PMPML | Omprakash Bakoriya | पीएमपी कर्मचाऱ्यांना दिवाळीची बंपर भेट | ओमप्रकाश बकोरिया यांचा पहिलाच निर्णय कामगारांच्या हिताचा

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

पीएमपी कर्मचाऱ्यांना दिवाळीची बंपर भेट | ओमप्रकाश बकोरिया यांचा पहिलाच निर्णय कामगारांच्या हिताचा

पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी सर्व कर्मचार्‍यांना ८.३३ % सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश जारी केला आणि रु.१९,०००ची बक्षीस रक्कमही जाहीर केली. विशेष म्हणजे ते नुसतेच जाहीर करून थांबले नाहीत तर, कर्मचाऱ्यांच्या खात्यात सोमवारी रक्कम देखील जमा केली. यामुळे साडे नऊ हजार पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना बकोरीया यांनी पहिलीच बंपर भेट दिली आहे. त्यामुळे बकोरीया यांचे कौतुक होत आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या  धर्तीवर पीएमपीच्या कायम आणि बदली सेवकांना बोनस देण्याची मागणी पीएमटी कामगार संघ (इंटक) आणि पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ने पीएमपी प्रशासनाकडे केली होती. इंटक ने म्हटले होते कि पीएमपीला पुणे आणि पिंपरी महापालिकेकडून अनुदान दिले जाते. त्यानुसार कर्मचाऱ्यांना बोनस देणे गरजेचे आहे. दोन मनपा कडून निधी मिळून प्रशासनाने वेतन आयोगा बाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पीएमपी फक्त ठेकेदाराचे हित पाहते, असा आरोप इंटक ने केला आहे. बोनस नाही दिला गेला तर कर्मचाऱ्यांच्या भावनांचा विस्फोट होईल आणि त्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाची राहिल, असा इशारा इंटक ने दिलाहोता.

दरम्यान पीएमपीच्या सीएमडी पदी सरकारने नुकतीच ओमप्रकाश बकोरीया यांना बसवले आहे. शनिवारी बकोरीया यांनी सूत्रे हाती घेतली. विशेष म्हणजे सोमवारी तत्काळ बोनस जाहीर करून तो कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा देखील केला. बकोरीया यांनी पहिलाच निर्णय कामगार हिताचा घेऊन कामगारांची मने जिंकली आहेत.