Archana Patil : प्रभाग 19 मध्ये 3 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन

Categories
PMC Political पुणे

प्रभाग 19 मध्ये 3 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन

पुणे : प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या विकास निधीतून 3 कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे व शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, प्रभागातील गोर गरीब जनतेला लुबडण्याचे काम येथील काँग्रेस ने केले. हीच गुंडगिरी संपवण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी नगरसेविका अर्चना पाटील आणि तुषार पाटील काम करतायेत. 2019 ल कशी साथ पाटील कुटुंबाला आणि भाजप ल दिली तशीच साथ 2022 ला पण द्या.

जगदीश मुळीक म्हणाले, एकाच दिवसामध्ये तब्बल 21 कामाचे भूमपूजन होतंय, याबद्दल मी अर्चना पाटील आणि तुषार पाटील यांचे अभिनंदन करतो. त्यांनी काँग्रेस सारखा गाजावाजा न करता कामाला महत्त्व दिलाय. कारण त्यांच्या त्यांच्या मनामध्ये आणि विचारा मध्ये प्रभागाचा विकास हा एकाच ध्यास आहे.

नगरसेविका अर्चना तुषार पाटील म्हणाल्या, तुम्ही दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. तुमच्या विश्वसामुळे प्रभागाचा विकास करू शकले. तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करताना खूप जास्त समाधान वाटतय. आता प्रभागाच्या विकासावर काम केले आणि ते करत राहणार पण इथून पुढे प्रभागातील प्रत्येक महिला आणि आणि तरुण वर्ग सक्षम करण्यासाठी मला काम करायचं आहे. यासाठी तुमची अशीच साथ मला 2022 ला पण द्या. असे आवाहन नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी केली.

यावेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील सुनील कांबळे , सुखदेव अडागळे, सनी अडागळे, विकी ढोले, दिनेश रासकर, मुनावर रामपुरी, रेहमान शेख , आशिष झांझोत, संध्या पवार, परवीन तांबोळी, राईस शेख, पुष्पक चव्हाण, मनीषा गायकवाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन बंडू चरण यांनी केले.