Pune Loksabha Election 2024 | पुणे लोकसभेसाठी ३५ उमेदवार रिंगणात

Categories
Breaking News social पुणे
Spread the love

Pune Loksabha Election 2024 | पुणे लोकसभेसाठी ३५ उमेदवार रिंगणात

| डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप

 

Pune Loksabha Election 2024 –  (The karbhari news service) – भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India)  निवडणूक कार्यक्रमानुसार पुणे लोकसभा मतदारसंघासाठी (Pune Loksabha Constituency) अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या ४२ पैकी ७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने पुणे लोकसभेसाठी ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज अंतिम करण्यात आलेल्या यादीनुसार उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. (Pune Election)

यावेळी निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊ गलांडे, समन्वयक अधिकारी प्रतिभा इंगळे, अनिल पवार, खर्च व्यवस्थापनाचे समन्वयक अधिकारी प्रकाश अहिरराव, खर्च प्रमुख महेश अवताडे उपस्थित होते.

डॉ.दिवसे यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार खर्चाचा दैनंदिन लेखा ठेवणे बंधनकारक असल्याचे यावेळी सांगितले. उमेदवारांना ९५ लाख रुपये इतक्या खर्चाची मर्यादा असून खर्च मर्यादेचे उल्लंघन करू नये. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. वाहने, सभा, रॅली, मिरवणूकीसाठी पूर्व परवानगी आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके स्थिर सर्वक्षण पथके तसेच व्हिडीओ संनियंत्रण पथकाद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल,अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. लोकसभा निवडणूक चांगल्या वातावरणामध्ये पारदर्शकपणे होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ.दिवसे यांनी उमेदवारांना केले.