Dheeraj Ghate : Vaccination for 15-18 years : १५ ते १८ या वयोगटाकरिता पुण्यातील सर्वात मोठे एकदिवसीय लसीकरण अभियान : नगरसेवक धीरज घाटे यांची संकल्पना 

Categories
Breaking News Political आरोग्य पुणे

१५ ते १८ या वयोगटाकरिता पुण्यातील सर्वात मोठे एकदिवसीय लसीकरण अभियान

: नगरसेवक धीरज घाटे यांची संकल्पना

पुणे : हिंदू गर्जना प्रतिष्ठान,सहयाद्री हॉस्पिटल आणि आय सी आय सी आय फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यातील सर्वात मोठे एकदिवसीय लसीकरण अभियान होणार आहे . वय १५ ते १८ या वयोगटातील युवक युवतींकरिता हे अभियान असणार आहे. नगरसेवक धीरज घाटे यांची ही संकल्पना आहे.

याबाबत घाटे यांनी सांगितले कि, शहरातील मध्यवर्ती भागातील खजिना विहीर चौका जवळील फडके हॉल या ठिकाणी सकाळी ९.३० ते दुपारी ५ वा पर्यंत हे अभियान असेल. नोंदणीची सोय देखील याच ठिकाणी असणार आहे, अनेक शाळा कॉलेज यांसह शहरातील विविध भागातील विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. १०वी १२वीच्या परीक्षा अत्यंत जवळ असल्याकारणाने मुलांच्या लसीकरणाला या अभियानामुळे वेग मिळेल आणि विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. असे ही घाटे म्हणाले.

Pune : Vaccination : १५ ते १८ वयोगटाचा कोरोना लसीकरण प्रारंभ!

Categories
Breaking News PMC Political पुणे

१५ ते १८ वयोगटाचा कोरोना लसीकरण प्रारंभ

पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महापालिका हद्दीत १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरणाचा प्रारंभ महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलमध्ये करण्यात आला. पुणे शहरात ४० लसीकरण केंद्रांवर नव्या वयोगटासाठी कोवॅक्सिन लस उपलब्ध करण्यात आली आहे.  तर पुणे महानगरपालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधक लस देण्यास सोमवारी सुरुवात झाली. महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असून त्यासाठी आवश्यक असलेल्या लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुकर व्हावे, यासाठी पालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील ४० केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांचे स्वागत महापौर आणि सभागृह नेते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. करोनावर मात करण्यासाठी या वयोगटातील मुलांसह ज्या नागरिकांचा अद्यापही पहिला आणि दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन बिडकर यांनी यावेळी केले.

‘१५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांमध्ये लसीकरणासाठी उत्स्फूर्तपणा दिसला हे खूप आशादायक चित्र आहे. लाभार्थ्यांची ही सकारात्मकता लसीकरणाला चांगला वेग देईल हा विश्वास वाटतो. महापालिकेची लसीकरण यंत्रणाही पूर्ण क्षमतेने सज्ज असून वेगाने आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कमीत कमी कालावधीत लस देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असेल’

मुरलीधर मोहोळ, महापौर.

——–

लस घेण्यासाठी आलेल्या या मुलांमध्ये लसीकरणाबाबतची उत्सुकता ही प्रचंड सकारात्मकता देणारी होती. या लसीकरणासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले आहे.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

Vaccination For 15-18 years: 15 ते 18 वयोगटासाठी शहरात आता 40 लसीकरण केंद्रे : महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Categories
Breaking News PMC पुणे

१५ ते १८ वयोगटासाठी शहरात आता 40 लसीकरण केंद्रे :

: महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे मनपा हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे नियोजन केले असून या वयोगटासाठी शहरात 40 स्वतंत्र लसीकरण केंद्राचे नियोजन केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यासाठी १ जानेवारीपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरु होत असल्याचेही महापौर मोहोळ म्हणाले. 3 जानेवारी पासून हे लसीकरण सुरु होईल.

‘२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरले असून लाभार्थ्यांना नव्या वर्षाच्या पाहिल्याच दिवशी लसीकरण नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे कोविन हे पोर्टल किंवा एप्लिकेशन वापरावे लागणार आहे. यात ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. शिवाय लसीकरणाला येताना लाभार्थ्यांकडे आधारकार्ड/ओळखपत्र आवश्यक असणार आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

पात्र लाभार्थ्यांची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता १५ ते १८ वयोगटासाठी सुरु होणाऱ्या कोरोना लसीकरणाची केंद्रांची संख्या ५ वरून ४० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण वेळेत, वेगाने आणि सुकर करण्याचा आपला प्रयत्न आहे, त्याला निश्चितच यश येईल, हा विश्वास वाटतो’.

       – मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे