Grand Parents Day | नारायण हट इंग्लिश माध्यम स्कूल “ग्रँड पॅरेंट्स डे”-आजी आजोबा दिवस साजरा

Categories
Breaking News Education social पुणे

Grand Parents Day | नारायण हट इंग्लिश माध्यम स्कूल “ग्रँड पॅरेंट्स डे”-आजी आजोबा दिवस साजरा

Grand parents Day | शनिवार रोजी नारायण हट इंग्लिश माध्यम स्कूल, भोसरी येथे सायंकाळी ४ वाजता “आजी आजोबा दिवस” साजरा करण्यात आला.. अशी माहिती प्रा.डॉ. वसंत गावडे यांनी दिली.
 हा कार्यक्रम आजी-आजोबा आणि त्यांच्या नातवंडांचा हृदयस्पर्शी मेळावा होता.शंभर पेक्षा अधिक आजी आजोबा सहभागींसह हा दिन साजरा केला. सनई , ढोल ताशांच्या गजरात आजी- आजोबांचे स्वागत करण्यात आले..  सेल्फी काढुन नंतर सर्वजण स्थानापन्न  झाले.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व गुरुवंदना , गीतेचा  १२ वा अध्यायाने झाली..
आजी-आजोबा आणि नातवंडांमधील प्रेमाचा रेशीम बंध दृढ करणाऱ्या. ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे – श्री. शंकर देवरे सर,  ह. भ. प. बंडोपंत महाराज शेळके  यांचा परिचय, स्वागत प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका राक्षे मॅडम यांनी केले  त्यांनंतर चिन्मय मिशन आयोजित गीता पठण स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
आजी-आजोबा दिवसांचे महत्त्व सांगणारी हृदय स्पर्शी कविता – प्रविण भाकड सरांनी सादर केली. शिवन्या संत व शरण्या यांनी आजी आजोबांसाठी एक डान्स सादर केला. आजी-आजोबाची प्रत्येक नातवंडांनी पुजा पाय धुऊन हळदी कुंकू लावून केली.नंतर आजी-आजोबांनी नातवंडांना आशीर्वाद दिला.. आजी आजोबां साठी मनोरंजन खेळ घेण्यात आले.
– संत आजी-आजोबा
 मोहितेआजी-आजोबा
– रानडे आजी-आजोबा
– अनप आजी-आजोबा
यांना ज्ञानेश्वर माऊली चीं मुर्ती भेट म्हणून देण्यात आली..
आजी-आजोबांनी नृत्य आणि मधुर गाणी गाऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
आजी-आजोबांची भाषणे आणि मनोगत व्यक्त केले.
शाळेत चूल करून अल्पोपाहार तयार करून देण्यात आला  देवरे सरांच्या भजनाने व पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली..  कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले..

Social Media Uses | सोशल मीडियाचा अतिवापर वाचन संस्कृतीस घातक | प्रा.डॉ. वसंत गावडे

Categories
Breaking News cultural Education social

Social Media Uses | सोशल मीडियाचा अतिवापर वाचन संस्कृतीस घातक | प्रा.डॉ. वसंत गावडे

Social Media Uses | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात ओतूर (Annasaheb Waghire College Otur) येथे मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन (Reading Inspiration Day) म्हणून मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला. प्राचार्य डॉ. अभय खंडागळे,उपप्राचार्य डॉ. व्ही.एम.शिंदे व डॉ.कल्याण सोनवणे या मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शंभर विद्यार्थ्यांनी निवडक चरित्र व आत्मचरित्रांचे सामूहिक वाचन केले. वाचनाचे महत्त्व या विषयावरील घोषवाक्य स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने डॉ.कलामांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
 प्रास्ताविकात डॉ.निलेश हांडे म्हणाले, “माणसाची जडणघडण होण्यात वाचनाचा वाटा महत्त्वाचा असतो. महान व्यक्तिमत्व ही वाचनानेच घडतात.” डॉ.वसंत गावडे यांचे *वाचनाचे महत्त्व*’ या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. ते म्हणाले, *सोशल मीडियाचा अतिवापर वाचन संस्कृतीस घातक आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्यास वाचन संस्कृती महत्त्वाची आहे. आजच्या काळात पालकांनी आपल्या मुलांवर वाचनाचे संस्कार करावेत.
प्राचार्य डॉ. खंडागळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.”आपण रोज काहीतरी नवीन आवडीच्या विषयाचे वाचन करावे. वाचनाची सवय  आयुष्यात मोलाची साथ देते. त्यातून आपले जीवन समृद्ध होते.”आभार डॉ.छाया तांबे यांनी मानले.डॉ.सुनील लंगडे, डॉ.रोहिणी मदने, मंजुषा कुलकर्णी, गणेश डुंबरे, निखील काकडे यांनी विशेष सहकार्य केले.

NSS | Dr Vasant Gawde | एन.एस.एस. व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा | प्रा.डॉ. वसंत गावडे

Categories
Breaking News cultural Education social पुणे

NSS | Dr Vasant Gawde | एन.एस.एस. व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा | प्रा.डॉ. वसंत गावडे

NSS | Dr Vasant Gawde | पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (Pune District Education Board) अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर (Annasaheb Waghire college Otur) मधील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता अभियान तसेच “राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तीमत्व विकास” या विषयावरील डॉ वसंत गावडे (Dr Vasant Gawde) यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे व कार्यक्रमाधिकारी डॉ. अमोल बिबे यांनी दिली.

कार्यक्रमामध्ये डॉ. वसंत गावडे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना युवकांची सर्वात मोठी चळवळ असून राष्ट्रीय सेवा योजना ही आदर्श माणूस घडवणारी कार्यशाळा आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण विकासाबरोबरच समायोजन कौशल्य, लोकशाही मूल्य, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, तडजोडीचे तत्व, संभाषण कौशल्य व ग्रामीण जनजीवनाचा अनुभव याबरोबरच आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची क्षमता विकसित होते असे मत व्यक्त केले.
तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास तसेच महाविद्यालय आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणारी मूल्य युवकांमध्ये रुजवली जातात असे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्राचार्य, डॉ. व्ही एम शिंदे, डॉ. के.डी सोनावणे, डॉ.एस. एस लंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमोल बिबे यांनी केले व सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. आजय कवाडे यांनी केले.