PMC Pune Disaster Management | पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्कालीन केंद्र स्थापन होणार

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Pune Disaster Management | पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्कालीन केंद्र स्थापन होणार

| महापालिका आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

PMC Pune Disaster Management | पावसाळ्यापुर्वी (Premonsoon) व पावसाळ्यादरम्यान (Monsoon) करावयाची आपत्कालीन कामे व आपत्ती व्यवस्थापन याकरीता आपत्कालीन कार्यकेंद्र (Disaster Centre) स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर (Ward office) आपत्कालीन केंद्र आणि पूर नियंत्रण कक्ष (Flood control room) स्थापन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. (PMC Pune Disaster management)

पावसाळ्यापुर्वी व पावसाळ्या दरम्यान आणि आपत्ती व्यवस्थापनाकरीता महापालिका सहाय्यक आयुक्त स्तरावर  आपत्कालीन कार्य केंद्र असणे आवश्यक आहे. आपत्कालीन कार्यकेंद्रात संपर्क यंत्रणा उभारुन
क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणुक करावी व याकरीता नोडल ऑफिसरची नेमणुक करण्यात यावी.  ०१ जुन पासून क्षेत्रिय कार्यालय स्तरावर स्वतंत्र वॉर रूम / पूर नियंत्रण कक्ष (War room) स्थापन करावा. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. (PMC Pune Marathi News)
आयुक्तांनी पुढे म्हटले आहे कि  ३१ डिसेंबर पर्यंत आपत्कालीन केंद्र २४x७ तास सुरु राहील याची दक्षता घ्यावी व याकरीता स्टाफची नेमणुक करण्यात यावी. आपत्कालीन केंद्रामध्ये २४ तास संपर्क होऊ शकेल असा दुरध्वनी क्रमांक, नोडल ऑफिसरचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आय. डी व त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर पुरविण्यात आलेल्या वायरलेसयंत्रणा यांचा उपयोग करुन मुख्य आपत्कालीन केंद्राशी जोडण्यात यावा व आपत्कालीन परिस्थितीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संपुर्ण माहिती मुख्य आपत्कालीन केंद्र, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका येथे दुरध्वनी क्रमांक०२० – २५५०६८००/९/२/३/४ व ०२० २५५०१२६९ या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा. (PMC Pune disaster management department)
सन २०२३ मध्ये पावसाळी लाईनची साफसफाई, ड्रेनेज लाईनची साफसफाई तसेच नाले व कलव्हर्टची साफसफाईची कामे मुख्य खात्यांमार्फत करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मुख्य खात्यामार्फत क्षेत्रिय स्तरावरनैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती ओढविल्यास तात्काळ प्रतिसाद देणेकरीता टिम तयार ठेवावी जेणे करुन इमारतकोसळणे, नाला- ओढयाचे पाणी शहरातील विविध भागात शिरणे, नागरिकांना स्थलांतरीत करणे इत्यादी घटनांमध्ये सदर कर्मचाऱ्यांची मदत होईल. अग्निशमन दला मार्फत प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयास आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात घ्यावी. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
—-
News title |