नाही. पण औरंगजेब आजही पाकिस्तान, बांगलादेश गाव वस्त्यांमधील मुस्लिमांच्या रुपाने आजही शिल्लक आहे. परंतु संभाजी महाराजांची जी आग होती ज्यात त्यांनी ऐन तारुण्यात आपल्या देशाचा आणि धर्माचा अभिमान न सोडता, न झुकता, न मागे सरकाता, न शरण जाता त्यांनी देश देवाचा अभिमान मनात धरुन मरण पत्करलं परंतु इस्लाम स्वीकारला नाही. आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं. तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,” असंही भिडे म्हणाले. “हा शत्रू अनेक रुपात गावोगावी हिंदुस्तानमध्ये नांदतोय, हिंदुस्तानच्या बाहेरही नांदतोय,” असंही ते पुढे म्हणाले.

“इस्लामला त्याच पोटतिकडीने उत्तर देण्याची ताकद हिंदू समाजात संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून आपण मिळवली पाहिजेत आणि ती मिळते. संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणं ही स्वातंत्र्याची उपासना आहे, ही धर्माची, मातृभूमिची उपासना आहे,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणं ही अत्यंत प्रखर राष्ट्राभिमान उत्पन्न करणारी गोष्ट आहे. ती आपण करुयात आणि एक दिवस असा उजाडावा की झालेल्या बलिदानाचा सूड घेणारा हिंदुस्तान उभा रहावा ही अंतकरणामध्ये भावना धरुन आपण वाटचाल करत राहूयात,” असं आवाहनही भिडेंनी केलंय.