Rakshabandhan | चिमुकल्यांसाठी राखी बनवण्याचे प्रशिक्षण देत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात  साजरा! 

Categories
Breaking News cultural social पुणे
Spread the love

चिमुकल्यांसाठी राखी बनवण्याचे प्रशिक्षण देत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात  साजरा!

“भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी “राखी पौर्णिमेच्या” सणानिमित्त राखी बनवण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. आणि या प्रशिक्षणातून मुलांनी बनवलेल्या राख्या एकमेकांना बांधत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात/आनंदात रक्षाबंधन सण  साजरा केला !”

श्रावण महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण सण भारतीय संस्कृती परंपरेनुसार साजरा केला जातात. त्यातील रक्षाबंधन हा महत्त्वपूर्ण सण मानला जातो. या सणाचे औचित्य साधून रक्षाबंधनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, त्यांना स्वतः राख्या बनवण्याची कौशल्य प्राप्त व्हावे, नवनिर्मिती क्षमता प्राप्त व्हावी, सौंदर्यअभिरुची आणि रसिकतेचा विकास व्हावा,स्वानंद मिळावा, कला-कौशल्य विकसित व्हावी,बंधू -भावाच्या ऋणानुबंधांचे संस्कारबालमनावरव्हावे,त्यांच्यामध्ये विविध मूल्यांची रुजवणूक व्हावा.
या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मंगळवार दिनांक ९/८/२०२२ रोजी सकाळी १:३०० ते १२:०० यावेळी विद्यार्थ्यांना राख्या कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. शाळेतील शिक्षिका सौ. सायली संत, आणि सौ. प्रतिभा तांबे यांनी हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याकडून सरावाने स्वतःच्या कौशल्याने/हाताने बनवलेल्या राख्या तयार करून घेतल्या. अतिशय आनंदाने विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतली. प्रशिक्षणात बनविण्यात आलेल्या राख्याचा वापर करून बुधवार दिनांक १०/८/२०२२ ( रक्षाबंधनाच्या सुट्टीमुळे)शाळेत “रक्षाबंधन” सण साजरा करण्यात आला. औक्षण करूनविद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राख्या एकमेकाला बांधून पवित्र अशा भाऊ- बहीण बंधनाचे संस्कार त्यांच्यावर घडविण्यात आले.

विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्व या विषयी माहिती प्राचार्य, विजया चौगुले, आणि सौ. मीनल बागुल यांनी दिली.
नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळेत शिक्षणाबरोबर असे विविध संस्काराचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जातत. त्यातून विद्यार्थी घडत आहेत याचे समाधान संस्थेला मिळत आहे.
कार्यक्रमाचे संयोजन: शाळेच्या प्राचार्या, विजया चौगुले,  सायली संत,  मीनल बागुल, प्रतिभा तांबे, भाग्यश्री नगरकर, सुरेखाताई मुंके, प्रवीण भाकड यांनी अतिशय मेहनत घेऊन केले.