MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर : १६१ जागांसाठी भरती

Categories
Breaking News Education महाराष्ट्र
Spread the love

राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

: १६१ जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, ही जाहिरात आयोगाच्या वेबसाईटवर आज प्रसिद्ध झाली असल्याची माहिती आयोगाने ट्विट करुन दिली. या जाहिरातीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून परीक्षेसाठी तयारी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

जाहिरातील गट ‘अ’ ५९, तर गट ‘ब’ साठी १४ पदांसाठी आणि इतर ८८ पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेची तारीख २१, २२, २३ जानेवारी २०२३, रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे. या जाहिरातीमध्ये सांगितलेल्या अटी व शर्तींची पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, काही वेळापूर्वी अयोगाच्या वेबसाईटला तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही जाहिरात दिसत नसल्याने गोंधल उडाला होता. मात्र तांत्रिक अडचण बाजूला झाल्याने आता ही जाहिरात दिसत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. त्यामुळे आता राज्यसेवीची तयार करणाऱ्या अनेकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Leave a Reply