PCMC News | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामांचे लोकार्पण

Categories
Breaking News Political पुणे

PCMC News | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामांचे लोकार्पण

PCMC News  – (The Karbhari News Service) – पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, मॅन्युफॅक्चरींग, तंत्रज्ञान, फळ प्रक्रीया क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन रोजगाराच्या संधी येत आहेत. रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक शहराकडे येत असतांना शहर सुंदर व स्वच्छ असण्याची गरज आहे. महानगरपालिकेने शहरीकरणाचा वेग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (PCMC)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभागृहात आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून पुढे येत आहेत. शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. असे होत असतांना शहर बकाल होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनाही राबविण्यात येत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजांनुसार सुविधा निर्माण कराव्या लागतील. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असून राज्य शासनही शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्री. फडणवीस म्हणाले, एखाद्या शहराला परिपूर्ण करणाऱ्या गोष्टींची सुरूवात आजच्या कार्यक्रमाद्वारे व्यवस्था होत आहे. आरोग्य, पर्यावरण, शिक्षण उपक्रमांची सुरूवात होत आहे. वेस्ट टू बायोगॅस आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनासोबत शहर स्वच्छ राखण्यास आणि इंद्रायणीचे पावित्र्य राखण्यास मदत होणार आहे. शहरातील हवेतील गुणवत्ता वाढण्यासही या प्रकल्पांमुळे मदत होईल. सांडपाणी नदीनाल्यात थेट सोडता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे, सांडपाणी प्रकल्पातून स्वच्छ केलेले पाणी सिंचनासाठी देण्याचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या अपेक्षाला मुर्तरूप देण्याचे काम या प्रकल्पांच्या माध्यमातून केले आहे. शिक्षण, आरोग्यासोबत रोजगार महत्वाचा असल्याने बचत गटांना बाजार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहे. या माध्यमातून महिलांना अर्थचक्राचा भाग बनविता येईल. त्यासोबत महानगरपालिकेने कौशल्यावर आधारीत कार्यक्रमाची स्तुत्य सुरूवात केली आहे. मनोरंजन आणि प्रबोधनासाठी टाऊन हॉल महत्वाचा ठरेल. आज शुभारंभ होत असलेल्या पायाभूत सुविधांचादेखील शहराला लाभ होऊन पुण्यासारखाच विकास झालेले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण होईल, शहरासाठी आधुनिक पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आमदार श्री.लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात पुढील २० वर्षांचा विचार करून विकासकामे करण्यात आली आहेत. भविष्यातले शहर म्हणून विविध सुविधा येथे निर्माण करण्यात येत आहेत. खेळाडुंसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त श्री.सिंह यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहरात अनेक चांगले बदल होत असून स्वच्छता, दर्जेदार पायाभुत सुविधा याबाबत महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. मोशी येथे 700 खाटांचे रुगणालय उभारण्यात येणार असून त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला चांगले उपचार देता येतील असे त्यांनी सांगितले. लोकार्पण करण्यात आलेले विविध कामांमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.

चिखली येथील टाऊन हॉल, भोसरी आणि बोऱ्हाडेवाडी येथील युवक व युवतींना रोजगार व प्रशिक्षण देणारा ‘कौशल्यम’ प्रकल्प, नवी दिशा प्रकल्पाअंतर्गत भोसरी येथील स्टीचिंग युनिट, मोशी येथील हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प आणि प्रभाग क्र.७ भोसरी गावठाणातील स.नं. १ मध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्र तसेच अनुषंगिक कामाचे उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गट सक्षमीकरण अंतर्गत ‘सक्षमा’ प्रकल्पाचा व मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग टप्पा २ कामाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.

१७.९ टन प्रतिदिन क्षमतेच्या जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, भोसरी स.नं.२१७- पंपिंग स्टेशनच्या अतिरिक्त वीज वापरण्याच्या ठिकाणी एनर्जी सेव्हिंगसाठी आवश्यक क्षमतेच्या एसटीपीचे, कुदळवाडी- जाधववाडी भागातून इंद्रायणी नदीस मिळणाऱ्या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम एनसीएपी अंतर्गत हवा शुद्धीकरण प्रणाली ॲड्री मिस्ट आधारित कारंजे प्रणाली, स्थिर धुके तोफ युनिटचे, चऱ्होली येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत निवासी सदनिकांचे आणि निगडी येथील जय ट्रेडर्स येथील पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

