BJP Mahila Morcha | PMC Pune | बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे | हर्षदा फरांदे

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

BJP Mahila Morcha | PMC Pune | बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे | हर्षदा फरांदे

 

BJP Mahila Morcha | PMC Pune | पुणे शहारामध्ये (Pune City) मोठ्या संख्येने महिला गृहिणी बचतगटाच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन व विक्री करतात व त्यातून आपला उदरनिर्वाह चालवतात. परंतु जागेअभावी त्यांना त्यांच्या वस्तूंचे उत्पादन व विक्री करण्यात मर्यादा येतात. या बाबत आज भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्षा हर्षदा फरांदे (Harshada Pharande) यांच्या नेतृत्वात पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आयुक्त  विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

पुणे पालिकेने क्षेत्रीय कार्यलयाच्या हद्दीत पुणे महानगरपालिकेच्या जागा  बचत गट महिलांना उपलब्ध करून दिल्यास त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीस बाजारपेठ उपलब्ध करुन सामान्य महिला भगिनींना अधिक सक्षम करता येऊ शकेल. आठवडे बाजाराच्या धर्तीवर अशी काही योजना बचत गटासाठी राबवता येऊ शकते काय याचा विचार व अंमलबजावणी महानगरपालिकेने करावी. तसेच पुण्यात जवळपास ११०० सार्वजनिक स्वछतागृहे आहेत ज्यापैकी बहुतांश स्वछतागृहे ही मोडकळीस आली आहेत, ती तातडीने दुरुस्त करून त्याची वेळोवेळी स्वछता केली जावी. आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. (BJP Pune Mahila Morcha)

या शिष्टमंडळात फरांदे यांच्या सह महिला सरचिटणीस गायत्री खडके, आरती कोंढरे,उज्वला गौड, भावना शेळके ,शामा जाधव ,प्रियांका शेंडगे आदी उपस्थित होत्या