PMC : Vidyaniketan Schools : महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळांमध्ये आता संगणकीय प्रणालीद्वारे होणार व्यवस्थापन 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळांमध्ये आता संगणकीय प्रणालीद्वारे होणार व्यवस्थापन

: स्थायी समितीची मंजुरी

पुणे : महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागामार्फत २१ विद्यानिकेतन शाळा सुरु आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता उत्कृष्ट असून, कोरोनाच्या कालावधीमध्ये शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यशिक्षण, आरोग्य आणि आहार, इत्यादी बाबींच्या अनुषंगाने प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यानुसार आता या विद्यानिकेतन शाळांमध्ये आता संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रती शाळा प्रती महिना 22 हजाराचा खर्च  येणार आहे. 4 महिने हा प्रकल्प चालेल. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

: प्रती शाळा प्रती महिना 22 हजाराचा खर्च

याबाबत नगरसेवकांनी स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार संगणकीय प्रणालीद्वारे शाळा व्यवस्थापन,  मूल्यशिक्षण व आरोग्य आणि आहार या क्षेत्रामध्ये विवेकानंद अकॅडमी प्रा.लि. ही संस्था कार्यरत असून, महाराष्ट्राच्या विविध शाळांमधून या संस्थेने सदर प्रकल्प यशस्वीरित्या राबविले आहेत. संगणकीय प्रणालीद्वारे शाळा व्यवस्थापन यामध्ये प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थी व शिक्षक हजेरी, निकालपत्र, बोनाफाईड व शाळा सोडल्याचा दाखला, ग्रंथालय व्यवस्थापन, साठा नियंत्रण, परीक्षा अहवाल, इत्यादी बाबींचा समावेश आहे. तसेच, मूल्यशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचे वयोगटाप्रमाणे गट तयार करुन आठवड्यातून तीन तासामध्ये शिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय आरोग्य व आहार या बाबींच्या अनुषंगाने या तासामधून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करुन माहिती देण्यात येणार आहे. तसेच, पालक सभांमधूनही पालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. विवेकानंद अकॅडमी प्रा.लि. या संस्थेमार्फत उपरोक्त प्रकल्प जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागांकडील २१ विद्यानिकेतन शाळांमधून प्रती शाळा प्रती महिना रक्कम रु. २२,०००/- प्रमाणे प्रायोगिक तत्वावर राबविणेस मान्यता देण्यात येत आहे. तसेच, यासाठी आवश्यक असणारा खर्च प्राथमिक शिक्षण विभागाकडील अखर्चित रकमांमधून
करणेस मंजुरी देण्यात येत आहे. —