PMC Mayor trophy: महापौर चषक स्पर्धा देखील ‘वित्तीय’ कचाट्यात!

Categories
Breaking News PMC Sport पुणे
Spread the love

महापौर चषक स्पर्धा देखील ‘वित्तीय’ कचाट्यात!

: वित्तीय समितीची मंजूरी नाही

पुणे.  शहरातील नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ देण्यासाठी महापौर चषक  स्पर्धेचे आयोजन दरवर्षी महापालिकेतर्फे केले जाते.  या स्पर्धांमध्ये अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, त्यामुळे अनेक सुविधाही पालिकेकडून दिल्या जातात.  शहरातील खेळाडूंबरोबरच महापालिकेच्या शाळांमध्येही ही स्पर्धा आयोजित केली जाते.  दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात याचे आयोजन केले जाते.  परंतु कोरोना मुळे मागील वर्षी  या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या नव्हत्या. यावर्षी मात्र या स्पर्धा होणार, अशी चिन्हे होती.  महापालिका प्रशासनाकडून यासाठीच्या खर्चाला मान्यता मिळण्या बाबत वित्तीय समितीत विचारणा केली. समितीची गुरुवारी बैठक झाली. मात्र आर्थिक संकटाचे कारण देत समितीने याला मान्यता देण्याचे नाकारले. त्यामुळे आता स्पर्धा होणार नाही, अशी माहिती महापालिका प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.

 – दरवर्षी स्पर्धा आयोजित केली जाते

  दरवर्षी महापौर चषक स्पर्धा महानगरपालिकेद्वारे आयोजित केली जाते.  त्यासाठी 7 ते 8 कोटी खर्च केले जातात.  यामध्ये सुमारे 18 ते 20 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  शहारच्या खेळाडूंबरोबरच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीही ही स्पर्धा आयोजित केली जाते.  दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात याचे आयोजन केले जाते.   दरवर्षी महानगरपालिकेकडून स्पर्धा क्रीडा संघटनांना दिल्या जात्यात.  त्यापैकी, जोडणीपासून ते खेळाडूंचे जेवण, निवास व्यवस्थापन, प्रवास खर्च संस्थेला देण्यात आला.  पण अनेक संस्थांनी कमी खेळाडू असताना ही  जास्त खेळाडू दाखवले.  यामुळे पालिकेचा खर्च वाढत होता.  यामुळे पालिका प्रशासनाने ठरवले होते की पालिका त्याचा खर्च उचलणार आहे.  त्यांना फक्त 5 हजार रॉयल्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  यामुळे महापालिकेचा खर्च वाचत आहे.  मात्र कोरोनामुळे गेल्या वर्षी याचे आयोजन करण्यात आले नव्हते. आता महापालिका आयुक्तांनी सर्व खेळांना परवानगी दिली आहे. शिवाय सगळ्या गोष्टी अनलॉक केल्या आहेत. त्यामुळे प्रशासन देखील याबाबत सकारात्मक होते.

वित्तीय समितीने आर्थिक कारण पुढे केले

कोरोनामुळे महापालिका आर्थिक अडचणीत आहे. उत्पन्न घटले असल्याने नगरसेवकांना देखील निधी दिला जात नाही. फक्त महत्वाची कामे करण्यासाठी सद्य स्थितीत खर्च केला जात आहे. महापौर चषकाचे आयोजन करण्यासाठी ८ ते १० कोटी खर्च अपेक्षित असतो. त्यामुळे समिती यासाठी मान्यता देणार का, याकडे प्रशासन आणि नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले होते. समितीची गुरुवारी बैठक झाली. त्यानुसार क्रीडा विभागाने यावेळी स्पर्धा आयोजन आणि खर्चाबाबत विचारणा केली. मात्र आर्थिक संकटाचे कारण देत समितीने याला मान्यता देण्याचे नाकारले. समितीने म्हटले कि, कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे स्पर्धा घेणे योग्य होणार नाही. त्यामुळे आता स्पर्धा होणार नाही, अशी माहिती महापालिका प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.

Leave a Reply