Grand Parents Day | नारायण हट इंग्लिश माध्यम स्कूल “ग्रँड पॅरेंट्स डे”-आजी आजोबा दिवस साजरा

Categories
Breaking News Education social पुणे

Grand Parents Day | नारायण हट इंग्लिश माध्यम स्कूल “ग्रँड पॅरेंट्स डे”-आजी आजोबा दिवस साजरा

Grand parents Day | शनिवार रोजी नारायण हट इंग्लिश माध्यम स्कूल, भोसरी येथे सायंकाळी ४ वाजता “आजी आजोबा दिवस” साजरा करण्यात आला.. अशी माहिती प्रा.डॉ. वसंत गावडे यांनी दिली.
 हा कार्यक्रम आजी-आजोबा आणि त्यांच्या नातवंडांचा हृदयस्पर्शी मेळावा होता.शंभर पेक्षा अधिक आजी आजोबा सहभागींसह हा दिन साजरा केला. सनई , ढोल ताशांच्या गजरात आजी- आजोबांचे स्वागत करण्यात आले..  सेल्फी काढुन नंतर सर्वजण स्थानापन्न  झाले.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व गुरुवंदना , गीतेचा  १२ वा अध्यायाने झाली..
आजी-आजोबा आणि नातवंडांमधील प्रेमाचा रेशीम बंध दृढ करणाऱ्या. ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे – श्री. शंकर देवरे सर,  ह. भ. प. बंडोपंत महाराज शेळके  यांचा परिचय, स्वागत प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका राक्षे मॅडम यांनी केले  त्यांनंतर चिन्मय मिशन आयोजित गीता पठण स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
आजी-आजोबा दिवसांचे महत्त्व सांगणारी हृदय स्पर्शी कविता – प्रविण भाकड सरांनी सादर केली. शिवन्या संत व शरण्या यांनी आजी आजोबांसाठी एक डान्स सादर केला. आजी-आजोबाची प्रत्येक नातवंडांनी पुजा पाय धुऊन हळदी कुंकू लावून केली.नंतर आजी-आजोबांनी नातवंडांना आशीर्वाद दिला.. आजी आजोबां साठी मनोरंजन खेळ घेण्यात आले.
– संत आजी-आजोबा
 मोहितेआजी-आजोबा
– रानडे आजी-आजोबा
– अनप आजी-आजोबा
यांना ज्ञानेश्वर माऊली चीं मुर्ती भेट म्हणून देण्यात आली..
आजी-आजोबांनी नृत्य आणि मधुर गाणी गाऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
आजी-आजोबांची भाषणे आणि मनोगत व्यक्त केले.
शाळेत चूल करून अल्पोपाहार तयार करून देण्यात आला  देवरे सरांच्या भजनाने व पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली..  कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले..

Indrayani Thadi Jatra | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप

जत्रोत्सवाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे- मुख्यमंत्री

इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि नारीशक्तीचा सन्मान प्रदर्शित करण्यात आला असून जत्रोत्सवामुळे आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, माजी मंत्री बाळा भेगडे आदी उपस्थित होते.

इंद्रायणी थडी जत्रा भव्यदिव्य आणि हजारोंना एकाचवेळी आनंद देणारी जत्रा असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, भारताची संस्कृती, परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम आहे. विविध वयेगाटातील आणि क्षेत्रातील व्यक्तींसाठी भव्यदिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यानिमित्ताने एक हजार स्टॉल द्वारे ८०० महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळाली आहे. महिला बचत गट आणि लहान व्यावसायिकांना अशा महोत्सवातून बाजारपेठ मिळते आणि त्यातून मोठे उद्योजक तयार होतात. म्हणून अशा महोत्सवाचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे श्री.शिंदे म्हणाले.

सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आणि राज्याची प्रगती करणारे सरकार आहे. म्हणूनच कोविडनंतर शासनाने निर्बंध हटविल्याने विविध उत्सव सुरू झाले आहेत. सर्वसामान्यांच्या आकांक्षांना न्याय देण्याचे कार्य सरकार करत आहे. सहा महिन्यात सर्व समाजघटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उत्तम आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार लांडगे यांचे अभिनंदन केले.

