PMC Budget : अंदाजपत्रक सादर करण्याचा ‘मोह’ सुटेना!   : आज अधिकार मिळाले नाहीत; आता 14 ला चर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

अंदाजपत्रक सादर करण्याचा ‘मोह’ सुटेना!  

: आज अधिकार मिळाले नाहीत; आता 14 ला चर्चा 

पुणे – कायदेशीर अडचण आहे तरी महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्याचा भाजप आणि स्थायी समिती अध्यक्षांना मोह काही सुटता सुटेना. अवघ्या पाच दिवसांनी महापालिकेची (Municipal) मुदत संपणार असताना स्थायी समितीला (Standing Committee) २०२२-२३ या वर्षाचे अंदाजपत्रक (Budget) मांडता येणार का? यावरून महापालिकेत राजकारण (Politics) रंगले आहे. महापालिकेत आज सुमारे तीन तास अंदाजपत्रकावर चर्चा झाली. त्यामध्ये विरोधकांच्या मागणीनुसार प्रशासनाने अंदाजपत्रक मांडायचे असेल तर सात दिवस आधी नोटीस द्यावी लागते, तेवढा कालावधी उपलब्ध नाही, असे स्पष्ट केले. मात्र, सत्ताधाऱ्यांनी अंदाजपत्रक मांडणार अशी भूमिका कायम ठेवली आहे. आता यावर मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता. १४) चर्चा होणार आहे.

: समिती अध्यक्ष आपल्याच कक्षात बसून

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ८५९२ कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत १४ मार्च रोजी संपणार असून, त्यानंतर प्रशासक येणार आहे. पण स्थायी समितीला पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडता येईल अशी भूमिका भाजपने घेतली आहे. आज अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकारी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना दिले जाणार होते. हे अधिकार देण्यात आले नाहीत. अध्यक्ष रासने हे केवळ १० ते १५ मिनिटे बैठकीला उपस्थित होते. बाकी वेळ ते आपल्याच कक्षात बसून होते. त्यानंतर स्थायी सदस्या वर्षा तापकीर यांनी अध्यक्षपद घेऊन बैठक घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विशाल तांबे यांनी १४ मार्चला मुदत संपत असताना मुख्य सभेसमोर अंदाजपत्रक मांडता येईल का असा प्रश्‍न नगरसचिवांना विचारला. त्यावर नगर सचिव शिवाजी दौंडकर यांनी ‘‘महाराष्ट्र महापालिका अधिनियम प्रकरण दोननुसार अंदाजपत्रक हे मुख्य सभेपुढे मांडण्यासाठी सात दिवसांची नोटीस देऊन सभा बोलवा लागेल’’ असे नमूद केले. त्यामुळे केवळ पाच दिवस शिल्लक असताना सात दिवसांची नोटीस देऊ शकत नाही, त्यामुळे अंदाजपत्रक मांडता येणार नाही अशी भूमिका विरोधकांनी मांडली. त्यावरून सत्ताधारी भाजपने काहीच उत्तर दिले नाही पण अंदाजपत्रकावर चर्चा सुरू केली.आजची बैठक तहकुब करून ती सोमवारी (ता.१४) घ्यावी असा प्रस्ताव भाजपने मांडला, जर चर्चाच करायची आहे तर उद्या (ता.१०) बैठक का नाही असा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या तहकुबीला विरोध केला. पण बहुमताच्या जोरावर भाजपने तहकुबी मंजूर केली, असे विशाल तांबे यांनी सांगितले.‘ आगामी वर्षाचे अंदाजपत्रक मांडण्यासाठी आमचा अभ्यास सुरू आहे, १४ मार्च रोजी आमची भूमिका स्पष्ट करू’, असे अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्पष्ट केले.

Hemant Rasne Made History : हेमंत रासने यांची महापालिकेच्या इतिहासात होणार नोंद : सलग चौथ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष पदी निवड

Categories
Breaking News PMC Political पुणे

हेमंत रासने यांची महापालिकेच्या इतिहासात होणार नोंद

: सलग चौथ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष पदी निवड

पुणे : हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी इतिहास (History) रचला आहे. महापालिकेच्या इतिहासात (PMC History) नेहमी त्यांची नोंद घेतली जाईल. कारण महापालिकेत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि महापालिकेची तिजोरी असणाऱ्या स्थायी समितीच्या (Standing Committee chairmen) अध्यक्ष पदी सलग ४ वेळा निवडून येण्याचा बहुमान रासने यांनी मिळवला आहे.

