Bharat Itihas Sanshodhak Mandal | Raj Thackeray | भारत इतिहास संशोधक मंडळास राज ठाकरे यांनी भेट दिली बाबरी मशिदीची वीट 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Bharat Itihas Sanshodhak Mandal | Raj Thackeray | भारत इतिहास संशोधक मंडळास राज ठाकरे यांनी भेट दिली बाबरी मशिदीची वीट

| राज ठाकरे यांच्याकडून पुण्येश्र्वर व नारायनेश्र्वर मंदिराच्या अवशेषांची विशेष पाहणी

Bharat Itihas Sanshodhak Mandal | Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Supremo Raj Thackeray) यांनी आज भारत इतिहास संशोधक मंडळास (Bharat Itihas Sanshodhak Mandal) भेट दिली. मंडळास बाबरी मशिदीचा (Babri Mashid) भाग असणारी एक वीट भेट दिली. त्याच बरोबर मंडळास २५ लाख रुपये देणगी दिली. (Pune News)
आज दुपारी राज ठाकरे यांनी मंडळास भेट देत तिथे असलेल्या अनेक दुर्मिळ ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली. या वेळी मंडळाचे प्रदीप रावत, पांडुरंग बलकवडे सहीत अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
त्या वेळी या ठिकाणी असलेल्या पुण्येश्र्वर व नारायनेश्र्वर मंदिराच्या अवशेषांची विशेष पाहणी राजसाहेब ठाकरे यांनी करत संपूर्ण इतिहास पुन्हा एकदा समजून घेतला. तसेच मनसे पदाधिकाऱ्यांना मनसे देत असलेल्या पुण्येश्र्वर व नारायनेश्र्वर लढ्या बाबतची  विचारणा केली.
the karbhari - bharat itihas sanshodhak mandal
राज ठाकरे यांनी मंडळास भेट देत तिथे असलेल्या अनेक दुर्मिळ ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली.
मनसे गेली काही वर्ष सातत्याने पुण्येश्र्वर व नारायनेश्र्वर मंदिराच्या ठिकाणी सर्वेक्षण व उत्खनन करावे या साठी प्रयत्न करत आहे. शिवाय मंदिर मुक्ततेसाठी जनआंदोलन उभे करणार आहे. अशी माहिती मनसे नेते अजय शिंदे यांनी दिली.
या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर सहीत पुणे शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.