PMPML Income | रक्षाबंधन दिवशी पीएमपी ला मिळाले कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न

Categories
Breaking News social पुणे

रक्षाबंधन दिवशी पीएमपी ला मिळाले कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न

पुणे – रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत पीएमपीने गुरुवारी १८१२ बस सोडल्या होत्या. यातून एका दिवसात सुमारे १३ लाख प्रवाशांनी प्रवास केला तर यातून पीएमपीला सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. नेहमीच्या तुलनेत सुमारे तीन लाख अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केला तर यातून सुमारे चाळीस लाख जास्तीचे उत्पन्न मिळाले आहे.

रक्षाबंधनामुळे सकाळपासून पीएमपीच्या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत होता. प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पीएमपी प्रशासनाने गुरुवारी १८१२ बस रस्त्यांवर उतरविल्या. सकाळच्या सत्रात सुमारे ९० लाख रुपयांचे तर दुपारच्या सत्रांत ८५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा दरम्यान ही प्रवासी वाहतूक झाली.

Girish Gurnani | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ममता फाउंडेशनमध्ये रक्षाबंधन साजरा

Categories
Breaking News cultural Political पुणे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ममता फाउंडेशनमध्ये रक्षाबंधन साजरा

पुणे: कात्रज येथील ममता फाउंडेशनमधील एचआयव्ही बाधित अनाथ निराधार मुलांनी रक्षाबंधनाचा आनंद घेतला. संस्थेतील मुलींनी स्वतः बनविलेल्या राख्या बांधून सण साजरा केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला.

गिरीश गुरनानी म्हणाले, ‘आई-वडिलांच्या कुशीत खरे बालपण असते, परंतु कित्येक बालकांच्या नशिबी असे बालपण येतच नाही. ममता फाउंडेशनमधील अशा अनाथ निराधार मुलांनी स्वतः बनविलेल्या राख्या आणि त्याचे बॉक्स खूप आकर्षक होते. राखी बांधताना मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता.

समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता.या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले.’

यावेळी अमोल गायकवाड ,मिलिंद शिंदे, विशाल विचारे, सागर पळे, मंगेश भोंडवे, संतोष सोनावणे आदी उपस्थित होते.

Rakshabandhan | चिमुकल्यांसाठी राखी बनवण्याचे प्रशिक्षण देत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात  साजरा! 

Categories
Breaking News cultural social पुणे

चिमुकल्यांसाठी राखी बनवण्याचे प्रशिक्षण देत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात  साजरा!

“भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी “राखी पौर्णिमेच्या” सणानिमित्त राखी बनवण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. आणि या प्रशिक्षणातून मुलांनी बनवलेल्या राख्या एकमेकांना बांधत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात/आनंदात रक्षाबंधन सण  साजरा केला !”

श्रावण महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण सण भारतीय संस्कृती परंपरेनुसार साजरा केला जातात. त्यातील रक्षाबंधन हा महत्त्वपूर्ण सण मानला जातो. या सणाचे औचित्य साधून रक्षाबंधनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, त्यांना स्वतः राख्या बनवण्याची कौशल्य प्राप्त व्हावे, नवनिर्मिती क्षमता प्राप्त व्हावी, सौंदर्यअभिरुची आणि रसिकतेचा विकास व्हावा,स्वानंद मिळावा, कला-कौशल्य विकसित व्हावी,बंधू -भावाच्या ऋणानुबंधांचे संस्कारबालमनावरव्हावे,त्यांच्यामध्ये विविध मूल्यांची रुजवणूक व्हावा.
या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मंगळवार दिनांक ९/८/२०२२ रोजी सकाळी १:३०० ते १२:०० यावेळी विद्यार्थ्यांना राख्या कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. शाळेतील शिक्षिका सौ. सायली संत, आणि सौ. प्रतिभा तांबे यांनी हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याकडून सरावाने स्वतःच्या कौशल्याने/हाताने बनवलेल्या राख्या तयार करून घेतल्या. अतिशय आनंदाने विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतली. प्रशिक्षणात बनविण्यात आलेल्या राख्याचा वापर करून बुधवार दिनांक १०/८/२०२२ ( रक्षाबंधनाच्या सुट्टीमुळे)शाळेत “रक्षाबंधन” सण साजरा करण्यात आला. औक्षण करूनविद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या एकमेकाला बांधून पवित्र अशा भाऊ- बहीण बंधनाचे संस्कार त्यांच्यावर घडविण्यात आले.

विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्व या विषयी माहिती प्राचार्य, विजया चौगुले, आणि सौ. मीनल बागुल यांनी दिली.
नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत शिक्षणाबरोबर असे विविध संस्काराचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जातत. त्यातून विद्यार्थी घडत आहेत याचे समाधान संस्थेला मिळत आहे.
कार्यक्रमाचे संयोजन: शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले,  सायली संत,  मीनल बागुल, प्रतिभा तांबे, भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुंके, प्रवीण भाकड यांनी अतिशय मेहनत घेऊन केले.

 

Symbolic rakhi | समस्यांची आठवण करून देण्यासाठी मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रतिकात्मक राखी 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

समस्यांची आठवण करून देण्यासाठी मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रतिकात्मक राखी

राखी म्हणजे रक्षण करण्याचे वचन. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांप्रति असलेल्या या कर्तव्याची जाणिव करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर शासकीय योजना सेलच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त राखी पाठविण्यात आली.

महागाईचा भस्मासुर नागरिकांवर हल्ला करतोय. बेरोजगारीच्या राक्षसाने तरुणांचे जीवन उध्वस्त केले आहे.इंधन दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलेंडर दरवाढ महिलांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या असे प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र सरकार शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून नागरिकांचा आवाज दाबत आहे.देशाचे पालक म्हणून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधान भावनेला हात घालून समाजात दुही पसरविणाऱ्या अनेकांना समर्थन देत आहेत.

या आणि अनेक समस्यांची आठवण करून देणारी राखी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प राखी पाठविण्यात आली . सिटीपोस्टातून पोस्टाद्वारे ह्या राख्या पाठविण्यात आल्या.

प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वात झालेल्या ह्या कार्यक्रमात वेणू शिंदे , मृणालिणी वाणी,मीना मोरे , अरुंधती जाधव,पूजा काटकर, उषा घोगरे ,सोनाली उजागरे,गणेश नलावडे , शशिकांत जगताप, रोहन पायगुडे व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते

Rakshabandhan festival | PMPML | पीएमपीएमएल कडून रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांकरिता ५४ जादा बसेसचे नियोजन

Categories
Breaking News social पुणे

पीएमपीएमएल कडून रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांकरिता ५४ जादा बसेसचे नियोजन

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी गुरूवार रोजी “रक्षाबंधन” सणानिमित्त परिवहन महामंडळामार्फत मार्गावर धावणाऱ्या दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दरवर्षी “रक्षाबंधन”चे दिवशी मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग प्रवास करीत असतो. यास्तव दरवर्षीप्रमाणे परिवहन महामंडळाने “रक्षाबंधन”चे दिवशी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या (१७५५ बसेस) नियोजित बसेस व्यतिरिक्त जादा ५४ बसेस अशा एकुण १८०९ बसेसचा ताफा महामंडळाकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
सदरील जादा बसेस ह्या गर्दीच्या मुख्य बस स्थानकांवरून कात्रज, चिंचवड गाव, निगडी, सासवड, हडपसर, वरवंड, वाघोली, जेजुरी, आळंदी, तळेगाव, भोसरी, रांजणगाव, राजगुरूनगर व देहूगाव इत्यादी ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येतील. याकरिता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच महत्वाच्या
स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत.

“रक्षाबंधन” गुरूवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी असल्यामुळे यावर्षी दिनांक ११ व १२ ऑगस्ट २०२२ या दिवशी जादा बसेसचे नियोजन केलेले आहे. तसेच महामंडळाकडील अधिकारी, लिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करणेकामी
व वाहतूक नियंत्रण करणेकामी नेमणूक करण्यात आली आहे.
तरी पीएमपीएमएल कडून रविवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी “रक्षाबंधन” या सणाचे दिवशी उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करण्यात येणाऱ्या बसेस / वाहतूक व्यवस्थेची नोंद प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.