Bageshwar Dham Sarkar in Dehu | बागेश्वर धाम सरकार यांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी!

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Bageshwar Dham Sarkar in Dehu | बागेश्वर धाम सरकार यांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी!

| बागेश्वर धाम सरकार यांनी घेतले जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन

 

Bageshwar Dham Sarkar in Dehu | पंडित धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर धाम सरकार यांनी आज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मी स्वतः आचार्य संप्रदायाचा चेला असून मी कधीही भारतीय संतांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही. गैरसमजातून जी गोष्ट झाली आणि त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये जो दोष उत्पन्न झाला त्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो माफी मागतो. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी आमदार जगदीश मुळीक, संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, प्रल्हाद महाराज मोरे, नितीन महाराज मोरे, विश्वजीत महाराज मोरे, विक्रम महाराज मोरे आणि देवस्थानाचे सर्व विश्वस्त आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज उपस्थित होते.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, आज मला संपूर्ण देवस्थानचे व तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध शिळेचे दर्शन घडले. इंद्रायणी नदी मध्ये बुडालेली तुकाराम गाथा त्यांनी त्यांच्या तपोबलाच्या सामर्थ्याने पुन्हा वर आणली होती. हेच आमच्या भारतातील संत परंपरेचे सामर्थ्य आहे. भारत हा अद्भुत देश आहे. भारतातील सर्व संतांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहिला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्र हिंदू राष्ट्र स्थापन करायचे जे स्वप्न होते ते संपूर्ण भारतामध्ये साकार होईल आणि संपूर्ण भारत हिंदू राष्ट्र होईल.
मी स्वतः आचार्य संप्रदायाचा चेला असून मी कधीही भारतीय संतांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही. गैरसमजातून जी गोष्ट झाली आणि त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये जो दोष उत्पन्न झाला त्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो माफी मागतो.

मुळीक म्हणाले, ‘महाराष्ट्राला संतांची, वीरांची, छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे. आज धीरेंद्र शास्त्री यांनी देहू येथील संत तुकाराम यांचे दर्शन घेतले ही अत्यंत आनंदाची बाब आहे.’