आमदार लांडगे आणि विकास डोळस यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Narayan Hut Shikshan Sanstha’s School | नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेचे  स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

Categories
cultural Education पुणे

नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेचे  स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

रविवार रोजी भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेचे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलनअतिशय आनंदात, जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाले.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन: शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, नगरसेवक विलास मडगेरी, मा.नगरसेवक संजयजी वाबळे,जेजुरी देवस्थान अध्यक्ष मा. तुषारजी सहाने, उद्योजक निलेश मुटके, नवनाथशेठ लोखंडे, ज्ञानेश्वर सावंत, मा. उपजिल्हाधिकारी सुभाषचंद्र भोसले, आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार महेशदादा लांडगे म्हणाले”नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेतील प्रथम वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम असतानाही अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला कार्यक्रमांमध्ये स्थान दिले ही विशेष बाब म्हणावी लागेल!” शाळेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी उपस्थितांची संख्या खूप मोठी व लक्षणीय अशी होती. विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक, परिसरातील नागरिक, नारायण हट शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, नारायण हट शिक्षण संस्थेचे सभासद या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्नेहसंमेलनामध्ये लहान मुलांच्या कार्यक्रमांमध्ये भारतीय/महाराष्ट्रीय संस्कृतीवर आधारित कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आले होते. वार्षिकसंमेलनाच्या ठरलेल्या थीमवर आधारित सर्व कार्यक्रम सादर झाले. त्यामध्ये गणपती स्तवन, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, भारुड, गवळण, दिंडी, लावणी, वाघ्या मुरळी, महाराष्ट्राची लोकधारा,मंगळागौर, राष्ट्रभक्तीवर आधारित नृत्य, शेतकरी नृत्य, पशुपक्षांची शाळा, पालक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सादर केली.
विशेषता पालक मातांकडून सादर करण्यात आलेल्या “मंगळागौर”चा कार्यक्रम विशेष प्रेक्षणीय ठरला. यामध्ये जवळपास 30 माता पालकांनी सहभाग घेतला होता. पालकांसमवेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले कार्यक्रम अतिशय मोहक आणि आकर्षक ठरले.

कार्यक्रमाची सांगता डॉ.रोहिणी गव्हाणे यांच्यासुमधुर आवाजातील “पसायदानाने” झाली.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले, मालती माने, प्रतिभा तांबे, सायली संत, मीनल पाटील, हरिभाऊ असदकर, प्रियांका लोहारकर,वेदांत कुऱ्हाडे, सानिका कु- हाडे, ऋतुजा साठे, अश्विनी वायकर, सुरेखाताई मुके, प्रवीण भाकड, या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संयोजन: नारायण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष: संदीपजी बेंडुरे, सचिव, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, खजिनदार, डॉ. शरद कदम, अंकुशराव गोरडे, रोहिदास गैंद, शिवराम काळे, मुकुंदराव आवटे, डॉ वसंतराव गावडे, संजय सांगळे, शोभा आरुडे,उज्वला थिटे, रोहिणी पवार, सतीश भालेराव, नारायण हट शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नारायण हट गृह संस्थेचे सभासदांनी विशेष परिश्रम घेतले

Rakshabandhan | चिमुकल्यांसाठी राखी बनवण्याचे प्रशिक्षण देत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात  साजरा! 

Categories
Breaking News cultural social पुणे

चिमुकल्यांसाठी राखी बनवण्याचे प्रशिक्षण देत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात  साजरा!

“भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी “राखी पौर्णिमेच्या” सणानिमित्त राखी बनवण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. आणि या प्रशिक्षणातून मुलांनी बनवलेल्या राख्या एकमेकांना बांधत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात/आनंदात रक्षाबंधन सण  साजरा केला !”