मोशी येथील गट क्र. ६४६ मधील गायरान जागेमध्ये उभारण्यात येणारे रुग्णालय, पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील एकूण १२.४ किमी लांबीच्या नवीन डीपी रस्त्याचे, भोसरी मधील प्रभाग क्र.७ येथील मनपा शाळेसाठी बांधण्यात येणारी इमारत, निगडी, दापोडी रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसन करणे, मुकाई चौक ते चिखली स्पाईन रस्ता विकसित करणे, त्रिवेणी नगर चौकातील स्पाईन रस्त्याची मिसिंग लिंक रस्ता विकसित करणे व भक्ती शक्ती ते मुकाई चौक बीआरटी कॉरीडॉर विकसित करणे या कामांचे भूमिपूजनदेखील श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Punyeshwar Temple | Nitesh Rane | आता मशिदीत घुसून अतिक्रमण पाडणार | नितेश राणे यांचा पुणे महापालिकेला इशारा

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

Punyeshwar Temple | Nitesh Rane | आता मशिदीत घुसून अतिक्रमण पाडणार | नितेश राणे यांचा पुणे महापालिकेला इशारा

Punyeshwar Temple | | Nitesh Rane | अयोध्येत बाबरी मशीद (Babri Mashid) होती त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी काय केले हे लक्षात आहे ना, आता त्या ठिकाणी भव्यदिव्य राम मंदीर (Ram Mandir) उभारले जात आहे. आता मथुरेमध्येदेखील श्रीकृष्णाचे मंदीर उभारले जाणार आहे. त्यानंतर आता पुण्येश्वर मंदीर (Punyeshwar Mandir) परिसरात असलेले मशिदीचे अतिक्रमण हटविले जाणार आहे. आता यापुढे अधिकार्‍यांना निवेदन द्यायचे नाही, तर थेट आतमध्ये घुसून मशिदीचे अतिक्रमण पाडायचे, असा इशारा भाजपाचे नेते आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाला दिला.

 

पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे. या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने महापालिकेच्या बाहेर भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. आमदार महेश लांडगे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते.

नितेश राणे म्हणाले की, पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात मशिदीचे अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत अनेक वेळा आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. त्या दरम्यानच्या कालावधीत त्या ठिकाणी चार मजली इमारत बांधली गेली होती. त्यावेळी महापालिका प्रशासनाचे अधिकारी काय करित होते. आम्ही कारवाईची मागणी केली की, आमच्या पदाधिकाऱ्यांना कायद्याचा धाक दाखविला जात आहे. आम्ही कायदे पाळणारे मंडळी असून आजपर्यंत कायदा पाळला आहे. हे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी लक्षात ठेवावे. तसेच आपल्या देश हिंदूंचा असून तुम्ही कशाला जिहाद्यांचे लाड करता. तुम्हाला ते वाचविण्यास येणार नाहीत .मी आणि महेश लांडगे यांनी विधानसभेत थोबाड उघडले, तर तुमची खुर्ची वाचविण्यास कोणीही येणार नाही. प्रत्येक विधानसभा अधिवेशनात किमान दोन अधिकार्‍यांना निलंबित करण्याचा माझा आजपर्यंत स्ट्राईक रेट आहे आणि मी तेव्हाच घरी जातो, असा इशारा महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी दिला.

पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात मशिदीचे अतिक्रमण हटविण्याबाबत महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर पावलं उचलावी, अन्यथा आम्ही यापुढील काळात अधिकार्‍यांना निवेदन किंवा आंदोलन करणार नाही, तर थेट मंदिर परिसरात मशिदीचे जे अतिक्रमण झाले आहे ते आम्ही पाडू. त्या घटनेला महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

—-

 

News Title | Punyeshwar Temple | Nitesh Rane | Now they will enter the mosque and encroach on it Nitesh Rane’s warning to Pune Municipal Corporation

Narayan Hut Shikshan Sanstha’s School | नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेचे  स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

Categories
cultural Education पुणे

नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेचे  स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

रविवार रोजी भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेचे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलनअतिशय आनंदात, जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाले.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन: शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, नगरसेवक विलास मडगेरी, मा.नगरसेवक संजयजी वाबळे,जेजुरी देवस्थान अध्यक्ष मा. तुषारजी सहाने, उद्योजक निलेश मुटके, नवनाथशेठ लोखंडे, ज्ञानेश्वर सावंत, मा. उपजिल्हाधिकारी सुभाषचंद्र भोसले, आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार महेशदादा लांडगे म्हणाले”नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेतील प्रथम वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम असतानाही अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला कार्यक्रमांमध्ये स्थान दिले ही विशेष बाब म्हणावी लागेल!” शाळेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थितांची संख्या खूप मोठी व लक्षणीय अशी होती. विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक, परिसरातील नागरिक, नारायण हट शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, नारायण हट शिक्षण संस्थेचे सभासद या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्नेहसंमेलनामध्ये लहान मुलांच्या कार्यक्रमांमध्ये भारतीय/महाराष्ट्रीय संस्कृतीवर आधारित कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आले होते. वार्षिकसंमेलनाच्या ठरलेल्या थीमवर आधारित सर्व कार्यक्रम सादर झाले. त्यामध्ये गणपती स्तवन, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, भारुड, गवळण, दिंडी, लावणी, वाघ्या मुरळी, महाराष्ट्राची लोकधारा,मंगळागौर, राष्ट्रभक्तीवर आधारित नृत्य, शेतकरी नृत्य, पशुपक्षांची शाळा, पालक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सादर केली.
विशेषता पालक मातांकडून सादर करण्यात आलेल्या “मंगळागौर”चा कार्यक्रम विशेष प्रेक्षणीय ठरला. यामध्ये जवळपास 30 माता पालकांनी सहभाग घेतला होता. पालकांसमवेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले कार्यक्रम अतिशय मोहक आणि आकर्षक ठरले.

