No water supply | नागरिकांसाठी सूचना | शहराच्या महत्वाच्या भागात गुरुवारी पाणीपुरवठा नाही 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

नागरिकांसाठी सूचना | शहराच्या महत्वाच्या भागात गुरुवारी पाणीपुरवठा नाही

गुरूवार दिनांक ०४/०८/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण व पारेषन कंपनीचे कामासाठी तसेच पर्वती जलकेंद्र व लष्कर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेंच शुक्रवार दिनांक ०५/०८/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग)-
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर,राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद
नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२, ४६ ( कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती
टँकर भरणा केंद्र.

लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.