Scholarship : PMC Website : 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती : पुन्हा 15 दिवसांनी का वाढवावी लागली मुदत?

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

10 वी, 12 वी शिष्यवृत्ती : पुन्हा 15 दिवसांनी वाढवावी लागली मुदत

: ऑनलाईन अर्ज भरताना अडथळे

पुणे : पुणे महापालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे आॅनलाइन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ (Website) वारंवार हँग होत आहे. पालक व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज (Scholarship Application) भरण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिष्यवृत्ती भरण्याची मुदत १५ दिवस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ही मुदत 28 जानेवारी पर्यंत होती.

महापालिकेतर्फे इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये समाज विकास विभागातर्फे महापालिका हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्के गुण मिळाल्यास १५ हजार व बारावी एवढेच गुण मिळाल्यास २५ हजार रुपायांची शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या शाळांमधील व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही अट ६५ टक्क्यांची आहे.कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर यंदा पदवीच्या प्रवेश प्रक्रिया लांबली आहे व आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी असलेल्या संकेतस्थळाचा तांत्रिक प्रश्‍न निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नव्हते. त्यामुळे २८ जानेवारी पर्यंतची मुदतवाढ दिली होती.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे संकेतस्थळ वारंवार हँग होत आहे. कागदपत्र अपलोड होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नाहीत. क्षेत्रीय कार्यालयाकडे चौकशी केली तरी समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. आज (ता. २८) या योजनेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. पण अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी आल्याने आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास अडथळे येत असल्याचा तक्रारी आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत १२ हजार ९८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.

Leave a Reply