Jumbo Covid Center : जम्बो कोविड सेंटर बाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने केला ‘हा’ खुलासा

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र
Spread the love

मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन!

: जम्बो सेंटर बाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने केला खुलासा

पुणे : जंबो कोविड सेंटर बाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भष्टाचाराचे आरोप केले आहेत. याबाबत आता विभागीय आयुक्त कार्यालयाने खुलासा केला आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने म्हटले आहे.

: COEP ग्राउंड, पुणे व अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी जम्बो कोविड रुग्णालयाच्या उभारणी बाबत केलेली कार्यवाही

पुणे व पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील मोठ्या प्रमाणात वाढती कोविड रुग्ण संख्या विचारात घेऊन अतितत्काळ स्वरुपात कोविड रुग्णालयाची उभारणी करणेसाठी मा. विभागीय आयुक्त, पुणे विभाग व मा. महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका (एपिडेमिक कायदा, १८९७ अंतर्गत सक्षम प्राधिकारी) यांनी दिनांक दि. २१.०७.२०२० रोजीच्या पत्राद्वारे, एपिडेमिक कायदा, १८९७ मधील तरतुदीनुसार लघु निविदा काढून पुणे व पिंपरी चिंचवड करिता स्वतंत्र असे दोन जंबो कोविड केंद्र स्थापना करणेची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास देण्यात आले. जंबो कोविड केंद्रे स्थापन करणेच्या अनुषंगाने तत्काळ निर्णय घेणेसाठी राज्य शासनाचे व संबंधित स्थानिक नागरी संस्थांच्या विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समावेशासह तीन समित्या स्थापन करण्यात आल्या आणि या समित्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणारी संस्था पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण असेल, असे ठरविण्यात आले. तसेच, तज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. सुकाणू समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असून महापालिका आयुक्त, PMC, महापालिका आयुक्त, PCMC, जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा, आयुक्त, क्रीडा संचालनालय, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, मुख्य अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचा समावेश होता व या समिती मार्फत रुग्णालय उभारणीच्या अनुषंगाने प्रशासकीय मंजुरी, निविदा (EOI) मान्यता, एजन्सी नेमणूकीस अंतिम मान्यता व अनुषंगिक इतर महत्वाच्या बाबींबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. पायाभूत सुविधा समितीमध्ये मुख्य अभियंता, PWD, शहर अभियंता, PMC व PCMC, मुख्य अभियंता, PMRDA, जिल्हा शल्यचिकीत्सक व अधीक्षक अभियंता, PMRDA यांचा समावेश होता व या समितीने रुग्णालय उभारणी खर्चाचे अंदाजपत्रके, आराखडे, Specifications, निविदेचा (EOI) मसुदा निश्चिती, प्राप्त निविदांची पडताळणीकरून स्वीकृतीसाठी सुकाणू समितीकडे शिफारस करणे अपेक्षित होते. तसेच, आरोग्य समिती मध्ये मुख्य आरोग्य अधिकारी, PMC व PCMC, जिल्हा शल्यचिकीत्सक, अधिष्ठता, ससून हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, PMRDA यांचा समावेश होता व या समितीने आरोग्य सेवा व वस्तूंचा पुरवठा, आराखडे निश्चिती, EOI मसुदा प्रमाणे निविदा प्रक्रिया, प्राप्त निविदा बाबत सल्लागाराच्या मदतीने अंतिम स्वीकृतीसाठी सुकाणू समितीकडे शिफारस करणे असे अपेक्षित होते.
महामारी व आपत्कालीन परिस्थितीतही, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील वृत्तपत्रात व्यापक प्रसिद्धी देऊन तसेच, online निविदा प्रक्रियेद्वारे अत्यंत पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून रुग्णालय उभारणी व कार्यान्वयाचे काम
PMRDA ने पूर्ण केले तसेच, त्यानंतर Standard Operating Procedure तयार करून सदर जंबो कोविड केंद्रे रुग्ण सेवेसाठी संबंधित महानगरपालिकांकडे सुपूर्द करण्यात आली. या जंबो कोविड केंद्रांच्या दैनंदिन कामकाजासाठी संबंधित महानगरपालिकेमार्फत अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समिती गठीत करण्यात आली होती.
