LPG Price Hike : LPG सिलिंडर आजपासून महाग : एवढे रुपये द्यावे लागणार जास्त  : युद्धाच्या झळा सामान्य नागरिकांना 

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

LPG सिलिंडर आजपासून महाग : एवढे रुपये द्यावे लागणार जास्त 

: युद्धाच्या झळा सामान्य नागरिकांना 

 

दिल्ली : रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) युद्धाच्या झळा आता सामान्यांना बसू लागल्या आहेत. या युध्दाच्या दरम्यान आज 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर (LPG Price Hike) जाहीर करण्यात आले.

 सिलिंडरचे दर 105 रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलिंडरमध्ये ही वाढ करण्यात आली असून 7 मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलिंडरही महाग होण्याची शक्यता आहे. कारण सध्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान 3 मार्चला आणि सातव्या टप्प्याचे मतदान 7 मार्चला आहे. अशा परिस्थितीत 7 मार्चनंतर सामान्यांच्या खिशावरील बोजा वाढू शकतो. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती LPG सिलिंडर स्वस्त किंवा महाग झालेले नाहीत.
मात्र, या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 102 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. मात्र, या काळात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय बदल झाला. ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 170 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1736 रुपये होती. नोव्हेंबरमध्ये ते 2000 आणि डिसेंबरमध्ये 2101 रुपये झाले. यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी 2022 ला ते स्वस्त झाले आणि 1907 रुपयांवर आले.


व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ

 व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 19 किलोचा LPG सिलेंडर 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून दिल्लीत 1907 रुपयांऐवजी 2012 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात आता 1987 ऐवजी 2095 रुपयांना मिळणार आहे, तर मुंबईत त्याची किंमत आता 1857 रुपयांवरून 1963 रुपयांपर्यंत वाढली आहे.
निवडणुकीनंतर घरगुती सिलिंडर 100 ते 2000 रुपयांनी महागणार?
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत अनेक महिन्यांपासून दिलासा मिळाला आहे. 6 ऑक्टोबर 2021 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कच्च्या तेलाच्या किमती $ 102 प्रति बॅरल ओलांडल्या तरीही कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीनंतर म्हणजेच 7 मार्चनंतर गॅसच्या दरात प्रति सिलेंडर 100 ते 200 रुपयांनी वाढ होण्याची भीती आहे.

Ukraine-Russia Conflict : युक्रेन मध्ये अडकले असल्यास या नियंत्रण कक्षाशी  संपर्क करा

Categories
social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

युक्रेन मध्ये अडकले असल्यास या नियंत्रण कक्षाशी  संपर्क करा

: जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन (Ukraine) देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील (Pune collector office) जिल्हा नियंत्रण कक्षाला (control Room) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख (collector Dr Rajesh Deshmukh) यांनी केले आहे.

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

 नवी दिल्ली येथील मदत कक्ष 

केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797  23014105 / 23017905 situationroom@mea.gov.in

पुणे जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक 

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे दूरध्वनी 020-26123371ई मेल controlroompune@gmail.com

Ukraine-Russia Dispute : Vladimir Putin : युद्धाला सुरुवात : रशियातर्फे हल्ल्याची घोषणा

Categories
Breaking News Political देश/विदेश

रशियातर्फे हल्ल्याची घोषणा: युद्धाला सुरुवात

: युक्रेनमध्ये ‘स्पेशल ऑपरेशन’ सुरू

युक्रेनमधील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देऊन दोन नव्या राष्ट्रांची निर्मिती केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर वातावरण तापलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलावून यावर तोडगा काढण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे. मात्र, रशियाने तोपर्यंत सीमेवर असणारे सैन्य युक्रेनच्या डॉनबॉस प्रांतात घुसवले आहे. या ठिकाणी रशियन सैन्यातर्फे स्पेशल ऑपरेशनला सुरुवात झाली असून युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Vladimir Putin Declares Special Operation in Ukraine)

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या युक्रेन ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांच्या विरोधात सूड उगवणार असल्याच जाहीर वक्तव्य केलं आहे. तसेच या कारवाईत कोणीही हस्तक्षेप केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याचं वचन दिलं आहे. राजधानी कीव मध्ये बॉम्ब हल्ल्यांना सुरुवात झाली आहे. तर व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खाली ठेवायला सांगितलं आहे. (Ukraine-Russia Dispute)
आपल्या देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी धोका निर्माण करण्यासाठी जो कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल, असं पुतीन म्हणाले. संबंधित देशाला परिणाम भोगावे लागतील. जे आपण इतिहासात यापूर्वी कधीही अनुभवले नाहीत, अशा परिणामांना सामोरं जावं लागेल, असं पुतीन यांनी म्हटलंय.रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केलीय. यामुळे युद्धाचा भडका उढण्याची शक्यता आहे. रशियाने अशी घोषणा केली असताना अमेरिका, युरोपसह इतर देश युक्रेनच्या पाठिशी आहेत. रशियाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.रशियाकडून हल्ला झाल्यास त्याला इतर देश प्रत्युत्तर देतील असाही इशारा रशियाला अमेरिकेसह इतर देशांनी दिला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रशियन लष्कराकडून युद्धाची तयारी करण्यात आली होती. युक्रेनला अमेरिका, युरोपिय देशांकडून पाठिंबा दिला जात आहे. तर रशिया मात्र सध्या एकाकी पडल्याचं चित्र आहे.तुमच्या मुत्सद्दींना वाटाघाटीसाठी पाठवा – अमेरिका संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या प्रतिनिधींनी रशियाला प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगितलं. रशियाच्या कारवाईला आम्ही एकजुटीने उत्तर देत राहू, असे त्या म्हणाल्या. आम्ही रशियाला थांबण्यास, त्यांच्या सीमेवर परत जाण्यास आणि रशियन सैन्य पुन्हा बॅरेक्समध्ये परत पाठवायला सांगण्यासाठी आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. तुमच्या मुत्सद्दींना वाटाघाटीसाठी पाठवा, असंही प्रतिनिधींच्या वतीने सांगण्यात आलं. रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे अक्षरश: उल्लंघन केल्याचं अमेरिकेच्या प्रतिनिधींनी म्हटलंय.