10th, 12th Supplementary Exam Results | दहावी व बारावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र
Spread the love

10th, 12th Supplementary Exam Results | दहावी व बारावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश

 

10th, 12th Supplementary Exam Results |  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) जुलै –  ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल (supplementary exam result)नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण (10th, 12th passed students) झालेल्या विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याची संधी (Opportunity to take admission in professional courses) तंत्रशिक्षण संचालनालयाने (Directorate of Technical Education) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(10th, 12th Supplementary Exam Results)

इयत्ता दहावी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तूकला पदविका तसेच इयत्ता बारावीनंतरच्या औषधीनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, सरफेस केटरिंग टेक्नॉलॉजी पदविका अभ्यासक्रमांबरोबरच आयटीआयनंतरच्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. (SSC and HSC Board) 

तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे या प्रक्रियेसाठी येत्या 8 सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे. तर इयत्ता बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी २० सप्टेंबर पर्यंत मुदत असणार आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश प्रक्रिये बाबतची  अधिक माहिती घ्यावी.

संस्था स्तरावरील कोट्यामध्ये व कॅपनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून ई-स्कूटनी पद्धत किंवा प्रत्यक्ष स्फोटनी पद्धत याद्वारे कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती करणे आवश्यक आहे.अर्ज निश्चिती झाल्यानंतरच अशा उमेदवारांनी प्रवेशासाठी संस्थांमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे अपेक्षित आहे. संस्थांकडे अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी संस्था पातळीवर संस्थेद्वारे तयार केली जाईल. संस्थेने ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया संस्थेद्वारे राबवली जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि संबंधित संस्थेकडे थेट संपर्क साधावा, असे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी स्पष्ट केले आहे.
—-

News Title | 10th, 12th Supplementary Exam Results | Admission to Vocational Courses for students who pass the 10th and 12th supplementary examination