मेसर्स लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या नियुक्ती संबंधित बाबी:
दोन्ही कोविड केंद्रांसाठी वैद्यकीय सेवा पुरवठादार नियुक्ती करिता राष्ट्रीय व राज्य स्तरावरील वृत्तपत्रात व्यापक प्रसिद्धी देऊन तसेच, online निविदा प्रक्रियेद्वारे निविदा बोलविण्यात आल्या. एकूण 5 निविदा प्राप्त झाल्या. हेल्थकेअर सल्लागाराने सदर पाचही निविदाकारांची पात्रता व अनुभव तपासून व सर्व निविदा पात्र असल्याची शिफारस आरोग्य
समितीकडे सादर केली व त्यास या समितीने मान्यता देऊन आर्थिक देकार उघडले असता, सर्वात कमी दराची निविदा मेसर्स लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांची आढळून आली. मा. सुकाणू समितीने दि. ०५.०८.२०२० रोजीच्या बैठकीत मेसर्स लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला COEP ग्राउंड, शिवाजीनगर येथील वL2 निविदाकार मेसर्स
मेडब्रोस सर्विसेस यांना L1 दराने अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी येथील जम्बो कोविड केंद्र येथे वैद्यकीय सेवा पुरवठादार म्हणून नियुक्तीस मान्यता दिली. त्याप्रमाणे, दि. २४.०८.२०२० रोजी मेसर्स लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला. मेसर्स लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांची पात्रता तपासतांना EOI
मधील अटी शर्ती ची पूर्तता, त्यांचे मुख्य वैद्यकीय तज्ञ व भागीदार डॉ. हेमंत गुप्ता यांचा वैद्यकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव, ICCU सेवेचा अनुभव, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थरावरील Paper Publications, तसेच बृहन्मुंबई महानगर पालिकेने त्यांना दहिसर व रेस कोर्स येथील जम्बो कोविड सेंटरचे दिलेले काम, याबाबी विचारात घेऊन या संस्थेस पात्र ठरविण्यात आले
होते. दरम्यान, दि. ०२.०९.२०२० रोजीचे पुणे महापालिकेच्या पत्रान्वये COEP ग्राउंड, शिवाजीनगर येथील मेसर्स लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांच्या सेवेतील त्रुटी निर्दशनास आणल्यावर, PMRDA ने मेसर्स लाईफलाइन
हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला कारणे दाखवा नोटीस जारी केली व सदर प्रकरण सुकाणू समितीकडे सादर केले असता, मेसर्स लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांची सेवा खंडित करणे, Blacklist करणे व Security Deposit जप्त करणेचा निर्णय, सुकाणू समिती मार्फत घेण्यात आला. त्यानुसार, दि. ०९.०९.२०२० रोजीच्या आदेशान्वये मेसर्स लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांची सेवा तत्काळ प्रभावाने खंडित करून, उक्त कंपनीस काळ्या यादीत (Blacklist) टाकण्याचे आदेश जारी केले. तसेच, या आदेशाची प्रत मा. प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य आणि संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आली. PMRDA ने रु. २५ लक्षची सुरक्षा अनामत जप्त करण्यासाठी एच.डी.एफ.सी. बँकेकडे पाठपुरावा केला. परंतु, एच.डी.एफ.सी. बँकेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, प्राधिकरणाने एच.डी.एफ.सी. बँकेला Legal Notice पाठवून रु. २५ लक्षची सुरक्षा अनामत रक्कम जप्त केली आहे. सदरकंपनीस आजतागायत कोणतेही देयक अदा करण्यात आलेले नाही. वरील समस्या होत असताना, पर्यायी सेवेसाठी M/s Medbros Healthcare Pvt. Ltd. ची तत्काळ नियुक्ती करण्यात आली.
सर्व कामांसाठी (पायाभूत सुविधा फर्म, ऑपरेटर फर्म, उपकरणे पुरवठादार इ.) सुकाणू समितीच्या निर्देशाने निविदा प्रक्रिया पार पडतांना पूर्ण पारदर्शकता सुनिश्चित केली आणि विलक्षण महामारी, लॉकडाऊन आणि अभूतपूर्व पाऊस असतानाही या सेवांच्या खरेदीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रचलित खरेदी मार्गदर्शक तत्त्वांचे
काटेकोरपणे पालन करण्यात आले. सद्यस्थिती दोन्ही जम्बो कोविड रुग्णालयाचे कामकाज विना तक्रार व्यवस्थित सुरु आहे.

Leave a Reply