श्रावण महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण सण भारतीय संस्कृती परंपरेनुसार साजरा केला जातात. त्यातील रक्षाबंधन हा महत्त्वपूर्ण सण मानला जातो. या सणाचे औचित्य साधून रक्षाबंधनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, त्यांना स्वतः राख्या बनवण्याची कौशल्य प्राप्त व्हावे, नवनिर्मिती क्षमता प्राप्त व्हावी, सौंदर्यअभिरुची आणि रसिकतेचा विकास व्हावा,स्वानंद मिळावा, कला-कौशल्य विकसित व्हावी,बंधू -भावाच्या ऋणानुबंधांचे संस्कारबालमनावरव्हावे,त्यांच्यामध्ये विविध मूल्यांची रुजवणूक व्हावा.
या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मंगळवार दिनांक ९/८/२०२२ रोजी सकाळी १:३०० ते १२:०० यावेळी विद्यार्थ्यांना राख्या कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. शाळेतील शिक्षिका सौ. सायली संत, आणि सौ. प्रतिभा तांबे यांनी हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याकडून सरावाने स्वतःच्या कौशल्याने/हाताने बनवलेल्या राख्या तयार करून घेतल्या. अतिशय आनंदाने विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतली. प्रशिक्षणात बनविण्यात आलेल्या राख्याचा वापर करून बुधवार दिनांक १०/८/२०२२ ( रक्षाबंधनाच्या सुट्टीमुळे)शाळेत “रक्षाबंधन” सण साजरा करण्यात आला. औक्षण करूनविद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या एकमेकाला बांधून पवित्र अशा भाऊ- बहीण बंधनाचे संस्कार त्यांच्यावर घडविण्यात आले.

विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्व या विषयी माहिती प्राचार्य, विजया चौगुले, आणि सौ. मीनल बागुल यांनी दिली.
नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत शिक्षणाबरोबर असे विविध संस्काराचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जातत. त्यातून विद्यार्थी घडत आहेत याचे समाधान संस्थेला मिळत आहे.
कार्यक्रमाचे संयोजन: शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले,  सायली संत,  मीनल बागुल, प्रतिभा तांबे, भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुंके, प्रवीण भाकड यांनी अतिशय मेहनत घेऊन केले.

 

Gurupornima | “भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या-प्री प्रायमरी शाळेत “गुरुपौर्णिमा” कार्यकम संपन्न!”

Categories
Breaking News Education पुणे

“भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या-प्री प्रायमरी शाळेत “गुरुपौर्णिमा” कार्यकम संपन्न!”

शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर गुरूंच्या महात्म्याची जाणीव व्हावी, शालेय जीवनात भक्ती, शक्ती, विनम्रता, सहनशीलता, प्रामाणिकपणा, आज्ञाधारक पणा, त्याग ,सेवा,हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत, आई वडील, शिक्षक, यांच्या विषयी कृतज्ञता विद्यार्थ्यां मध्ये निर्माण व्हावी.या उद्देशाने “गुरुपौर्णिमा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. श्री. ज्ञानेश्वरजी सावंत(व्यवस्थापक, ज्ञान प्रबोधनी, निगडी) कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  डॉ.रोहिदासजीआल्हाट(समाजसेवक, ज्येष्ठ विचारवंत) हे होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरु प्रतिमा पूजन करून आणि “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देवो महेश्वरा!”या प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेमध्ये कार्यरत शिक्षक (गुरु) म्हणून सेवेत असणाऱ्या गुरूंचे नारायण हट शिक्षण संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त छोट्या मुलांना गुरुचे महत्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. रोहिदास आल्हाट यांनी मार्गदर्शन करताना”गुरु हा सर्वश्रेष्ठ असून प्रत्येक व्यक्ती गुरूंच्या मार्गदर्शनाखाली घडत असते. प्रत्येकाने गुरुस्थानी असणाऱ्या आपल्या माता-पित्यांना, शिक्षकांचा आदर केला पाहिजे. आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता नेहमी ठेवली पाहिजे”
कार्यक्रमाचे अध्यक्ष: मा. श्री. ज्ञानेश्वर सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले”गुरुपौर्णिमेसारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार होण्यास मदत होणार आहे. आज शिक्षणाला संस्काराची जोड मिळण्याची गरज असून ते काम ज्ञान प्रबोधनीच्या मार्गदर्शनाखाली नारायण हट शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी केले जाते. भविष्यात ही शाळा संपूर्ण भोसरी परिसरात आदर्श शाळा म्हणून लवकरच नावलौकिकास पात्र ठरेल! ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य या शाळेत करण्यात येईल!”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुशराव गोरडे (संचालक, नारायण शिक्षण संस्था) यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. आभार: सौ. प्रतिभा तांबे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता” वंदे मातरम!” गीताने झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्य, विजया चौगुले, प्रतिभा तांबे,  सायली संत, मीनल बागुल, भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुके,  प्रवीण भाकड यांनी अतिशय मेहनत घेतली.
कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक/ पालक नारायण हट शिक्षण संस्थेचे संचालक, गृह संस्थेचे सभासद, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Education | शिक्षण घेणे हा आनंदसोहळा वाटला पाहिजे | दत्तात्रेय वारे

