Librarian Day | Baburaoji Gholap College | बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ग्रंथपाल दिवस उत्साहात साजरा

Categories
Breaking News Education पुणे
Spread the love

Librarian Day | Baburaoji Gholap College | बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ग्रंथपाल दिवस उत्साहात साजरा

| ग्रंथालयाचा सॉफ्टटेक सोल्युशन आणि सर्व्हिसेस या कंपनीशी सामंजस्य करार

Librarian Day | Baburaoji Gholap College |बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील (B R Gholap College) ग्रंथालयाचा सॉफ्टटेक सोल्युशन आणि सर्व्हिसेस या कंपनीशी सामंजस्य करार करून ग्रंथपाल दिवस (Librarian Day) उत्साहात साजरा करण्यात आला. (Librarian Day | Baburaoji Gholap College)

१२ ऑगस्ट हा दिवस भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस ‘ग्रंथपाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांनी विकसित केलेली ग्रंथालय शास्त्राची पाच सूत्रे अत्यंत महत्वाची आहेत.१. ग्रंथ उपयोगासाठी आहेत. २. प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. ३. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. ४. वाचकाचा वेळ वाचला पाहिजे. ५. ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. त्यांनी ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे सिध्दांत विकसित केले आहे. विविध विषयांचे वर्गीकरण, तालिकाकरण व वाचकांच्या दृष्टीने उपयुक्त असे शास्त्रीय पद्धतीचे पुस्तकांची मांडणी यावर अनेक प्रकारचे पुस्तके लिहिले आहेत. त्याचा उपयोग भारतात सर्व ग्रंथालयामध्ये होतो आहे.

मा. प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे व ‘सॉफ्टटेक सोल्युशन आणि सर्व्हिसेस’ चे संचालक श्री चेतन टाकसाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन केले. प्राचार्य यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांना मार्गदर्शन केले. डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांनी डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे अवचित्य साधत बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील ग्रंथालयाचा ‘सॉफ्टटेक सोल्युशन आणि सर्व्हिसेस’ या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला. आधुनिक युगात माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात या कंपनीचे चांगले काम असून त्यांनी अनेक ग्रंथालयांमध्ये कोहा, ई-ग्रंथालय, डी-स्पेस इत्यादी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डिजिटल ग्रंथालय, इन्स्टिट्यूटशनल रिपोझिटरी, युजर ट्रेकिंग सारख्या सिस्टिम विकसित केल्या आहेत.


नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य आधारीत व ऑनलाइन शिक्षणाला ज्यास्त महत्व देण्यात आले आहे. या धोरणात ‘चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम’ मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीचे विषय घेऊन कुठल्याही महाविद्यालयातून किंवा युजीसीने विकसित केलेल्या स्वयंम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून क्रेडिट पूर्ण करता येतील. बदलत्या शैक्षणिक वातावरणात वाचकांच्या बदलत्या गरजांनुसार ग्रंथालय सेवांमध्ये बदल करावा लागेल. अश्या परिस्थितीत निश्चितपणे या सामंजस्य कराराचा मोठा फायदा या महाविद्यालयाला होईल अशी माहिती ग्रंथपाल डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांनी व्यक्त केले.

बाबुरावजी घोलप महाविद्यालय हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने ग्रंथालय व ग्रंथपाल यांना उपयुक्त असणारे विविध उपक्रम या कराराच्या माध्यमातून राबवता येतील असा मानस ‘सॉफ्टटेक सोल्युशन आणि सर्विसेस’ या कंपनीचे प्रमुख श्री चेतन टाकसाळे यांनी व्यक्त केला.

नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी उपयुक्त अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण ग्रंथालय सेवा देण्यास या सामंजस्य कराराचा नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी केले. प्राचार्य यांनी कराराचे स्वागत करून पुढील नाविन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, आयक्यूएस्सी समन्वयक डॉ.संगीता जगताप, ग्रंथपाल डॉ. विठ्ठल नाईकवाडी, डॉ.राणी भगत, डॉ. विजय घाडगे, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, श्री सचिन शितोळे, ग्रंथालयातील कर्मचारी श्रीमती मनीषा कुंभार, श्री योगेश मदने, श्री किरण कळमकर, श्री बाबाजी गायकवाड आदी उपस्थित होते.