Pune Water Supply | महावितरणच्या विद्युत पोलला अपघात झाल्याने शहराच्या काही भागात काही काळापुरता पाणीपुरवठा विस्कळीत 

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

Pune Water Supply | महावितरणच्या विद्युत पोलला अपघात झाल्याने शहराच्या काही भागात काही काळापुरता पाणीपुरवठा विस्कळीत

| दुपार नंतर पाणीपुरवठा सुरळीत

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – आज सकाळी  पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) खडकवासला रॉ वॉटर जॅकवेल पंपिंग येथील महावितरण कंपनीचे विद्युत पुरवठा करणारे पोलला अपघात झाल्याने व महावितरण कंपनीचे विद्युत पुरवठा यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तेथील संपूर्ण पंपिंग यंत्रणा सकाळी 11:20 पासून बंद होती.

दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या कालावधीत वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीत संपूर्ण कोथरूड परिसर, वारजे माळवाडी परिसर, बाणेर, बालेवाडी, बावधन व पाषाण परिसर, कर्वे रोड परिसर, चतुशिंगी, औंध, गणेश खिंड, शिवाजीनगर, गोखले नगर, प्रभात रोड इत्यादी भागातील पाणीपुरवठा काही काळापुरता बंद झाला होता. यामुळे पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीत सिंहगड रोड परिसर तसेच लष्कर जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीत रामटेकडी, हडपसर, मुंढवा, वानवडी, संपूर्ण कोंढवा, खराडी, कॅम्प, येरवडा व खडकी येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
दरम्यान दुपारी तीन नंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.