कार्यक्रमाची सांगता डॉ.रोहिणी गव्हाणे यांच्यासुमधुर आवाजातील “पसायदानाने” झाली.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले, मालती माने, प्रतिभा तांबे, सायली संत, मीनल पाटील, हरिभाऊ असदकर, प्रियांका लोहारकर,वेदांत कुऱ्हाडे, सानिका कु- हाडे, ऋतुजा साठे, अश्विनी वायकर, सुरेखाताई मुके, प्रवीण भाकड, या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संयोजन: नारायण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष: संदीपजी बेंडुरे, सचिव, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, खजिनदार, डॉ. शरद कदम, अंकुशराव गोरडे, रोहिदास गैंद, शिवराम काळे, मुकुंदराव आवटे, डॉ वसंतराव गावडे, संजय सांगळे, शोभा आरुडे,उज्वला थिटे, रोहिणी पवार, सतीश भालेराव, नारायण हट शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नारायण हट गृह संस्थेचे सभासदांनी विशेष परिश्रम घेतले

Narayan Hut Shikshan Sanstha : नारायण हट शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्याच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्याचा वेगळा उपक्रम!

Categories
Education Political पुणे

नारायण हट शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्याच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्याचा वेगळा उपक्रम!

भोसरीतील नारायण हट शिक्षण संस्थेच्या नूतन शाळेच्या इमारतीचे पाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले. शाळेत प्रथम प्रवेश घेतलेल्या ३ वर्षीय छोट्या कु. शर्विल राहुल काळे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी  प्रमुख पाहुणे  आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती होती. शनिवार दिनांक २/४/२०२२ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

नारायण सहकारी गृह संस्थेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पूर्व-प्राथमिक विभाग मराठी /इंग्रजी माध्यमाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन गुढीपाडवा सणाच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने, पूर्व प्राथमिक विभागात प्रथम प्रवेश घेतलेल्या लहान मुलाच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करून एक नवीन आदर्श या शिक्षण संस्थेने निर्माण केला आहे.

नारायण हट शिक्षण संस्थेचे वतीने मराठी/ इंग्रजी माध्यम पूर्व- प्राथमिक शाळा सुरू२०२२ या वर्षात सुरू करण्यात आलीअसून टप्प्याटप्प्याने माध्यमिक/ उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
पूर्व- प्राथमिक शाळेच्या इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  महेशदादा लांडगे (आमदार ,भोसरी) नगरसेवक सौ. नम्रताताई लोंढे, मा. नगरसेवक योगेशभाऊ लोंढे, गृह संस्थेतील सभासद, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, पालक, परिसरातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार , महेश लांडगे म्हणाले”नारायण हट गृह संस्थे अंतर्गत सुरू झालेल्या शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. शाळेच्या अडचणी दूर करण्यात येतील व या परिसरात उत्तम कशी बनेल यासाठी मदत करण्यात येईल” नारायण हट शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सुरू होणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळेत ज्ञानप्रबोधिनीच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व उपक्रम राबविण्यात येणार असून शाळा ही विद्यार्थी व समाज विकासाचे केंद्र बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असा संस्थेचे सर्व संचालक मंडळाचा मनोदय आहे.
कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ सभासद  रोहिदास अल्लाट यांनी २५,००० हजार रुपये व श्री. दीपक इंगळे, १०,००० रुपये आर्थिक मदत आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते शिक्षण संस्थेस दिली.
उद्घाटन कार्यक्रमासाठी संदीप बेंडुरे, प्रा. डॉ. वसंतराव गावडे, प्रा. डॉ. सुयोग ताराळकर, डॉ. सुरेश पवार, यशवंत नेहरे, रामदासगाढवे, मनोज पवार, अंकुशराव गोरडे, शिवराम काळे,  रोहिदास गैंद, बाळासाहेब मुळुक, सतिश भालेराव,  मुकुंदराव आवटे, संजय सांगळे,  उज्वला थिटे, मन कर मामा, गृह संस्थेतील व शिक्षण संस्थेतील सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: प्रा. डॉ .बाळासाहेब माशेरे यांनी केले. आभार: ज्येष्ठ सभासद डॉ. रोहिदास आल्हाट त्यांनी मानले.