Thomas Cup 2022 | Badminton | थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघासाठी केंद्राकडून 1 कोटीचं बक्षीस

Categories
Breaking News Sport देश/विदेश

थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघासाठी केंद्राकडून 1 कोटीचं बक्षीस

नवी दिल्ली : भारतीय पुरूष बॅडमिंटन (Badminton) संघाने 14 वेळा थॉमस कप (Thomas Cup 2022) जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा पराभव करत इतिहास रचला. यापूर्वी गेल्या 70 वर्षात भारताच्या कोणत्याही संघाला थॉमस कपची फायनल गाठता आली नव्हती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर राजकीय वर्तुळातून भारतीय पुरूष बॅडमिंटन संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच शुभेच्छांच्या वर्षावात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Sports Minister Anurag Thakur) यांनी या संघाला 1 कोटी (1 Crore) रूपयांचे बक्षीस जाहीर केले.

भारताने इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कप फायनलमध्ये प्रवेश केला होता. आपल्या पहिल्याच फायनमध्ये भारतीय पुरूष संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. भारताने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा परावभ केला. भारताने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. भारत यापूर्वी थॉमस कपमध्ये 1952, 1955 आणि 1979 मध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचला होता. तर महिला बॅडमिंटन संघाने 2014 आणि 2016 ला उबर कपच्या अंतिम चार संघात प्रवेश केला होता.दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून 1 कोटी रूपयांच्या बक्षीसाची घोषणा केली. ठाकूर यांनी ट्विट केले की, ‘भारतीय संघाने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियचा 3-0 असा पारभव केला. भारताने पहिल्यांदाच थॉमस कप पटकावला. भारतीय क्रीडाविभागाला या दैदिप्यमान विजयानंतर संघासाठी 1 कोटी रूपये बक्षीस जाहीर करताना आनंद होत आहे. आम्ही यासाठी नियमात शिथीलता देत आहोत.’भारताच्या विजयी संघात लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत, एचसी प्रणॉय, दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिरा शेट्टी यांचा समावेश आहे.