Categories
Breaking News cultural Education पुणे महाराष्ट्र

शिक्षण घेणे हा आनंदसोहळा वाटला पाहिजे | दत्तात्रेय वारे

भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्रि-प्रायमरी शाळेत नुकतेच आदर्श शिक्षक, वाबळेवाडी(ता. शिरूर जि. पुणे) येथीलजागतिक कीर्तीच्याशाळेचे शिल्पकार, राष्ट्रपती पारितोषिक विजेते, शिक्षण राज्यमंत्र्यांचे स्वीय, मा.श्री. दत्तात्रेय वारे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

दत्तात्रय वारे सरांचे स्वागत ,शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नारायण हट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष: श्री. संदीप बेंडुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी:  दिगंबर ढोकले {ज्येष्ठशिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, प्रवचनकार) हे होते.
आदरणीय दत्तात्रेय वारे सर आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हणाले,”नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेस जागतिक दर्जाची करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य मी स्वतः करेन! ते पुढे म्हणाले
“शिक्षण घेणे हा आनंदसोहळा वाटला पाहिजे, शाळेत येताना मुलांनी घाई केली पाहिजे व घरी जाताना ती रेंगाळली पाहिजेत , मुलांना खाजगी शिकवणी लावण्याची गरज पडायला नको, अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांवर उत्कृष्ट संस्कार व्हावेत व त्यातून शाळांच्या इमारतीत उद्याचा आदर्श नागरिक निर्माण व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शाळांनी लक्ष द्यावे, समाजाचे ही आपल्याबद्दल उत्तरदायित्व असल्यामुळे चांगल्या शाळा गावागावात निर्माण व्हावयास हव्यात!”
आपल्या एक तासाच्या व्याख्यानामध्ये स्वतःच्या कामाचे अनुभव सांगताना व शाळेविषयी दृष्टीकोण मांडताना त्यांनी पालकांना व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यापूर्वी वाबळेवाडी, तालुका शिरूर येथे शाळेत केलेले उल्लेखनीय व अप्रतिम नेत्रदीपक काम व जागतिक कीर्ती पर्यंत शाळेचा पोचवलेला दर्जा, व सध्या कनेरसर ता. खेड जि. पुणे येथे कार्यरत असताना चालू असलेले काम , नाविन्यपूर्ण उपक्रमा विषयी सखोल माहिती व्याख्यानातून त्यांनी दिली.


नारायणहट शिक्षण संस्थेचे सचिव: प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले,”आदरणीय दत्तात्रेय वारे सरांच्या मार्गदर्शनाखाली नारायण हट शिक्षण संस्थेची आपली शाळा एक आदर्श व नामवंत शाळा बनवण्याचा प्रयत्न करून विद्यार्थी व समाज विकासाचे केंद्र करण्यात येईल”
कार्यक्रमाच्या अध्यक्ष: दिगंबर ढोकले सर आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले” ” नारायण हट शिक्षण संस्थेची शाळा भोसरी परिसरात एक नामवंत शाळा म्हणून नक्की उदयास येईल असा आशावाद व्यक्त केला. व शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या!”
या कार्यक्रमासाठी नारायण हट शिक्षण संस्थेचे संचालक, गृह संस्थेचे सभासद, परिसरातील नागरिक, पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन:अंकुशराव गोरडे, संदीप बेंडुरे,  रोहिदास गैंद,  मुकुंद राव आवटे, डॉ.वसंतराव गावडे, डॉ. बाळासाहेब माशेरे, शिवराम काळे, सौ. उज्वला थिटे, सौ. रोहिणी पवार, यांनी केले.
सूत्रसंचालन: सौ मीनल बागुल यांनी केले. आभार: सौ. सायली संत यांनी मांनले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी: विजय चौगुले, सौ.प्रतिभा तांबे, श्री. प्रवीण भाकड, सुरेखाताई मुके, सौ.भाग्यश्री नगरकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Student Welcome | ‘बालआनंद मेळाव्यास'(विद्यार्थी स्वागत) कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Categories
Education पुणे

‘बालआनंद मेळाव्यास'(विद्यार्थी स्वागत) कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

| लहान मुलांचा एक आगळावेगळा उत्सव संपन्न.

राज्यभरातील सर्व शाळा १५ जून पासून सुरू होत आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्याअगोदर नव्याने सुरू होणाऱ्या नारायण शिक्षण संस्थेतील प्री-प्रायमरी विभागाच्या मुलांचा ‘आनंद मेळावा’स्वागताचा आगळावेगळा कार्यक्रम मंगळवार दिनांक १४/५/२०२२ रोजी सकाळी ९:३० ते १२:०० या वेळेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून परिसरामध्ये सर्वत्र त्याची चर्चा चालू आहे.

प्री- प्रायमरी विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे खालील आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
१) वाजत-गाजत मिरवणूक:बाल चमचे पारंपारिक वाद्यांच्या म्हणजे सनई, ताशा, ढोल, डक, तुतारी,(वाद्यवृंद ताफा) यासारख्या पारंपारिक वाद्य गजरात मुलांचे गेट पासून मिरवणूक काढत वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. मुलांबरोबर त्यांचे पालकही या मिरवणूकीत उत्साहाने सहभागी झाले.
२) मुलांचे औवक्षण: शाळेत प्रवेश केल्यानंतर मुलांचे औव‌क्षण करून गुलाब पाकळ्यांची उधळण करत, गंध टिळा करून करण्यात आले. त्यांचे शाळेतील कुंकूवातील पहिलेपाऊल कागदावर उठून पालकांना देण्यात आले.
३) मुलांसाठी खाऊचे वाटप: मुलांना चिक्की पाकीट देऊन, त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
४) मनोरंजक : मुलांच्या मनोरंजनासाठी खेळ, गाणी, नुत्य सामूहिक पद्धतीने घेण्यात आले.
५) वट पौर्णिमेचे महत्व: वटपौर्णिमा असल्यामुळेशाळेच्या गार्डनमधील वडाभोवती महिलांचे चाललेले पूजन प्रत्यक्ष मुलांना या ठिकाणी नेऊन दाखवून वटपौर्णिमे विषयी गाणे ऐकवण्यात आले.
६) ट्रॅडिशनल पेहराव: बहुतेक सर्व मुले वेगवेगळ्या ट्रॅडिशनल पेहरावा मध्ये मोठ्या आनंदाने सहभागी झाली होती.
स्वागतकार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांनी शाळे कडून आयोजित विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या स्वागताचे मन भरून कौतुक केले.

कार्यक्रमासाठी नारायणहट शिक्षण संस्थेचे, व नारायण हट गृह संस्थेचे, सभासद संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन: शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले, यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. प्रतिभा तांबे, सौ सायली संत, सौ भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुके, श्री प्रवीण भाकड(शिक्षक वृंद) यांनी केले.
वैविध्यपूर्ण कार्यक्रमासाठी नारायण हट शिक्षण संस्थेची प्रा-प्रायमरी शाळा प्रसिद्धीस येऊ लागले आहे.

World Environment Day | लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी राबविली दत्तक वृक्ष योजना

Categories
cultural social पुणे

लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी राबविली दत्तक वृक्ष योजना

५ जून ‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त नारायण हट शिक्षण संस्था, नारायण हट गृह संस्था, भूगोल फाउंडेशन भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने १०० देशी वृक्षांची लागवड केली . शिवाय  लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी दत्तक वृक्ष (वृक्षसंवर्धन पालकत्व ) योजना राबवली आहे.

पर्यावरण रासाचे परिणाम संपूर्ण जग अनुभवत असून त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज आहे. म्हणून झाडे लावणे व झाडे जगवणे पर्यावरण संरक्षणासाठी गरजेचे झाले आहे. यासाठी दिनांक ५ जून २०२२रोजी सकाळी ९:०० ते११:३० या वेळेत ‘जागतिक पर्यावरण दिनाच्या ‘औचित्य साधून१०० देशी वृक्षांची लागवड भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळा क्रीडांगण परिसरात करण्यात आली.
नारायण हट शिक्षण संस्था, भूगोल फाउंडेशन, नारायण हट सहकारी गृह संस्था, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


एकूण लागवड केलेल्या वृक्षांमध्ये फळझाडे, आयुर्वेदिक झाडे, पर्यावरण पूरक झाडे, लागवड करण्यात आली असून वड, पिंपळ, चिंच, उंबर, आंबा, फणस, पेरू, जांभूळ, सोनचाफा, अडुळसा, बकुळ, रामफळ, नारळ, कवट, सिताफळ, बोर, अर्जुन, कडूनिंब,या जातीच्या झाडांना प्राधान्य देण्यात आले आहे.

केवळ झाडे लावून उपयोग नाही त्यांचे संगोपन पर्यावरणाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. यासाठी आजच्या उपक्रमात दत्तक वृक्ष(वृक्षसंवर्धन पालकत्व) ही संकल्पना स्वीकारण्यात आली असून त्यानुसार शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पालकांनी झाडांचे संगोपन व सोसायटीतील सभासदांनी झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी वाटून घेतली आहे. प्रत्येकाने स्वतःलागवड केलेल्या एक झाडाचे संगोपन वर्षभर करून त्यांचा पुढील वर्षी वाढदिवस साजरा करण्याचे यानिमित्ताने ठरले आहे.

या कार्यक्रमासाठी सोसायटीचे सभासद, संचालक, शिक्षण संस्थेचे संचालक, भूगोल फाऊंडेशनचे सभासद, शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण७६ लोकांनी वृक्ष लागवडी मध्ये सहभाग घेतला.

वृक्षलागवड कार्यक्रमाचे संयोजन अंकुशराव गोरडे, रोहिदास गैंद,  शिवराम काळे, डॉ. वसंतराव गावडे, डॉ‌ बाळासाहेब माशेरे, विठ्ठल वाळुंज साहेब,  साहेब राव गावडे , कर्नल तानाजी अर्बुज, अनिल घाडगे, राजेंद्र ठाकूर, मनोज माकुडे, शशिकांत वाढते, एज अक्षय पोटे, अनिल पवार, ज्योतीताई दरंदले, शोभाताई फटागडे, शीलाताई इतके, मीनाताई आखाडे, ज्ञानेश्वर सावंत, श्री. यशवंत नेहरे, श्री. डॉ. सुरेश पवार, श्री. संजय सांगळे, सौ. शोभा आरुडे,सौ रोहिणी पवार, सौ. उज्वला थिटे, आणि भूगोल फाउंडेशन भोसरी यांनी  मोफत वृक्ष उपलब्ध करून दिले. तसेच शाळेतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिचेपालक  नितीन बागुल यांनी शाळेसाठी खत स्वतः गोळा उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विठ्ठलशेठवाळुंज यांनी केले सूत्रसंचालन: प्रा डॉ बाळासाहेब माशेरे यांनी केले तर आभार संदीप बेंडुरे यांनी मानले.

Narayan Hut Shikshan Sanstha : नारायण हट शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्याच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्याचा वेगळा उपक्रम!

Categories
Education Political पुणे

नारायण हट शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्याच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्याचा वेगळा उपक्रम!

भोसरीतील नारायण हट शिक्षण संस्थेच्या नूतन शाळेच्या इमारतीचे पाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले. शाळेत प्रथम प्रवेश घेतलेल्या ३ वर्षीय छोट्या कु. शर्विल राहुल काळे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी  प्रमुख पाहुणे  आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती होती. शनिवार दिनांक २/४/२०२२ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

नारायण सहकारी गृह संस्थेच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पूर्व-प्राथमिक विभाग मराठी /इंग्रजी माध्यमाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन गुढीपाडवा सणाच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने, पूर्व प्राथमिक विभागात प्रथम प्रवेश घेतलेल्या लहान मुलाच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करून एक नवीन आदर्श या शिक्षण संस्थेने निर्माण केला आहे.

नारायण हट शिक्षण संस्थेचे वतीने मराठी/ इंग्रजी माध्यम पूर्व- प्राथमिक शाळा सुरू२०२२ या वर्षात सुरू करण्यात आलीअसून टप्प्याटप्प्याने माध्यमिक/ उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
पूर्व- प्राथमिक शाळेच्या इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे  महेशदादा लांडगे (आमदार ,भोसरी) नगरसेवक सौ. नम्रताताई लोंढे, मा. नगरसेवक योगेशभाऊ लोंढे, गृह संस्थेतील सभासद, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, पालक, परिसरातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार , महेश लांडगे म्हणाले”नारायण हट गृह संस्थे अंतर्गत सुरू झालेल्या शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. शाळेच्या अडचणी दूर करण्यात येतील व या परिसरात उत्तम कशी बनेल यासाठी मदत करण्यात येईल” नारायण हट शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सुरू होणाऱ्या पूर्व प्राथमिक शाळेत ज्ञानप्रबोधिनीच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व उपक्रम राबविण्यात येणार असून शाळा ही विद्यार्थी व समाज विकासाचे केंद्र बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असा संस्थेचे सर्व संचालक मंडळाचा मनोदय आहे.
कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ सभासद  रोहिदास अल्लाट यांनी २५,००० हजार रुपये व श्री. दीपक इंगळे, १०,००० रुपये आर्थिक मदत आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते शिक्षण संस्थेस दिली.
उद्घाटन कार्यक्रमासाठी संदीप बेंडुरे, प्रा. डॉ. वसंतराव गावडे, प्रा. डॉ. सुयोग ताराळकर, डॉ. सुरेश पवार, यशवंत नेहरे, रामदासगाढवे, मनोज पवार, अंकुशराव गोरडे, शिवराम काळे,  रोहिदास गैंद, बाळासाहेब मुळुक, सतिश भालेराव,  मुकुंदराव आवटे, संजय सांगळे,  उज्वला थिटे, मन कर मामा, गृह संस्थेतील व शिक्षण संस्थेतील सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: प्रा. डॉ .बाळासाहेब माशेरे यांनी केले. आभार: ज्येष्ठ सभासद डॉ. रोहिदास आल्हाट त्यांनी मानले.

Narayan Hut Sahakari Griha Sanstha : School Sanitation : नारायण हट सहकारी गृह संस्थेच्या वतीने शाळा परिसरात श्रमदान

Categories
Education social पुणे

नारायण हट सहकारी गृह संस्थेच्या वतीने शाळा परिसरात श्रमदान

पिंपरी : भोसरी येथील नारायण हट सहकारी गृह संस्थेच्या वतीने गृह संस्थेअंतर्गत नव्याने जून२०२२ पासून सुरू होणाऱ्या शाळा परिसरात श्रमदान/ परिसर स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

” माझी सोसायटी माझी जबाबदारी”! “तसेच माझी शाळा माझे कर्तव्य!”या भूमिकेतून भोसरी येथील नारायण हट सहकारी गृह संस्थेअंतर्गत सन२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सुरू होणाऱ्या शिशुवर्ग शाळा प्रांगणात(अडीचएकराच्या परिसरात) रविवार दिनांक २७/३/२०२२ रोजी सकाळी ८ ते १०:००या वेळेत श्रमदान/परिसर स्वच्छता या उपक्रमाचेआयोजित करण्यात आले. या उपक्रमात सोसायटीमधील बहुसंख्य सभासद सह-कुटुंब सहभागी झाले होते. आबालवृद्ध, महिला, पुरुष, तरुण मोठ्या संख्येने श्रमदानासाठी उपस्थित होते.

श्रमदानाची सुरुवात सोसायटीतील ज्येष्ठ सभासद  ज्ञानेश्वर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली. श्रमदानासाठी सहभागी सभासदांनी आपल्याबरोबर स्वतःचे खराटा -झाडू, विळा, खुरपे, घमेले, खोरे, टिकाव, कुदळ, यापैकी जे उपलब्ध साहित्य असेल ते बरोबर घेऊन सहभागी झाले.
श्रमदान हेच सर्वश्रेष्ठ दान! यानुसार छोटासा प्रयत्न सोसायटीच्या अंतर्गत२०२२-२३ या वर्षात जून महिन्यात सुरू होणाऱ्या शिशुवर्ग शाळेच्या प्रांगणात हे श्रमदान करण्यात आले. नारायण हटगृह संस्थेअंतर्गत शाळेसाठी अडीच एकर एवढा मोठा परिसर उपलब्ध असून इमारत बांधून तयार आहे. या इमारतीत ही शाळा सुरू होणार असून भविष्यात टप्प्याटप्प्याने पुढचे वर्ग सुरू होणार आहेत. ही शाळा सुरू होण्याने भविष्यात या परिसरातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. येत्या जून मध्ये शिशू वर्ग सुरू होणार असून त्यासाठीचीॲडमिशन प्रक्रिया एक तारखे पासून(१ एप्रिल२०२२ पासून) सुरू होणार आहे.म्हणून ॲडमिशन प्रक्रिया सुरू करण्या आधी शालेय परिसर सोसायटीच्या सभासदांच्या श्रमदानातून स्वच्छ करावा. या हेतूने सोसायटीतील सर्व सभासदांनी विचार विनिमय करून शालेय परिसरात श्रमदान व परिसर स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..


श्रमदाना अंतर्गत नव्याने सुरू होणाऱ्याशालेय परिसरात दोन तास श्रमदान करून स्वच्छता करण्यात आला. भोसरी परिसरातील नारायणहट सहकारी गृह संस्था ही प्रसिद्ध गृह सोसायटी असून गृह संस्थेअंतर्गत स्वतःची शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षणाचे कार्य करणारी ही वेगळी संस्था ठरणार आहे. सोसायटी अंतर्गत नव्याने सुरू होण-ऱ्या शाळे मुळे सोसायटी व आजूबाजूच्या परिसरातील मुलांना जवळच दर्जेदार दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्यार आहे. ज्ञान प्रबोधनी, निगडी मार्गदर्शित ही शाळा सुरु करून तेथील सर्व उपक्रम राबविण्याचा मानस शिक्षण संस्थेच्या संचालकांचा आहे. चांगल्या शैक्षणिक कार्याचीसुरुवात श्रमदानातून करण्यासाठी सोसायटीने केलेला. हा एक प्रयत्न निश्चित इतरांना प्रेरणादायी आहे.

शाळा परिसर स्वच्छता व श्रमदान कार्यक्रमात सहभागी झालेल्या सभासदांमध्ये  ज्ञानेश्वर सावंत, संदीप बेंडुरे,  मुकुंदराव आवटे, शिवराम काळे,  संजयराव सांगळे, रोहिदास गैंद,  उज्वला थिटे,  रोहिणी पवार, अंकुशराव गोरडे, प्रा. डॉ. वसंतराव गावडे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे,  यशवंतराव नेहरे, रामदास गाढवे,  शंकरराव पवार, सचिन बो-हाडे, .अमोल मुळुक,  बाळासाहेब मुळूक, तनिषअल्हाट, अनिता सांगळे,  वैशाली गावडे,, यांनी या उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.