विविध मागण्यांसाठी मनपा सुरक्षारक्षकांचे आंदोलन : कामगार नेते सुनिल शिंदे नी केले नेतृत्व : कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या मांडल्या मागण्या

Categories
PMC पुणे
Spread the love
विविध मागण्यांसाठी मनपा सुरक्षारक्षकांचे आंदोलन
: कामगार नेते सुनिल शिंदे नी केले नेतृत्व
: कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या मांडल्या मागण्या
पुणे. पुणे मनपा मधे काम करणाऱ्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांचे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील निदर्शने आंदोलन आज मनपाच्या मुख्यालयासमोर करण्यात आले. या आंदोलनात  मनपा मधे काम करणाऱ्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या.
या आंदोलकांच्यासमोर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनिल शिंदे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले  सुरक्षा रक्षक पुरवणारे कंत्राटदार , मनपा आधिकारी यांचे साटेलोटे  असल्यामुळे  या सुरक्षा रक्षकांवर अन्याय होत आहे. सुरक्षारक्षकांचे प्रश्न माहीत असून हेतुपुरस्सर डोळेझाक करण्याचे काम चालू आहे. हे आता खपवून घेणार नाही. जर लवकरात लवकर प्रश्न सुटले नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुनिल शिंदे यांनी दिला. या आंदोलनात विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी भेट दिली. मागण्या स़ोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी दिले. या आंदोलनाची दखल मनपाचे उपआयुक्त माधव जगताप यांनी लगेच घेतली व मागण्याचे निवेदन  स्वीकारले. संघटनेचे बरोबर चर्चा केली. आणि या सर्व मागण्या बाबतीत  अतिरिक्त आयुक्त व संबंधित खाते प्रमुख  . कंत्राटदार याची संघटनेबरोबर  बैठक घेऊन तात्काळ प्रश्न सोडवण्यासाठी आश्वासन दिले. मनपाच्या मुख्य कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक हजर होते.
 कामगारांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत
१) पगार स्लिप मिळत नाही. आतापर्यंतच्या प्रत्येक महीन्याच्या पगार स्लिप  प्रत्येक कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात. २) ई एस आय कार्ड कर्मचाऱ्यांना त्वरित देण्यात यावे व आतापर्यंत झालै दिरंगाईमुळे  ज्या कर्मचाऱ्यांचे दवाखान्याचे खर्च किंवा वैद्यकीय बिले यावर झालेला खर्च कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. ३) सुधारित वेतनवाढीच्या फरकाची रकि सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित देण्यात यावी. ४) मनपाचे ओळख पत्र प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्वरित देण्यात यावे. ५) आजपर्यंत  प्रा. फंडात जमा झालेल्या रक्कमेचा तपशील प्रत्येक कर्मचाऱ्यांला देण्यात यावा व काही तफावत आढळून आल्यास योग्य ती पूर्तता करण्यात यावी.६) प्रत्येक कर्मचाऱ्यांला वर्षाला दोन ड्रेस दोन जोडी बूट. टोपी बैल्ट शिट्टी, लायनर रेनकोट  स्वेटर, टाँर्च, काठी त्वरित देण्यात यावे अथवा त्याची रक्कम रोख स्वरूपात प्रत्येक कर्मचाऱ्यांना देण्यात यावी.

Leave a Reply