Rakshabandhan festival | PMPML | पीएमपीएमएल कडून रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांकरिता ५४ जादा बसेसचे नियोजन

Categories
Breaking News social पुणे
Spread the love

पीएमपीएमएल कडून रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांकरिता ५४ जादा बसेसचे नियोजन

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी गुरूवार रोजी “रक्षाबंधन” सणानिमित्त परिवहन महामंडळामार्फत मार्गावर धावणाऱ्या दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दरवर्षी “रक्षाबंधन”चे दिवशी मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग प्रवास करीत असतो. यास्तव दरवर्षीप्रमाणे परिवहन महामंडळाने “रक्षाबंधन”चे दिवशी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या (१७५५ बसेस) नियोजित बसेस व्यतिरिक्त जादा ५४ बसेस अशा एकुण १८०९ बसेसचा ताफा महामंडळाकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
सदरील जादा बसेस ह्या गर्दीच्या मुख्य बस स्थानकांवरून कात्रज, चिंचवड गाव, निगडी, सासवड, हडपसर, वरवंड, वाघोली, जेजुरी, आळंदी, तळेगाव, भोसरी, रांजणगाव, राजगुरूनगर व देहूगाव इत्यादी ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येतील. याकरिता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच महत्वाच्या
स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत.

“रक्षाबंधन” गुरूवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी असल्यामुळे यावर्षी दिनांक ११ व १२ ऑगस्ट २०२२ या दिवशी जादा बसेसचे नियोजन केलेले आहे. तसेच महामंडळाकडील अधिकारी, लिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करणेकामी
व वाहतूक नियंत्रण करणेकामी नेमणूक करण्यात आली आहे.
तरी पीएमपीएमएल कडून रविवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी “रक्षाबंधन” या सणाचे दिवशी उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करण्यात येणाऱ्या बसेस / वाहतूक व्यवस्थेची नोंद प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.