Ukraine-Russia Dispute : Vladimir Putin : युद्धाला सुरुवात : रशियातर्फे हल्ल्याची घोषणा

Categories
Breaking News Political देश/विदेश
Spread the love

रशियातर्फे हल्ल्याची घोषणा: युद्धाला सुरुवात

: युक्रेनमध्ये ‘स्पेशल ऑपरेशन’ सुरू

युक्रेनमधील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देऊन दोन नव्या राष्ट्रांची निर्मिती केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर वातावरण तापलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलावून यावर तोडगा काढण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे. मात्र, रशियाने तोपर्यंत सीमेवर असणारे सैन्य युक्रेनच्या डॉनबॉस प्रांतात घुसवले आहे. या ठिकाणी रशियन सैन्यातर्फे स्पेशल ऑपरेशनला सुरुवात झाली असून युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Vladimir Putin Declares Special Operation in Ukraine)

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या युक्रेन ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांच्या विरोधात सूड उगवणार असल्याच जाहीर वक्तव्य केलं आहे. तसेच या कारवाईत कोणीही हस्तक्षेप केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याचं वचन दिलं आहे. राजधानी कीव मध्ये बॉम्ब हल्ल्यांना सुरुवात झाली आहे. तर व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खाली ठेवायला सांगितलं आहे. (Ukraine-Russia Dispute)
आपल्या देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी धोका निर्माण करण्यासाठी जो कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल, असं पुतीन म्हणाले. संबंधित देशाला परिणाम भोगावे लागतील. जे आपण इतिहासात यापूर्वी कधीही अनुभवले नाहीत, अशा परिणामांना सामोरं जावं लागेल, असं पुतीन यांनी म्हटलंय.रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केलीय. यामुळे युद्धाचा भडका उढण्याची शक्यता आहे. रशियाने अशी घोषणा केली असताना अमेरिका, युरोपसह इतर देश युक्रेनच्या पाठिशी आहेत. रशियाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.रशियाकडून हल्ला झाल्यास त्याला इतर देश प्रत्युत्तर देतील असाही इशारा रशियाला अमेरिकेसह इतर देशांनी दिला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रशियन लष्कराकडून युद्धाची तयारी करण्यात आली होती. युक्रेनला अमेरिका, युरोपिय देशांकडून पाठिंबा दिला जात आहे. तर रशिया मात्र सध्या एकाकी पडल्याचं चित्र आहे.तुमच्या मुत्सद्दींना वाटाघाटीसाठी पाठवा – अमेरिका संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या प्रतिनिधींनी रशियाला प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगितलं. रशियाच्या कारवाईला आम्ही एकजुटीने उत्तर देत राहू, असे त्या म्हणाल्या. आम्ही रशियाला थांबण्यास, त्यांच्या सीमेवर परत जाण्यास आणि रशियन सैन्य पुन्हा बॅरेक्समध्ये परत पाठवायला सांगण्यासाठी आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. तुमच्या मुत्सद्दींना वाटाघाटीसाठी पाठवा, असंही प्रतिनिधींच्या वतीने सांगण्यात आलं. रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे अक्षरश: उल्लंघन केल्याचं अमेरिकेच्या प्रतिनिधींनी म्हटलंय.

Leave a Reply