Narayan Hut Shikshan Sanstha : नारायण हट शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्याच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्याचा वेगळा उपक्रम!

Categories
Education Political पुणे
Spread the love

नारायण हट शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्याच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्याचा वेगळा उपक्रम!

भोसरीतील नारायण हट शिक्षण संस्थेच्या नूतन शाळेच्या इमारतीचे पाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले. शाळेत प्रथम प्रवेश घेतलेल्या ३ वर्षीय छोट्या कु. शर्विल राहुल काळे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी  प्रमुख पाहुणे  आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती होती. शनिवार दिनांक २/४/२०२२ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

नारायण सहकारी गृह संस्थेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पूर्व-प्राथमिक विभाग मराठी /इंग्रजी माध्यमाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन गुढीपाडवा सणाच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने, पूर्व प्राथमिक विभागात प्रथम प्रवेश घेतलेल्या लहान मुलाच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करून एक नवीन आदर्श या शिक्षण संस्थेने निर्माण केला आहे.

नारायण हट शिक्षण संस्थेचे वतीने मराठी/ इंग्रजी माध्यम पूर्व- प्राथमिक शाळा सुरू२०२२ या वर्षात सुरू करण्यात आलीअसून टप्प्याटप्प्याने माध्यमिक/ उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
पूर्व- प्राथमिक शाळेच्या इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  महेशदादा लांडगे (आमदार ,भोसरी) नगरसेवक सौ. नम्रताताई लोंढे, मा. नगरसेवक योगेशभाऊ लोंढे, गृह संस्थेतील सभासद, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, पालक, परिसरातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार , महेश लांडगे म्हणाले”नारायण हट गृह संस्थे अंतर्गत सुरू झालेल्या शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. शाळेच्या अडचणी दूर करण्यात येतील व या परिसरात उत्तम कशी बनेल यासाठी मदत करण्यात येईल” नारायण हट शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सुरू होणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळेत ज्ञानप्रबोधिनीच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व उपक्रम राबविण्यात येणार असून शाळा ही विद्यार्थी व समाज विकासाचे केंद्र बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असा संस्थेचे सर्व संचालक मंडळाचा मनोदय आहे.
कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ सभासद  रोहिदास अल्लाट यांनी २५,००० हजार रुपये व श्री. दीपक इंगळे, १०,००० रुपये आर्थिक मदत आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते शिक्षण संस्थेस दिली.
उद्घाटन कार्यक्रमासाठी संदीप बेंडुरे, प्रा. डॉ. वसंतराव गावडे, प्रा. डॉ. सुयोग ताराळकर, डॉ. सुरेश पवार, यशवंत नेहरे, रामदासगाढवे, मनोज पवार, अंकुशराव गोरडे, शिवराम काळे,  रोहिदास गैंद, बाळासाहेब मुळुक, सतिश भालेराव,  मुकुंदराव आवटे, संजय सांगळे,  उज्वला थिटे, मन कर मामा, गृह संस्थेतील व शिक्षण संस्थेतील सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: प्रा. डॉ .बाळासाहेब माशेरे यांनी केले. आभार: ज्येष्ठ सभासद डॉ. रोहिदास आल्हाट त्यांनी मानले.

2 replies on “Narayan Hut Shikshan Sanstha : नारायण हट शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्याच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्याचा वेगळा उपक्रम!”

विधायक कार्याची दखल घेणारे ऑनलाइन वार्तापत्र अप्रतिम

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाची आहे सर ..!

Leave a Reply