New Member of Standing Committee : PMC : स्थायी  समितीच्या  नवीन  8  सदस्यांची  निवड  सोमवारी!   : खास  सभेत  होणार  निवड 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

स्थायी  समितीच्या  नवीन  8  सदस्यांची  निवड  सोमवारी!  

: खास  सभेत  होणार  निवड 

पुणे – महापालिकेच्या (Pune Municipal corporation) स्थायी समितीच्या (Standing Committee) आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या आठ जागांवर सदस्यांची निवड (Selection) करण्यासाठी सोमवारी  खाससभा (Meeting) आयोजित करण्यात आली आहे. अवघ्या १४ दिवसांसाठी हे सदस्य असणार असल्याने नेमकी यामध्ये कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे. हे सदस्य नंतर अध्यक्ष ठरवतील.

स्थायी समितीच्या सदस्यांचा कालावधी दर दोन वर्षांनी संपतो, यामध्ये भाजपचे ४, राष्ट्रवादीचे २, तर कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्यांचा कालावधी २८ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे, तो त्यापूर्वी आचारसंहिता लागू झाली नाही तर महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होईल. दरम्यान स्थायी समितीच्या ८ सदस्यांची मुदत संपत असताना पुन्हा निवडणूक घेण्याऐवजी त्यांना १४ दिवसांसाठी मुदतवाढ देता येते का ? याचा विचार झाला, पण महापालिकेच्या विधी विभागाने निवडणूक घ्यावी लागेल, असा अभिप्राय दिला आहे.त्यामुळे आता ही निवडणूक घेण्यासाठी २१ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता खास सभा बोलविण्यात आली आहे. १४ दिवसांसाठी पक्षाकडून नव्यांना संधी मिळेल की पुन्हा त्याच नगरसेवकांना संधी मिळेल हे पहावे लागणार आहे. ही निवडणूक झाल्यानंतर ७ मार्चपूर्वी अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे.

: या सदस्यांची संपणार मुदत

भाजप  – मानसी देशपांडे, सुनीता गलांडे, वर्षा तापकीर, उज्वला जंगले,
राष्ट्रवादी कॉंग्रेस- नंदा लोणकर, अमृता बाबर
शिवसेना – बाळासाहेब ओसवाल
काँग्रेस  – लता राजगुरू

Leave a Reply