शुक्रवारी दुपारी स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यात भाजपकडून रासने यांनी संधी दिली गेली होती. तर महाविकास आघाडी कडून राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे प्रदीप गायकवाड हे रासने विरोधात मैदानात होते. मात्र अपेक्षेप्रमाणे रासने यांनी या निवडणुकीत बाजी मारली. कारण समितीच्या १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपचे आहेत. त्यामुळे १० विरुद्ध ६ अशा मताने रासने निवडून आल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी घोषित केले. या निवडणुकीला पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपी चे सीएमडी लक्ष्मिनारायण मिश्रा यांनी काम पाहिले. यावेळी प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर देखील उपस्थित होते.

दरम्यान आता नवनियुक्त अध्यक्ष आणि स्थायी समितीला कामकाजासाठी मोजून १० च दिवस मिळणार आहेत. कारण या सर्व सदस्यांचा कालावधी हा १४ मार्च संपणार आहे. त्यामुळे एखादीच समितीची बैठक होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान निवड झाल्यानंतर रासने यांना महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेता गणेश बिडकर, विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी शुभेच्छा दिल्या.

Hemant Rasane :PMC : Standing committee chairmen : हेमंत रासने यांनी पक्ष आणि पक्षातील महत्वाच्या नेत्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता 

Categories
Breaking News PMC Political पुणे

हेमंत रासने यांनी पक्ष आणि पक्षातील महत्वाच्या नेत्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

: हेमंत रासने रचणार इतिहास

पुणे : महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी (PMC Standing Committee Chairman) भाजपने (BJP) विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनाच पुन्हा संधी दिली असून महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीने राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस चे नगरसेवक प्रदीप गायकवाड (Corporator Pradip Gaikwad) यांना उमेदवारी (Candidacy) देण्यात आली आहे. येत्या 14 मार्चला महापालिकेची (Pune Municipal Corporation) मुदत संपुष्टात येत असून नवीन समितीला जेमतेम 14 दिवसच कामकाजाची संधी मिळणार आहे. दरम्यान रासने यांनी पक्ष आणि पक्षातील महत्वाच्या नेत्याबद्दल  कृतज्ञता व्यक्त केली आहे.

: 4 तारखेला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक

येत्या 4 तारखेला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने हेमंत रासने यांची निवड निश्चित मानली जात आहे. हेमंत रासने हे सलग तीनवेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले असून पक्षाने चवथ्यावेळी संधी दिली आहे. एकापेक्षा अधिकवेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणारे रासने हे एकमेव नगरसेवक (Corporator) ठरणार आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाने विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रासने यांनी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्याकडे सोमवारी आपला अर्ज दाखल केला.  स्थायी समितीच्या सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपत असल्याने नवीन समिती अस्तित्वात येणे आवश्यक आहे. पालिकेच्या सभागृहाची मुदत १४ मार्चला संपुष्टात येत असल्याने या समितीला १४ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आला. सत्ताधारी भाजपकडून रासने यांनी अर्ज भरला. यावेळी शहर अध्यक्ष जगदीश  मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, आमदार सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रदीप गायकवाड यांनी अर्ज भरला. विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ, विशाल तांबे, बंडू गायकवाड, बाळा ओसवाल उपस्थित होते. ही निवडणूक येत्या शुक्रवारी०४ मार्चला सकाळी ११ वाजता पुणे महनगरपालिकेच्या नवीन इमारतीत होणार आहे.
पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा मला काम करण्याची संधी देऊन माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पक्षाचे व माझे मार्गदर्शक विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, खासदार गिरीशजी बापट, संजयजी काकडे, शहाराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहरातील भाजपाचे सर्व आमदार, मा. महापौर, सभागृह नेते, सहकारी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्या सोबत कायम असणारे  माझे सहकारी, हितचिंतक आपणा सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
हेमंत रासने